Saturday, November 12, 2011

IIPA Prize सर्टिफिकेट चित्र

माझे आजोबा -- चित्र व टंकप्रत व्यासपीठ, नाशिक 2012 दिवाळी अंक

माझे आजोबा
संतुष्ट जगण्या – मरणाचा संदेश देणारे माझे आजोबा (तपासून नीट केलेले समाज मनातील बिंब या ब्लॉगवर आहे.)

व्यासपीठ, नाशिक 2012 दिवाळी अंक

 





माझे बालपणातील पहिले दशक धरणगाव आणि जबलपुरला गेले. ते खाऊन पिऊन सुखी दिवस होते. पण शान -शौकत चैन आदी न परवडणारे होते. आजोबा म्हणजे नाना वृध्दत्वाकडे झुकलेले, सबब स्वत सुरू केलेले लाकूड- वखारीचे दुकान वाटणीत धाकटया भावाला देऊन टाखले होते.माझ्या धाकटया आत्याला घटस्फोट घ्यावा लागला असल्याने ती व तीच्या मुलीची जबाबदारी व काळजी दोन्ही त्यांच्यावर आणि अनुषंगाने आई-दादांवर होती. त्यात दादा पीएडी म्हणजे अति उच्च-शिक्षित असूनही त्यांना साधी शिक्षकाची पर्मनंट नोकरी मिळत नव्हती. धरणगावालाच मोठी शाळा , हायस्कूल इत्यादी असल्याने जवळपासच्या खेड्यांत असलेली चुलत- आते भावंड नानांकडेच रहायला येत. आणि त्यावेळी मेट्ररीक असलेल्या आईने पुढे शिकावे अशी आई- दादा आणि माझी सर्वाचीच इच्छा होती. पण बाहेर गावचे रेग्युलर क़ॉलेज परवडणारे नव्हते. नागपूरच्या एसएनडीटी युनिव्हर्सिटीतून प्रायव्हेट परीक्षा देण्यासाठी सुद्धा आई एक –दोन महिने तिथल्या होस्टेलमधे राहून अभ्यास करावा लागत होता. तेंव्हा मी मोठे पणाने खळखळ न करता नानांजवळ राहत असे.
मग दादांना जबलपुरला कॉलेजात प्राध्यपकाची नोकरी मिळून आम्ही जबलपुरला आलो. तेंव्हा नानांची प्रकृती खालावली होती पण त्या काळी क्षयाला औषध नव्हते. त्यातल्यात्यात आत्याला नर्सिंग कोर्सला प्रवेश मिळून तीन वर्षांनंतर का होईना ,पण तीला नोकरी मिळून करियर व अर्थाजनाला सुरवात होईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र यासाठी ती तीन वर्षे माझ्या आतेबहिणीची जबाबदारी आईने घेणे भाग होती. त्यामुळे ती पण आमच्याबरोबर जबलपुरला आली.
या सर्वांचा परीणाम असा झाला की मी कधीच कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करचत नसे असे आई सांगते. याऊलट मी जेंव्हा आयुष्यातील त्या काळाकडे पाहते तेंव्हा मला त्या काळात हव्या त्या सर्व गोष्टी आपणाहून मिळत होत्या आणि हट्ट करावा लागल्याची वेळच आली नाही असे मला वाटते. मला काय हवे असे तर वर्गात पहिला नंबर (निदान वरचा) असावा, वाचायला खुप-खुप गोष्टींची पुस्तक असावीत, खेळताना कुणी मला पुरे म्हणू नये. या तिन्ही मला मिळत होत्या खूप भारी खेळली, ड्रेस, दागदागिने यांची हौस नव्हती. नाना –दादांना कुठलेही व्यसन नव्हते. आई चहा घ्यायची पण मुलांना मात्र चहाची सवय नको असा तिचाही खाक्या होता.
आईला अधून मधून सिनेमा बघायला आवडत असे. धरणगावी असताना तिला पुढे करून माझ्या दोन्ही धाकटया चुलत आत्या आणि चुलत बहिणी नानांकडून सिनेमाला जायची परवानगी मिळवायच्या. त्यांचे गणित कच्चे म्हणुन नाना वैतागत असत आणि आई सिनेमाला गेली म्हणून मला घेऊन गणित शिकवत बसत. त्यामुळे मला स्वतचे खुप कौतुक वाटायचेकी कस गणितामुळे मला अण्य मनोरंजनाची गरज भासली नाही. अगदी आजही मला खात्री वाटते की टीव्हीच्या कित्येक सिरियरल्स पेक्षा टीआरपी देणारी सिरिअल आपण रंजकतेने शिकवलेल्या अभ्यासातून निर्माण करू शकतो. नुसती खात्रीच नाही तर सिरिअल कशी असेल त्यांतल्या अभ्यासात कहानीमें ट्विस्ट कसे असतील , आयुष्याच्या खेळाइतकेच थक्क करू शकणारे गणितांचे खेळ त्यांत कसे टाकायचे इत्यादी विषयी माझे थोडे-थोडे लेखन,विचार आणि प्रयोगही चालु असतात. कधीतरी त्यांच्यावरतीही सविस्तर लिहायचे आहे.
जबलपुरला खेळलेला एक खेळ छान लक्षात राहून त्याचा आनंद इथे नमूद करावासा वाटतो. हा खेळ शिक्षकांनी आंम्हा विद्यार्थ्यासाठी आयोजित केला होता. एका टेबलावर खुप निरनिराळ्या सुमारे पन्नास वस्तु मांडून ठेवत. आंम्हाला डोळे झाकून तिथ पर्यत नेत- दहापर्यत आकडे मोजून तेवढा वेळच त्या वस्तू पाहू दिल्या जात आणि मग दुसरीकडे बसून पुढिल अर्ध्या तासात आम्ही आठवतील तेवढया गोष्टींची यादी लिहून काढायची. यामुळे स्मरणशक्ती वाढवता तसेच फोकस करायला मदत होते. तसेच मला डोंबारी खेळाचे भयंकर आकर्षण होते. मला तसे खेळ शिकता आले नाही म्हणूनआजही वैषम्य वाटते आणि इतके खेळगुण अंगात असणा-या या कलावंतांना भारत सरकारच्या खेळ -नितिमध्ये कोणतीही जागा नसल्याचा रागही येतो.
आपण श्रीमंत नाही याची जागच व्हायला एक प्रसंग घडला. आम्ही जबलपुरला आलेलो होतो. आता आईला सिनेमा बघायला घरच्यांची सोबत नव्हती. पण शेजारच्या मैत्रिणींबरोबर विशेषत बेहेरे काकू आणि कमलापुरे काकू यांच्या बरोबर ती जात असे. असाच एकदा त्यांचा कार्यक्रम ठरला पण नेमके तेव्हाच आमच्या शाळेच्या कुठल्याशा फंक्शनमध्ये स्टेजवरच्या कामांत माझी निवड झाली . त्यासाठी नवा ड्रेस लागणार होता. रात्री सर्व निजानिज झाल्यावर आई-दादांच थोडस बोलण झाल की खर्चाची तोंड मिळवणी कशी करायची आणि मग आईने स्वतचा सिनेमाचा बेत रद्द केला . मला अचानक जाग येऊन मी हे ऐकत होते, पण मी ऐकंल हे त्यांना जाणवू नये म्हणून आईला स्वतच्या छोट्याशा करमणुकिला सुद्धा सोडावं लागल ही बाब मनात घर करून राहीली.
समाधीटपणा देखील मुलांना शाळेच्या वयांतच शिकवला पाहिजे. तो माझ्यात नाही हे ही मला एका प्रसंगानं कळलं. शाळेत पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनाचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर विविध विषयांवर बोलण्यासाठी काही मुली-मुलांची निवड झाली होती. मला लोकमान्य टिळक हा विषय होता कारण एक ऑगस्टला त्यांची पुण्यतिथी असते. मी पण छानपैकी निबंध पाठ करून ठेवला . कार्यक्रमात पहिल्या दोघांनंतर मला बोलायच होतं. पण इतका ताण आला, की मला एक अक्षर आठवेना. ज्या बाईंना आधी निबंध दाखवून झाला होता त्यांनी एक-दोन मुद्यांची आठवण करून दिली पण माझ्या तोंडून अक्षरही फुटेना. पाच मिनिटे वेळ देऊन शेवटी मला बसायला सांगितले. मला कुणी रागावले नाही उलट अस होत कधीकधी पुढच्या वेळी पुन्हा प्रयत्न कर असं मुख्याध्यापक म्हणाले. पण माझ हे स्टेजला पुढेही खूप काळ चालूच राहील.
आमच्या घरात वाचणाची चंगळ होती दादांच्या संस्कृत तत्वज्ञानाच्या डिग्रीमुळे महाभारत, रामायण, पुराणं, उपनिषदं असे ग्रंथ भरलेले होते. व त्यातील सर्व गोष्टी आणि घटना आम्ही वारंवार वाचून काढत असू. मग मी महाभारताल्या भीमाचा खेळ स्वताकडे घेऊन माझ्याकडे किती ताकद आहे ते आजमावत असे. त्यासाठी धाकटया भावाला पाठंगुळीशी घेऊन बहीण आणि आत्याच्या मुलीला दोन उजव्या-डाव्या कडेवर घेऊन भरभर फिरत असे. मात्र धावपळीच्या खेळासाठी जेवढी चपळाई हवी त्यामध्ये मी कमी पडत असे. तिसरीत पहिली आल्याचे बक्षीस म्हणून अरेबियन नाईटस हे पुस्तक मिळाले होते आणि चौथीनंतर माझ्यासाठी चांदोबा मासिकाची वर्गणी लावली होती. धाकटया भावंडांचा अभ्यास घेण्याचे कामही मी घेतले.
मी पाचवीत असताना देशांमध्ये मोजमापाची जुनी पद्धत जाऊन नवीन दशमान पद्धत लागू झाली आणि शेरऐवजी किलोगॅ्मतर मैलाऐवजी किलोमिटर हे मोजमाप आले. मात्र त्यातील किलो ह्या शब्दाचा अर्थ कुणीही नेमका समजावून न सांगितल्याने आंम्हा विद्यार्थ्याचा खूप गोंधळ होई. त्यातच पूर्वीचे आणे- पैसे जाऊन त्यांच्या जागी सरळ शंभर पैशांचा एक रुपया असे गणित आले. मग जुन्या पैशाला पैसा आणि नव्या पैशाला खडकू (लहान होता म्हणून) अशी बोली नावे पडली. पाचवीच्या परीक्षेत अमूक आण्याचे किती पैसे अशी गणित येणार होती आणि ते शिकवण्याच्या काळांत माझी शाळा बुडालेली होती. परीक्षेच्या दोन मिनिटे आधी एका मैत्रिणीने फॉर्म्युला सांगितला की दोन आण्यांच्या पुढे जेवढे आणे विचारतील त्यांना सहाने गुणून एक मिळवायचा. हा नियम सरसगट लावल्यामुळे माझी दोन गणित चुकून दोन मार्क बुडाले त्याची रुखरुख मनाला खूप दिवस लागली होती.
अशाप्रकारे माझ्यातील गुण- अगुणांची जाणीव मला होऊ लागली होती. हिंदी भाषेवर प्रभुत्व येऊ लागले होते. त्याचबरोबर घरातील जबाबदारीची जाणीवही होऊ लागली होती.
मग एक दिवस दादांना त्यांच्या शर्मा नामक सहाध्यावयांचे पत्र आले. बिहार सरकारच्या अधिपत्याखालील "मिथिला संस्कृत रिसर्च इन्सिट्यूट दरभंगा" येथे प्रोफेसरांची पदे भरण्यासाठी अर्ज मागावले होते. त्यासाठी अर्ज पाठवायचा सल्ला होता. आधीच आम्ही महाराष्ट्रापासून दूर आलेलो, मग इतक्या लांबच्या गावी नोकरी घ्यावी का? नाना म्हणाले हो, तेंव्हा दादांनी आठवण करून दिली की पीचएडी नंतर दादांना कोलंबिया विद्यापिठाकडून संस्कृतच्या पोस्टवर काम करण्याची ऑफर आली होती. पण एकुलता एक मुला परदेशी गेला की तिकडचाच होऊन राहील म्हणून नानांनी नको म्हटले होते. आणि दादांनीही त्यांच्या शब्दाला मान देऊन ती ऑफर सोडली होती. पण अर्थातच आत्ताच्या ऑफर मध्ये खूप फरक होता. मुळात ही नोकरी देशातच असणार होती. जास्त अर्ज येणार नसल्याने जवळपास पक्की होती. सरकारी नोकरी असल्याने पगार कमी वाटत असला तरी पेंशन मिळणार होते. हे सर्व मुद्दे विचारात घेऊन नानांनी त्यांना वरभंग्याला इंटरव्ह्युसाठी जाण्यास सांगितले. एव्हाना तिथे काही दिवस रहावे लागले तर माझ्या आजारपणाची काळजी करू नका, काम पूर्ण करून निकाल ऐकून मगच या असे बजावले.
मला ते वीस- तीस दिवस नीट आठवतात. घरात आम्ही चार मुलं.त्यांत मी मोठी म्हणजे नऊ वर्षांची , आईला चौथ्या बाळासाठी दिवस गेलेले. नानांच आजारपण वाढत चाललेलं. माझी व बहीणीची वार्षिक परीक्षा तोंडावर आलेली आणि दादांचा दरभंग्याला मुक्काम किमान पंधरा दिवस तरी असणार होता. मी जवळ जवळ रोजच आई आणि नानांच्या औषधासाठी आमचे फॉमिली डॉक्टर मांडवीकर यांच्याकडे जात असे , ते नानांच्या आजाराला एक लांबड , थोडस गोडसर औषध देत. बहुधा कफाचा त्रास कमी करण्यासाठी असावे. पण एक दिवस ते घरी आले आणि म्हणाले दादांना बोलावून घ्या म्हणाले ,नानांना ते पटले नाही. दरभंग्याचा इंटरव्हुय अजून व्हायचा होता. मग नानांनी त्यांच्या मोठया जावयाला बोलवायचे ठरवले. मला आठवते की एकच दिवशी दोन तारा पाठवल्या होत्या . आतोबांना पाठवलेल्या तारेचा मजकूर होता की नानांची तब्येत चांगली नाही, असाल तसे तातडीने या. आणि दादांना मजकूर होता की नाना ठीक आहेत, निर्धास्तपने इंटरव्हुय देऊन निकाल आल्यावर जॉईन होऊन मगच या. एवढे सगळे निर्णय नाना शांत चित्ताने घेत होते.
आतोबा आले त्यानंतर नानांची तब्येत झपाटयाने घसरली, किंबहूना तसे होणार म्हणूनच त्यांना बोलावले होते. दादांची निवड झाल्याची तार आली , पाठोपाठ त्यांनी नोकरीत आठवडाभर काम करून मगच सुट्टी घ्यावी असा डायरेक्टरांचा सल्ला आहे. शिवाय घर बघावे लागणार आहे. तरी नाना कसे आहेत ते कळवा अशीही तार आली. त्यालाही नानांनी सांगितल्यावर हुकुम मीच तार पाठवली होती की सर्व कामे आटोपून मगच या.
आणि नाना अशी गोष्ट बोलले जिने आजतागायत माझ्या विचारांना खूप भंडावले आहे. त्यांनी आईला सांगितले की लवकरच अमुक दिवशी हनुमान जयंती आहे.- चांगला मुहुर्त आहे, त्या दिवशी मी प्राण सोडीन, मी पण हे ऐकले.मात्र महाभारतातील भीष्म कथा माहीत असल्याने मला या वाक्याचे तेंव्हा खूप आश्चर्य वाटले नाही. कोणालाही इच्छामरण असू शकते. असेच मला वाटले. तो पर्यत मी कोणाचेही मरण पाहिलेले नव्हते. त्यामुळे त्यांचे गांभीर्यही वाटले नाही. त्या दिवशी दादा घरी नसतील, त्यांच्या परत येण्याला अजून काही अवकाश असेल , पण त्यांना डिस्टर्व करू नका, जावयाने मुखाशी देऊन चाललो असे नानांनी बजाऊन सांगितले. पुढे आईला असा सल्ला दिला की , आता तुंम्ही बिहार मध्ये जात आहात तर माझ पहिल श्राद्ध गवा येथे जाऊन करा म्हणजे दरवर्षी तुंम्हाला वर्षश्राद्ध करावं लागणार नाही.
आणि तीन- चार दिवसांनी जेंव्हा हनुमान जयंतीचा दिवस उजाडला तेंव्हा त्यांनी आतोबांकडून छोटीशी अंघोळ घालून घेतली . आईला थोडी खीर करायला सांगितली. नैवैद्य दाखवून खीर खाल्ली. मग मग कॉटवरून खाली येऊन चटई घालून झोपले. एक-दीडच्या सुमारास मुलांना खेळायला बाहेर पाठवं असं आईला सांगितल्यावरून आंम्ही सर्व शेएजारी पोहनकरांकडे गेलो . चारच्या सुमारास आईने बोलावले की, नाना वारले आहेत. दादांना तार करून ये.
हा प्रसंग माझ्या मनावर ठसलेला आहे. हे निव्हळ शांत मरण नव्हतं तर पूर्ण जाणीवेच्या अवस्थेतील मरण होत अस मला वाटत. हे त्यांनी कस साधल याच आश्चर्य अजून जात नाही. उलट माझी प्रबळ इच्छा आहे की माझं मरण देखील असच असावं. पूर्ण जाणीव ठेऊन –रागद्वेष मनात न राहता- समाधानाने –आणि माझं मी ठरवून. पण हे कसं साध्य करतात.
असो. तार मिळल्यावर मिळेल ती पहिली गाडी पकडून जबलपुरला येण्यासही दादांना चार दिवस लागले. तोपर्यंत नानांचे विधी थांबवले नव्हते.त्यांची सुचनाच तशी होती. शेवटचे दर्शन न झाल्याने दादांना खूप हळहळ वाटलीच. आधी त्यांनी यासाठी आईला जबाबदार मानलं. पण आमचे घर मालक डॉ. वाजपेयी, आतोबा आणि डॉ. मांडवीकरांनी त्यांची समजूत काढली.
या प्रसंगानंतर काही दिवसांतच आम्ही दरभंगा येथे दाखल झालो. यथावकाश सर्वजण गयेला जाऊन नानांच श्राद्ध केलं . नानांचं पर्व आयुष्यातून संपल. धाकटया भावंडांना त्यांचा सहवास फारसा लाभला नव्हता. मला मात्र त्यांनी गणित या विषयीकडे एक दार्शनिक दृष्टीने पहायला शिकवल. त्यातला आनंद मला समजला आणि आयुष्यभर पुरतोय हे मोठ संचितच मला वारसाहक्काने मिळालं. मरणाच्या बाबतीतही तस मिळाल पाहिजे ही माझी आंतरिक ओढ कायम राहील.  
-----------------------------------------------------------------------------------------------------




Saturday, October 8, 2011

समान सहभाग अजून खूप दूर! 13 Mar 2010 -- MaTa

समान सहभाग अजून खूप दूर!
13 Mar 2010, 2313 hrs IST
MaTa

लोकसभेत ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचे विधेयक नुकतेच राज्यसभेत मंजूर झाले असले तरी प्रत्येक क्षेत्रातल्या, सर्व पदांवरच्या समान सहभ
ागाचे स्वप्न अजून दूरच आहे. आमीर् चीफ, कॅबिनेट सेक्रेटरी, सीबीआय प्रमुख अशी पदे आजही महिलांपासून दूरच आहेत. वेल्फेअर, डेव्हलपमेंट, एम्पॉवरमेंट अशा टप्प्यांनी बदलत आलेला महिला धोरणांचा विचार आता 'पाटिर्सिपेशन' या तत्त्वाने पुढे जाण्याची गरज आहे...

...............

भूतकाळावर नजर टाकली तर स्वातंत्र्यानंतर स्त्रियांबाबतची सरकारची भूमिका टप्प्या-टप्प्याने सुधारत गेली. आधी सरकारने म्हणे, आम्हांला स्त्रियांच भल करायच आहे-वेल्फेअर साधायचे आहे. १९७५ च्या सुमारास डेव्हलपमंेट-विकास हा शब्द स्वीकारण्यात आला. महिला विकासाच्या योजना आणि महिला विकास विभाग सुरू झाले. या काळांत विभिन्न महिला चळवळींनी जोर पकडला. राष्ट्रीय महिला आयोगाची मागणी पुढे आली. एव्हाना इंदिरा गांधीच्या पंतप्रधानपदाला ९-१० वषेर् होत आली होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर दिसणाऱ्या नन्दिनी सत्पथी, सुचेता कृपलानी, विजयालक्ष्मी पंडित या नेत्या मागे पडल्या होत्या. त्यांच्याइतक्या कर्तबगार महिला राजकारणात उरल्या नव्हत्या. पुढे ते प्रमाण आणखी घटले.

आयएएसमध्ये स्त्रिया येण्याला सुरुवात १९४९मध्येच झाली. पहिल्या आयएएस अॅना कुरियन (मल्होत्रा). मात्र, सैन्य आणि पोलिस दलात महिलांना मज्जाव होता. किरण बेदीने न्यायालयात लढून आयपीएसमधील महिला-बंदी उठवायला लावली आणि १९७३मध्ये ती पहिली महिला आयपीएस अधिकारी बनली.

सैन्यात स्त्रियांना लिखित बंदी होती. ती आता फक्त शॉर्ट सव्हिर्स कमिशनपुरती उठवली आहे. पण वैज्ञानिक जगतात-विशेषत: फिजिक्स, केमिस्ट्री, जिऑॅलॉजी, जॉग्रफी, सव्हेर्- यात स्त्रियांना अलिखित बंदी होती. दुर्गाबाई भागवतांची मोठी बहीण कमला सोहोनी या भौतिकीत संशोधन करू इच्छित होत्या. मात्र, 'नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी' मध्ये त्यांना मज्जाव करण्यात आला. त्यांना प्रोफेसरकी करावी लागली. भौतिक शास्त्राचे संशोधन स्त्रियांना झेपणार नाही, असे सी. व्ही. रमण यांच्यासकट सर्वांना वाटे. अगदी १९०८मध्येच रेडियमच्या शोधासाठी नोबेल पारितोषक मिळवलेल्या मेरी क्यूरीचे उदाहरण असूनही. म्हणूनच फिजिकल लॅबोरेटरी, न्यूक्लियर एनजीर्, इस्त्रो, डीआरडीओ, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी इत्यादीमध्ये वरिष्ठ पातळीवर महिला नाहीत. कनिष्ठ, मध्यम पातळीवर थोडा वाव दिला जातो! झूलॉजी, बॉटनी, बायोटेक्नॉलाजी ही सॉफ्ट सायन्सेस मानली जातात. तिथे महिला वरिष्ठ पातळीपर्यंत पोचल्या. पण फिलॉसॉफी आणि इकॉनॉमिक्स हे पुन्हा हार्डकोअर विषय! तिथे महिलांना वरिष्ठ जागा मिळत नाहीत कारण त्या चांगल्या तत्ववेत्त्या किंवा अर्थतज्ज्ञ असूच शकत नाहीत असे मानणारे उच्चपदस्थ आपल्याकडे आजही आहेत. अभियांत्रिकी महिलांसाठी नाही, हा तर जुनाच समज!

सुधा मूतीर् प्रथम टेल्कोमधे इंजिनीअरच्या पदासाठी मुलाखतीला गेल्या तेव्हा खुद्द जेआरडी टाटा म्हणाले की टेल्कोत महिलांना घेत नाही. पुढे त्यांना घेण्यात आले. आता इलेक्ट्रॉनिक्स व आयटी क्षेत्रात महिला असल्या तरी अजूनही सिव्हिल किंवा मेकॅनिकल इंजिनीअर महिलांना नोकरी व प्रमोशन मिळण्याची मारामारीच असते. केरळचे उदाहरण वगळता एकाही राज्यात महिला चीफ इंजिनीअर किंवा पीडब्ल्यूडी सेक्रेटरी झाली नाही. 'इंजिनीअर महिलांना नोकरीची संधी' या विषयावर आयआयटी पवईत १९९० मध्ये ग्रंथ प्रकाशित केलेल्या समाजशास्त्राच्या प्राध्यापक इंदिरा महादेवन यांनी २००० मध्ये सांगितले की मधल्या काळात काहीही सुधारणा झालेली नाही.

अजूनही 'रॉ'सारख्या सवोर्च्च गुप्तहेर संस्थेत, कॅबिनेट सेक्रेटरींच्या पदावर, हायकोर्ट चीफ जस्टिस व सुप्रीम कोर्ट जजांच्या पदावर (सुजाता मनोहर यांचा अपवाद वगळता), आयआयटी आणि आयआयएमच्या संचालक पदावर, अणुऊर्जा, पेट्रोलियम, पॉवर, डिफेन्स सायन्स, डिफेन्स प्रॉडक्शन, टेक्नोलॉजी अशा विभागांच्या सचिव पदांसाठी महिला येत नाहीत. काही राज्ये वगळता अजूनही सक्षम महिलांना मुख्य-सचिव किंवा गृहसचिव पद देत नाहीत. या कामांना मजबूत इरादे लागतात व त्यासाठी महिला अयोग्य आहेत असेही एक अलिखित परंतु सर्वज्ञात, सर्वमान्य असे अंडरस्टॅण्डिंग आहे. इंदिराजी पंतप्रधान झाल्यामुळे निदान मुख्यमंत्री, राज्यपाल, पक्षाध्यक्ष आणि आता राष्ट्रपती होण्याचा मार्ग महिलांसाठी प्रशस्त झाला. श्रीमती प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्याने जगभर भारताचे कौतुक झाले. तसेच एक आदर्श ठेवला गेला.

या काळात महिलांबाबतचे विचार बदलून आता एम्पॉवरमंेट-सबळीकरण, सक्षमता शब्द रुजला आहे. त्यातूनच पुढे १९९२मध्ये राष्ट्रीय महिला आयोग स्थापन झाला पण या आयोगाला म्हणावे तसे पाठबळ मिळाले नाही. विकासयोजना आणि सक्षमता योजनांमध्ये मूलभूत तात्त्विक फरक असा की सक्षमतेमध्ये स्त्रीने स्वत: काही करणे महत्त्वाचे ठरते. 'उंबरठा' चित्रपटात हा पैलू छान मांडला आहे. सुखवस्तू असणं हेच त्यातल्या नायिकेच्या कामाच्या आड येतं. अशा आत्मपरीक्षणाच्या क्षणी ती सुखवस्तू जीवन सोडते. हे तिच्या सक्षमतेचं प्रतीक आहे. पण एक प्रश्नचिन्ह उरतेच की दोनातून एक निवडण्याची वेळ स्त्रीवर यावीच का?

प्रगती आणि विकासाच्या योजनेतून सक्षमता येतेच असे नाही. उदाहरणार्थ, बांधकामावर मजूर महिलांच्या मुलांसाठी पाळणाघरे झाली. कदाचित मजुरी वाढली पण म्हणून कोणतीही महिला सब-कॉण्ट्रक्टर किंवा मस्टर क्लार्क झाली नाही. त्याच गटातील पुरुष मात्र मस्टर क्लार्कची बढती मिळवू शकतात. हा प्रगती आणि सक्षमतेमधील फरक आहे. ही सक्षमता कौशल्य शिक्षणातून येते. शाळांमध्ये कौशल्य शिक्षणाची सोय नसल्याने कौशल्य शिक्षण हे आयुष्याच्या ऐरणीवर घाव सोसून घ्यावे लागते. त्यासाठी मुलांना किंवा पुरुषांना जी संधी मिळते ती मुलींना मिळत नाही.

अशी अत्यल्प संधी आता अल्पबचत गटांत मिळते आहे. महिला पैशांचे व्यवहार करू लागल्या आहेत. पण अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांत तांत्रिक कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य व माकेर्टिंगचे कौशल्य असे तीनही पैलू महत्त्वाचे आहेत.

महिलांचे सक्षमीकरण झाले म्हणजे सगळे झाले का? माझ्या मते, नाही. देशाचा गाडा पुढे रेटण्यात त्यांचे प्रभावी योगदान दिसत नाही तोवर त्यांची सक्षमता कसाला लागत नाही. वेल्फेअर, डेव्हलपमंेट, एम्पॉवरमंेट यानंतर आता पाटिर्सिपेशन हवे. महाराष्ट्र झाल्यावर जिल्हा परिषद कायदा व सहकार कायदा लागू झाला. त्यात तरतूद होती की निवडून आलेल्या सदस्यांमध्ये किमान दोन महिला नसतील तर दोन महिला नॉमिनेट केल्या जातील. हे फक्त महाराष्ट्रातच झाले. पण ते पाटिर्सिपेशन समर्थपणे झाले नाही, कारण आजही निवडून आलेल्या महिलांची संख्या वाढत नाही. उलट घटच दिसते. पहिल्या लोकसभेपासून निवडून येणाऱ्या महिला खासदारांची संख्या घटतेच आहे. निवडणुकीत पैसा प्रबळ झाल्यावर स्त्रियांची संधी अजून कमी झाली. याचसाठी स्त्रियांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षणाची गरज आहे. परवा राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने यातला पहिला टप्पा तरी पार पडला आहे. एका मोठ्या प्रक्रियेची सुरूवात तरी झाली. अर्थात, प्रत्यक्ष राजकारण व निर्णय प्रक्रियेतला सहभाग किती वाढणार, हा प्रश्ान् आहेच. त्यासाठी महिलांनाच आग्रही राहावे लागेल. एक महापौर सांगत होत्या की, महिला सदस्य उठल्या की पुरुष म्हणतात, 'अहो, तुम्ही बसा, नंतर बोला.' किंवा कधी म्हणतात, 'बोला ताई, तुम्ही बोला.' पण त्यामागे 'घ्या तुमची हौस भागवून' असा सूर असतो. ही मानसिकता बदलली पाहिजे. त्यासाठी संख्याबळ हवे.

राजीव गांधींनी जी ७३ व ७४वी घटनादुरुस्ती करवून घेतली तिला यासाठी विशेष महत्त्व आहे. यामुळे ग्रामपंचायती व नगरपालिकांमध्ये महिलांसाठी तीस टक्के आरक्षण आले. ते आता ५० टक्के होत आहे. पण ते तीन कारणांनी पुरेसे नाही.

पहिले म्हणजे शासनाच्या वरिष्ठ पातळीवर असा विचार केला जातो, की या महिलांना तसेच ग्रामीण समाजाला देशातील अर्थव्यवस्थेचे काही कळत नसल्याने त्यांच्या मतांची किंवा त्रासाची दखल घेण्याची गरज नाही. त्यामुळे स्त्रियांना योग्य वाटणाऱ्या धोरणांची हेटाळणी केली जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दारूच्या धोरणाबाबत ग्रामीण महिलांचा आवेश, मत आणि आक्रोश कित्येकदा दारूची दुकाने फोडून व्यक्त झाला आहे. तरीही दारुनिमिर्तीला सवलती देताना बायकांना अर्थकारणातलं काय कळतं, असा विचार असतो. फारतर अबकारी उत्पन्नातील एक दशांश रक्कम महिला कल्याणासाठी ठेवा, असे धोरण ठरते. पण दारूमुळे महिलेचा छळ, संसाराची घडी विस्कटणे आणि वाढती गुन्हेगारी यांचे 'आथिर्क मूल्य' काढा, ही मागणी पुरुषांच्या कानावरच पडत नाही.

दुसरे म्हणजे धोरणआखणीत ज्यांचा सहभाग अपेक्षित त्या महिलांमधला त्या कौशल्यांचा अभाव. यासाठी कौशल्य-शिक्षण व व्यवस्थापन-शिक्षण महिलांना द्यायला हवे. तिसरे, प्रत्येक क्षेत्रात सवोर्च्च पातळीवर महिलांना लौकरात लौकर पुढे घ्यावे. मज्जाव तर असूच नये. न्यूक्लिअर रिअॅक्टर, इस्त्रो, रॉ, आमीर् इथेही सवोर्च्च पदी महिला हव्यात. याची सुरुवात आपण एका प्रतीकात्मक गोष्टीने करु शकतो. शारिरिक मसल-पॉवर किंवा सार्मथ्य दाखवण्यामध्ये स्त्रिया कदाचित कमी पडत असतील अस क्षणभर मान्य करू या. मग बुद्धिबळाच्या स्पधेर्त स्त्री-पुरुष हा भेद का ठेवायचा आणि क्रिकेटमध्ये तरी का? या दोनही खेळांत मसल-पॉवर पणाला लागत नसून चिकाटी व दूरचे प्लॅनिंग आवश्यक असते. तर मग या खेळांचे नियम बदलून एकाच टीममध्ये स्त्री-पुरुष दोघांना घेऊन किंवा स्त्री विरूद्ध पुरुष असे सामने का ठेवू नयेत?

हे झालं प्रतीकात्मक उदाहरण. पण त्याचीही खूप गरज आहे. मात्र स्त्रियांचा सहभाग निश्चित करणाऱ्या योजना तयार करून आणि त्यांना तांत्रिक कौशल्य-शिक्षण व व्यवस्थापन-शिक्षण देऊन त्यांचा सहभाग प्रभावी केला पाहिजे. यासाठी स्त्रियांनी परंपरा मोडण्याची गरज नसून पुरुषांनी परंपरा व मनोवृत्ती बदलायला हवी. कदाचित, याचेही प्रबोधन महिलांनाच करावे लागेल. आता परंपरा दूर ठेवून स्त्री-पुरुष समान सहभागाचे नवे पर्व सुरू करायला हवे.

- लीना मेहेंदळे

सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्यूनल (कॅट), बेंगळुरू

Saturday, September 3, 2011

4 th collection -- to select from

सुप्रीम कोर्टाचे तीन महत्वाचे निकाल
1. सत्यवचनाचे वैज्ञानिक तथ्य --- मटा, दि 8 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
2. कार्यक्षम व्यवस्थेसाठी --- मटा, दि 29 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
3. पावले टाकीतच रहायचं आहे --- मटा, दि 15 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली प्रकाशित
4. हक्कांची जपणूक आणी न्यायबुद्धी --- मटा, दि 22 जून 2008. गेस्ट रूम सदराखाली
5. ही तर लक्ष्मीची पाउले
6. युगान्तर घडतांना --- साप्ताहिक लोकप्रभा दि.18.5.2007
7. बलात्काराला फांशीची शिक्षा हवीच --- केसरी दि 1999
8. समाजकारण घसरलं भ्रष्ट अर्थकारण पसरलं -- शब्ददर्वळ दि. 2008
9. प्रशासकीय लेखा-परिक्षण एकांगीच राहिले
10. बदलती जीवनशैली व कुटुंबपध्दती -- जळगांव सकाळ खास अंक दि.11.8.2008 (वृद्धांच्या व्यवस्थेचा प्रश्न अनुत्तरितच)
11. मिठाचे अर्थकारण --- अंतर्नाद .....२००० (जून ? )
12. वादळाचा पाठलाग
1३. मन घडवणारे प्रसंग
14. त्या स्त्रियांच्या सोबतीसाठी म.टा. 21 Sep, 2004
त्याची शरम वाटते? -- मरीन ड्राइव्ह कांड
-----------------------------------------------------------------------
1. हे विकासाचे आव्हान पेलेल कां -- सा विवेक
2. सर्व ओझी निवारणासाठी - क्रिकेट --- लोकसत्ता, मुंबई दि.
3. मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी - इनस्क्रिप्ट --- लोकमतसाठी
4. जुहू शेम नंतर - आता तरी --- महाराष्ट्र टाईम्स 21.1.08
5. कौशल्य शिक्षणाशिवाय पर्याय नाही --- लोकमतसाठी
6. ठावकीच नाही --- महाराष्ट्र टाईम्स दि.
7. सांगलीचे दिवस --- अंतर्नाद,पुणे,
8. सुस्त दंड प्रक्रिया आणि तेलगी --- महाराष्ट्र टाइम्स दि. ----
9. योगत्रयी : आमुख ---
10. कुसुमाग्रजाच्या कविता अनुवाद करताना --- आकाशवाणी पुणे
कुसुमाग्रज हिन्दी कविता आकाशवाणी पुणे वरून
11. स्त्री पुरुष असमतोल - एक इशारा --
12, शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवणे शक्य आहे -- वसंत व्याख्यानमाला, पुणे, 19-5-96. -- दै. केसरी, पुणे, 20-5-96
13. निवडणुकीचे अर्थकारण आवाक्या पलीकडचे
14. उच्च शिक्षणावरील आर्थिक तरतूद -- IIPA, मुंबई, स्पर्धेतील लेख 1992
-----------------------------------------------------------------------------------------------------------
संगणकावर धपाधप मराठी लेखन हेतू -- इनस्क्रिप्ट
योगत्रयी
'त्या' नागपूरी स्त्रियांच्या सोबतीसाठी
मृत्युंजयी सावित्री आणि रुपकुंवरचे सती जाणे
त्याची शरम वाटते
चिंतामण मोरया
बायोडीझेल काळाची गरज -- लोकराज्य जुलै 2006
मन घडवणारे प्रसंग -- अंतर्नाद
भाप्रसे संस्कृती आणि अपसंस्कृती --अंतर्नाद
सुप्रीम कोर्टाचे तीन महत्वाचे निकाल
छोट्या छोट्याच गोष्टी -- स्त्रग्धरा 2002
नहाराष्ट्रांत बलात्काराचे गुन्हे -- लोकमत 2001
स्त्री भ्रूणहत्या आणि आपण -- अंतर्नाद
ठावकीच नाही -- मटा
आत्मसन्मान जपण्यासाठी -- मटा रविवार 8.3.2008
भाप्रसे संस्कृती आणि अपसंस्कृती -- अंतर्नाद
वादळाचा पाठलाग -- लोकमत (की लोकसत्ता)
गुजरात भूकंपानंतर -- लोकसत्ता
काश्मीर आपल्या रक्तांत आहे कां -- सकाळ
सुस्त दंड प्रक्रिया आणि तेलगी -- मटा
भाप्रसे पुनर्विचार हवा -- पद्मगंधा दिवाळी
आपण ठाम असलो तर
प्रशासकीय बदल्या -- सत्याग्रही विचारधारा
स्त्री उवाच --
विकासाबरोबरच समाज स्वास्थ्य हवे -- देशदूत
योगत्रयी आमुख
दु़ख विसरण्यासाठी
निसर्गोपचार -- निसर्ग शोभा दिवाळी
दादा -- माझे वडील
सांगलीचे दिवस -- अंतर्नाद 2003
कुसुमाग्रज हिन्दी कविता आकाशवाणी पुणे वरून
मिठाचे राजकारण -- अंतर्नाद
अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर अनिवार्य -- उमवित भाषण -- सकाळ 29.2.2008
शासनाची मागील व पुढील पन्नास वर्ष -- सा. विवेक, दिवाळी 2002
प्रशासकीय बदल्या -- सत्याग्रही विचारधारा 1998
आपण ठाम असलो तर --
* स्त्री पुरुष असमतोल - एक इशारा --
स्त्री भ्रूणहत्या आणि आपण -- अंतर्नाद
शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवणे शक्य आहे -- वसंत व्याख्यानमाला, पुणे, 19-5-96. -- दै. केसरी, पुणे, 20-5-96
विकासाबरोबरच समाजस्वास्थ्य हवे -- देशदूत -- 1996
उच्च शिक्षणावरील आर्थिक तरतूद -- IIPA, मुंबई, स्पर्धेतील लेख 1992
निवडणुकीचे अर्थकारण आवाक्या पलीकडचे
एकविसाव्या शतकांतील प्रसासन -- पद्मगंधा दिवाळी 2000
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

चिंतामण मोरया
... लीना मेहेंदळे

माझ जन्मक्षेत्र धरणगांव, माझ्या आजोबांच्या तरुण वयात हे गांव तालुक्याचे शहर बनू शकेल या क्षमतेच होत. तस झाल नाही कारण गांवाला बारा महिने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे साधन नाही, नदी नाही म्हणून ब्रिटिश राजवटीत धरणगांव ऐवजी पंधरा किलोमीटर दूर असलेल एरंडोल हे तालुक्याच ठिकाण झाल अगदी अलीकडे - पाच सात वर्षापूर्वी धारणगांव हा वेगळा तालुका करण्यांत आला.
माझा जन्म घरातच झाला. आई सांग ते जेव्हा अस वाटल की आज उद्यात कांही तरी होणार आहे, तेव्हा घरातली सर्वांत मोठी खोली - म्हणजे देवघर रिकामी केली आणी खाट वगैरे टाकून तिथेच तयारी केली. माझी आत्या आणी गांवातली एक सुईण यांनी मिळून बाळंतपण केल. दुपारी दीड दोन ची वेळ होती. वडील नोकरी निमित्त बाहेर होते. आजोबा दुपारच्या जेवणासाठी दुकानातून घरी आलेले. मुलगी झाली समजल्यावर थोडया कष्टी मनाने दुकानात परत गेले. दुपारी त्यांच्या कडे अचानक दोन तरुण आले. साडेतीन हजार रुपये घेऊन. त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधी तरी दुकानातून मोठी उधारी घेतली होती. आर्थिक तंगी मुळे ती फेडायला जमली नव्हती पुढे परिस्थिती सुधारली पण माणूस फार आजारी झाला. त्यातच मरण पावला पण मरतांना बजाऊन गेला 'अरे त्या सज्जान ब्राहमणाचे पैसे बुडवू नका वचन द्या.' म्हणूनच तेरावा उरकल्यावर दोघ मुल पैसे फेडायला माझ्या आजोबांकडे आली होती.
मग तर आजोबांनी लगेच दुकान बंद केल - नवजात नातीसाठी सोन्याची चेन आणी शेजारी पाजारी वाटायला मिठाई घेऊनच आले. बडी बेटी धनाची पेटी अस सर्वांना सांगून टाकल. योगायोग आसा की माझ्या दर वाढदिवसाला आई वडिलांना कुठून तरी लहान - मोठा अवचित धन लाभ होत आलेला आहे रक्कम क्षुल्लकच असायची पण कुठेतरी केलेल्या कष्टाचा राहून गेलेला मेहनताना अस त्याच स्वरुप असायच. माझे वडील उत्तम ज्योतिषी होते - पण पैसे घेत नसत. मात्र आम्ही बिहार मध्ये होतो. तिथे पध्दत अशी होती कि ज्योतिषाला काही तरी द्यावे. तरी तसेच बिहार मध्ये शेती उत्पन्नाची सुबत्ता फार. म्हणून मग वडिलांकडे कधी भाज्या, कधी फळ, कधी मिठाई अशी आणली जायची. असाच काहीसा लाभ माझ्या वाढदिवशी झाला, तर तो माझ्या नांवाने जमा होई.
त्यामुळे जन्मापासून मी आजोबांची अतिशय लाडकी होते. माझ्यावर कधीही हात उगारायचा नाही अशी घरांतील सर्वांना आजोबांची सक्त ताकीद होती. माझ्या सगळयाच सख्ख्या - चुलत - आते भावंडांनी लहान पणी कधी ना कधी मार खाल्लेला आहे. पण मी मात्र थाटात असायची -
आजोबा पंचक्रोशीत हुषार आणि हरिभक्त म्हणून गाजलेले होते. सन् एकोणवीसशे दहा मध्ये त्या काळात प्रतिष्ठेची मानली जाणारी व्हर्न्यक्युलर फायनल (सातवी) परिक्षा पास होऊन आपल्याच शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून लागले. त्यानंतर नोकरी सोडून देऊन गांवातली पहिली लाकडाची वखार टाकली आणि दुकानावर बसू लागले ते एकोणवीसशे पंचावन्न पर्यंत.


त्या काळांत धरणगांव हे प्रत्यक्ष तालुक्याचे ठिकांण नसले तरी गांवाचा रुबाब इतर तालुका शहरांसारखाच होता. धरणगांव ही एक मोठी बाजारपेठ होती. त्या काळांत गांवात सिमेंटचे रस्ते होते. गांवात विणकर समाज फार मोठा होता. तिथे हातभागावर तलम लुगडी, धोतर आणि सतरंज्या विणल्या जात. धरणगांव, धुळे, सूरत अशा तीन मोठया बाजारपेठ त्यांना मिळत. त्यामुळे आजोबांची वखार पण उत्तम चालली - शेजारी अजून कांही वखारी उभ्या राहिल्या. वखारीच्या खरेदीसाठी आजोबा पार कलकत्त्या पर्यंत जात. हे सर्व क्षेत्र गांवठाणाच्या थोड बाहेर, रेल्वे स्टेशनाच्या जवळ होते. निधून थोड पलीकडे चिंतामण मोरयाचे मंदिर होते. उत्तम पाषाण व फरश्यांनी बांधून काढलेल्या या मंदिरातील गणेश मुर्ति - स्वयंभू आहे. या मंदिरात प्रत्येकाच्या मनातली - इच्छा पूर्ण होते असे मानतात. आजोबांच्याही शंभर - दिडशे वर्ष मागे त्या मूर्तीचा जीर्णोद्वार करण्यांत आल्याचा संगमारवरी दगडावर कोरलेला आलेख आहे. लहानपणी आजोबा मला इथे होऊन यायचे. पाढे, स्तोत्र आणि गणित शिकवायचे, अस अंधुक अंधुक आठवत. आजी खूप खूप पूर्वीच वारली घरांत आजोबा, आई, आजोबांच्या धाकटया भावाचा मोठा गोतावळा व शिकण्यासाठी येऊन राहिलेली इतर नातेवाईक भावंड त्या सर्वांना अभिमानाने माझ्या गणितातील प्रगति बद्दल आजोबा बोलून दाखवीत.
मी सात वर्षाची असतांना वडिलांना मध्य प्रदेशात जबलपूर येथे कॉलेज मध्ये लेक्चारची नोकरी मिळाली. तेव्हा आजोबांनी वाटे हिस्से केले. वखार आपल्या धाकटया भावाकडे सुपूर्द केली आणी आम्ही जबलपूरला आलो.
मला शाळेचा पहिला दिवस आठवतो. मला सरळ तिसरी इयत्तेत घेतले होते. तेव्हा तोंडी गणितांची परंपरा होती. आजोबा तर उठ - सूठ तोंडी गणित विचारत आणि गणित सोडवण्याच्या नाना युक्त्या पण सांगत. त्यांना लगेच उत्तर सांगून मी मोकळी होत असे. पण शाळेत तस नव्हत. पाटी वर उत्तरे लिहायची होती. दहा तोंडी गणितांची दहा उत्तर. त्यांत माझा उत्तरे लिहिण्याचा क्रम उलट सुलट झाला आणि माझी तीन उत्तर चुकली. पन्नास पैकी फक्त पस्तीस मार्क. मला रडू कोराळल तेवढयांत मास्तर विचारु लागले सगळयांत जास्त मार्क पस्तीस - ते कोणी मिळवले ? कोण ही नविन मुलगी ? घरी आजोबांना हा किस्सा सांगितला. तेव्हापासून ते पाटीवर उत्तरे लिहायची - सवय करुन घेऊ लागले.
पुढे दोन वर्षांनी आजोबा वारले आणि आम्ही पण जबलपूर मध्य प्रवेश सोडून लांब दरभंगा, बिहार येथे गेलो. मात्र दर वर्षी उन्हाळयाच्या सुटीत धरणगांवला येत राहिलो. आजोबा साळी समाजाच्या सभागृहामध्ये भजन व कीर्तन करीत असत. तिथेच वडिल महिनाभर दररोज सकाळी ज्ञानेश्र्वरी वर प्रवचन करु लागले. हा क्रम अन्याहत पणे सुमारे चाळीस वर्ष चालला.
सुटीत धरणगांवला आल्यावर दररोज चिंतामण मोरयाच्या दर्शनाला जावे हा जणू नियमच ठरुन गेला. तसे गावात इतर ब-याच मंदिरात फेरुटका - मारला जाई पण गावकुसा बाहेर शेत आणि बाभळाच्या बनातून गेलेल्या पायवाटेने चिंतामण मोरयाला जाण्याची ओढ वेगळीच होती. तिथे वेळ असेल त्या प्रमाणे प्रदक्षिणा व अथर्व शीर्षाचा पाठ आम्ही करीत होतो. कधी फक्त एक तर कधी - एकदम एकवीस पर्यंत. तिथे जाऊन मला नेहमी वाटे - याला कांय मागायच ? याला सगळी माहित आहेच. पण इतर जण सांगत - अस नाही म्हणू - या मूर्तीपुढे आपले मन बोलून दाखवले - तर हवे ते मिळते. आजही आमच्या घरांत काही अडले नडले तर पटकन् मोरया, तुला नारळ फोडीन अस म्हटल जात.

दर वर्षी धरणगांवला येणाच्या कार्यक्रमामुळे तिथले रस्ते असे तोंडपाठ की डोळे मिटून किंवा अंधारात चालेले तरी हरकत नाही. आज इतकी वर्ष झाली पण ते सिमेंटचे रस्ते, धाब्याची घरे, दुकान, पिठाच्या गिरण्या, कोट (बाजाराची भली मोठी बांधीव जागा), मंदिर, शाळा वरीचशी झाडे पण तश्शीच आहेत. मात्र चिंतामण मोरयाचा परिसर बदलला. गेल्या दहा वर्षात मंदिराच्या आसपास इतर बरीच मंदिर काढली आणि त्या छोटया परिसराला खेटून खूप घर आणी खूप लोकवस्ती झाली.
आता माझ घरणगावी किंवा मोरयाला फारस जाण होत नाही. पण कुणीतरी धरणगांवचा वारसा सांगणारा संगणक शिकला आणि त्याने चक्क चिंतामण मोरया डॉट कॉम अशी साइट बनवून टाकली. ज्यांनी मोरयाची प्रचीति घेतली आहे असे शेकडो लोक त्याला दुवा देत आपल्या संगणकावर मोरयाचे दर्शन घेत असणार यात मला शंकाच नाही.

----------------------------------



Tuesday, August 30, 2011

पहिले दशक -1, 2 धरणगाव (म्हणून ते घर माझे आहे)

पहिले दशक

- 1 -
म्हणून ते घर अजूनही माझं आहे.

ते घर आता आमचे नाही. आता तिथे छोटू पाटील रहातो. त्याची आई आणि आजी निमंत्रण देऊन गेलेल्या आहेत -- ताई, एकदा घरी येऊन जा - घर अजूनही तुमचच आहे. मी माझ्या नेहमीच्या जळगांव दौ-यांमधे धरणगांवला जाण्याचा वेळ काढते. चिंतामण मोरया, तहसील कचेरी, बस स्टॅण्ड । पण घरी नव्हते गेले. पुढची किती काम राहिलीत अस मनाला बजावून आज तरी घरी जाण्याचा मोह सोड असा धाक देऊन, मी गेलेच नव्हते.
मग एक दिवस ठरवून वेळ काढला. छोटूला कांय सांगाचयी गरज - म्हणत कुणालाच सांगितले नाही. भाईसाहेबांच्या मुलांपैकी आता फक्त शशीच धरणगांवला रहातो. पण त्यानेही आता चिंतामण मोरया जवळ नवं घर बांधल आहे, तिकडेच रहातो. आयत्या वेळी वाटल तर त्याला सांगायच नाही तर एकटच जायचं असं ठरवून टाकलं.

मोरयाच दर्शन घेऊन त्या ओट्यावर पाच मिनिटं बसले - रिवाजा प्रमाणे - शशी आणि मीरा नेमके आजच बाहेरगांवी गेले होते. आता उठून ड्रायव्हरला सांगायच - तिकडे गांवात चलायचय बर आज !

आणि मनांत प्रचंड उलथापालथ झाली. अस वाटल की आता घरी जाऊन, सर्व घर पुन्हा एकदा नजरेत भरून घेतल्यासारख होणार नाही – ते पुढील काही काळासाठी शिदोरी म्हणून असणार नाही. आज घरी गेले तर परत निघतांना बहुतेक जुन्या सर्व आठवणी त्याच्या उंबरठयापाशी ठेऊन परतेन. ते दर्शन “पुनरागमनायच” असणार नाही. त्या भेटीनंतर घराशी असलेले भावनिक संबंध संपतील. आठवणी कायम रहातील पण त्रयस्थाप्रमाणे, फक्त वस्तुस्थितीदर्शक. तो अखेरचा निरोप ठरेल.
मग मी घरी गेलेच नाही. मोरयावरूनच जळगांव गाठलं आणि रात्रीच्या गाडीने मुंबई ! म्हणून ते घर अजूनही माझं आहे - अजून एक भेट होईपर्यंत तरी नक्कीच!
-------------------------------------------------------------------------------------

- 2 -

खूप जणांना बालपणातल्या अगदी लहान वयातल्या गोष्टी आठवतात. मला तेवढया नाही आठवत. आई सांगते - माझ्या वयाच्या दोन वर्षापर्यंत आम्ही लोणावळ्याला होतो - कैवल्यधाम इन्स्टिट्यूट मधे दादा नोकरी करत. पण त्यांना डॉक्टरेट मिळाली आणि इन्स्टिट्यूट ने आता तुम्ही जास्त चांगली नोकरी बघा असा निरोप दिला. आमच्या घरांत माझा अगदी छोट्या साइझ मधे फोटो आहे - पांढरा प्रॉक, हातात खूप फुलं आणि खूप हसरा चेहरा - मी एक - दीड वर्षाची असतांना दादांचे मित्र धोपेश्वरकर यांनी काढलेला - पुढे मोठेपणी एकदा त्यांच्याबरोबर फोन वर थोडे बोलणे झाले होते तेवढाच माझा आणि त्यांचा परिचय.

मग आम्हीं धरणगांवी आजोबांकडे (नानांकडे) रहायला आलो. दादांनी अनुक्रमे खांडवा (मध्य प्रदेश), व्यारा (गुजरात) आणि जबलपुरला नोक-या धरल्या - असे वयाच्या सातव्या वर्षी भी जबलपुरला आले. पैकी व्यारा येथील घराला मातीच्या भिंती आणि मातीची जमीन होती आणि आई त्यांना बाईकडून शेणाने सारवून घ्यायची एवढ मला आठवतं.

धरणगांवला नानांच्या घरांत सर्वत्र फरशी होती - फक्त स्वैंपाकघर आणि मडक्याची खोली सोडून. घर उत्तर - दक्षिण असं होतं - एल या अक्षराच्या आडव्या रेघेसारखं आणि उभ्या रेघेच्या जागी नानांचे धाकटे भाऊ अप्पा यांच घर होतं. माझा आजी वडिलांच्या लहानपणीच वारली होती. दादा त्यांच्या काकूलाच आई म्हणत. खानदेशांत अशी नात्यांची जवळीक फार. दूरच्या भावाच्या मामाला देखील सर्व मामाच म्हणणार. आई कोकणस्थ आहे, तिला फार पेच पडायचा नाती समजून घ्यायला.

अप्पांच्या घरातील बरीच मोठी जागा मातीची होती व तिला रोज शेणाने सारवले जाई. चुलत बहिणींमुळे मला तेही करता येऊ लागले आणि रांगोळीची कलापण. आसपासच्या मिळून एकूण सात घरांना अग्निहोत्री वाडा असे नांव होते, मात्र त्यापैकी एक घर पाटील यांचे व दुसरे एक सुतार यांचे होते. पाटीलांच्या कडील गाय, बैल, बकरी वगैरे सामाईक अंगणातच बांधली जात. त्यामुळे धारोष्ण दूध, सडा-सारवणासाठी हवे तेवढे शेण, गुराची सोबत या गोष्टी रोजच्यातल्या होत्या. त्यांचा कुत्रा वाघ्या आमचाही लाडका होता.

दादांच्या पडत्या काळातच आईने नागपूरच्या SNDT कॉलेजमधील सोईचा फायदा घेअन बाहेरून बीए करायचं ठरल. तेंव्हा ती परिक्षेपुरती दोन महीने नागपूरला होस्टेल मधे रहायची. त्या वेळी मी नानांकडेच असायची. एका आतेचे दोन मुलगे शिक्षणाला त्यांच्या कडेच रहात. अधून मधून दुस-या आतेचा मुलगा पण येई. शिवाय काकांच्या घरात माझ्यापेक्षा मोठी माझी चार चुलत भावंडं होती. त्यामुळे माझा सर्व वेळ धुडगुस घालण्यातच जाई. मला शाळेत घालायची घाई कुणालाच नव्हती. मात्र आईने मला अक्षर-ओळख, पाढे, लिहायला वाचायला आवर्जून शिकवले. तर नानांचा सपाटा असायचा सर्व पोरासोरांना तोंडी गणितं घालण्याचा. इतर मोठया भावडांना गांगरायला होत असतानाच मी मात्र पटापट तोंडी गणितं सोडवत असे. त्यामुळे मी नानांची लाडकी नात होते. त्यांनी मला अगदी लहान वयांत भूमिती पण शिकवली होती .

धरणागांव हे त्या पंचक्रोशीतील मोठं गांव- ते व्यापाराच ठिकाण होत. गांवाला म्युनिसिपाल्टी होती आणि बरेच रस्ते सीमेंट कांक्रीटंचे होते. फरशांनी व्यवस्थित बांधून काढलेला मोठा बाजार होता - त्याला कोट म्हणत. लांब गिरणा नदीवर धरण बांघलेलं होत. गांवात पोस्ट ऑफिस, तार ऑफिस आणि हायस्कुल होत. शिवाय भुसावळ - सूरत लाईन वर धावणारी एक्सप्रेस गाडी देखील धरणगांवी थांबायची - इतकं ते मोठं होतं. तरी पण गांवाला पिण्याच्या पाण्याची पर्मनंट सोय नाही म्हणून ब्रिटिशांनी तालुका ठिकाणासाटी एरंडोल या तुलनेने अत्यंत लहान गांवाची निवड केली होती. याची खंत सर्व गांवकरी बाळगून होते. अगदी अलीकडे म्हणजे सन् 2000 (?) मधे धरणगांव वेगळा तालुका करण्यांत येऊन धरणगांवी मामलेदार कचेरी आली तेंव्हा आता खंत संपली अस दादांनी बोलून दाखवलं.

धरणगांवी माझी मोठया चुलत बहिणींबरोबर संध्याकाळी फिरायला जायची ठिकाण म्हणजे राममंदिर, विट्ठल मंदिर - हे रोजचे. शिवाय कधी लांब जायचे ठरले तर बालाजीनानांचे मंदिर किंवा उलटया दिशेला चिंतामण मोरया ! बालाजी नानांचे मंदिरही विट्ठलाचेच होते पण त्यांच्या मागच्या अंगणात एक मोठा रथ अणि कृष्ण व पाचही पांडवांच्या पूर्णाकृती मातीच्या मूर्ती होत्या. दस-याला त्या रथांत पांडवांना बसवून रथयात्रा निघायची. त्या मंदिरात जाण्याच मुख्य आकर्षण ते रथ आणि मूर्ती हेच होते. या शिवाय चुलत भावा-बहिणींबरोबर कोटावर बाजाराला जाणे, पोस्टात जाणे, दळण आणायला गिरणीवर जाणे हे कमी प्रतीचे उद्योगही होते. मोठा उद्योग होता तो म्हणजे दुकानावर जाण्याचा.


नाना पंचक्रोशीत हुषार म्हणून नांवाजले होते. त्यांच्या काळांत म्हणजे 1890च्या आसपास कधीतरी ते व्हर्नाक्युलर फायनल (म्हणजे सातवी) ही त्या काळातली मानाची परीक्षा पास होऊन शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून नोकरीला लागले होते. पण संपूर्ण कुटुंबासाठी असेल असे कांही तरी कर असे त्यांच्या वडिलांनी सांगितल्यावरून त्यांनी शाळेची नोकरी सोडली आणि गांवाच्या अगदी एका टोकाला लाकडाचे दुकान काढले. त्यांचे पाहून कांही मुसलमान मंडळींनी देखील त्याच परिसरांत लाकडाची दुकाने, सॉ-मिल इत्यादी काढल्या. त्या आठदहा मुसलमान कुटुंबांच्या बरोबर नानांचा चांगला घरोबा होता. दुकानावर अर्थातच धाकट्या भावाला पण घेतले. दुकानावे सामान निवडण्यासाठी नाना गुजरातच कांय तर पार कलकत्त्यापर्यंत जाऊन आलेले होते . ते मराठी खेरीज गुजराती, आहिराणी इत्यादि पण छान बोलत. आजी लौकर वारली पण मुलांचा सांभाळ त्यांनीच केला. त्यांना कीर्तनाचा छंद होता. गांवात विणकर समाज (साळी समाज) खूप मोठा होता. हातमागावरच लुगडी, धोतरं आणि सतरंज्या उत्तम प्रतीच्या तयार होत असत. अशा त्या साळी समाजान नाना व बालाजी नाना मिळून कीर्तन करीत असत.

माझ्या लहानपणी दुकानावर नाना, अप्पा किंवा अप्पांची दोघं मुले - भाईसाहेब काका आणि बाळकाका ही असत. त्यांचा दुपारचा जेवणाचा डबा तयार करून घरून पाठवला जाई -तो बहुधा मी व चुलत भाऊ अनिल असे दोघे घेऊन जात असू. दुपारच्या उन्हांत पाय भाजायचे म्हणून आम्हीं अगदी पळत जात असू त्या काळांत मुलांना चपला वगैरे चंगळ नसायची.

नाना व अप्पांच्या दोन घरांच्या मधल्या जागेत सामाईक मोरी आणि मोठी विहिर होती. विहीरीवर तीन रहाट होते. एक आमच्या मोरीतील होता. दुसरा रहाट नानांच्या चुलत भावाचा होता आणि तिसरा गांवासाठी ठेवलेला होता - तिथे सकाळ संध्याकाळ गांवच्या सासुरवाशिणी, माहेरवाशिणींची बरीच गर्दी असाचयी. मी पण लहान वयातच रहाटावर पाणी काढायला शिकले. शिवाय दुकानांत जाताना वाटेत एक मोट लागत असे. तिथे थांबून पाणी काढणारे बैल पहाणे हा आमचा आवडता छंद होता.

खानदेशांत धाव्याची घरे असायची. म्हणजे असे की घरांच्या भिंती बहुधा माती किंवा विटा-चुनांच्या असत. त्यांच्यावर कांक्रीटचे छप्पर कसे चालणार? पण इतरत्र असतात तसे कौलाचे छप्पर देखील नसे. त्याऐवजी चटया व लाकडी वासे घालून त्यांच्यावर खारी मातीचे थर टाकीत. खानदेशांत सर्वत्र तापी नदीच्या गाळांत येणारी माती चिकण माती किंवा खारी म्हणून ओळखली जाते. तिचे थर टाकले की पाणी खाली झिरपत नसे, तर त्या मातीवरून वाहून जात असे. भिंतीच्या बरोबर वर एक फूट रुंद आणि एक-दीड फूट उंच अशी परोटी बांधली जायची. धाब्यामधेच मोठी चौकोनी जागा मोकळी सोडली असे त्यांना धारं म्हणतात त्यातून सूर्यप्रकाश खाली घरात जाई. पाऊस आला की शिडीने धाब्यावर चढून सर्व धारी त्यांच्या पत्राच्या झाकणांनी बंद करण्यासाठी एकच धांदल उडे. गांवातील बरीचशी धाबी एकमेकांना चिकटून असत. त्यांच्या वरून कुठेही जाण्यास लहान मुलांना मज्जाव नव्हता.

आमच्या घरून बाहेर पडले की लगेचच मोठा रस्ता येई तो पिठाची गिरणी, पोस्ट ऑफिस, हायस्कूल वरून बस स्टॅण्डवर जाई. त्याच्या दुतर्फा इतर मोठी दुकानं होती. मग एक मोठा कमानीचा दरवाजा होता व त्या पलीकडे आठवडा बाजारासाठी विस्तृत मैदान. कमानीवर सुभाषचंद्र बोसांचे मोठे चित्र होते व दरवाज्याचे नांवही सुभाष दरवाजा होते. शिवाय गांवात एक जुनी पडकी इमारत होती व ते घर म्हणजे झांशीच्या राणीचे आजोळ असं काही लोक सांगत. खरं-खोट्याची पडताळणी अजून झालेली नाही. पण एवढं मात्र खरं की त्यामुळे झाशीची राणी व सुभाष हे माझे पहिले बालपणाचे हीरो होते.

नानांच्या मोठया घराच्या पश्चिमेला रस्ता होता. त्या बाजूच्या खोल्या बहुधा अडगळीचे सामान ठेवण्यासाठी वापरत. मात्र उन्हाळयांत तिथे अंबांच्या राशी येऊन पडत आणी गवताच्या गंजीत ते आंबे झाकून ठेवले जात पिकण्यासाठी. त्या मोसमांत माझा आवडता उद्योग असायचा गंजीतून पिकलेले आंबे शोधून खाणं. ही परवानगी फल मला होती, आते-भावांना, चुलतभावांना नव्हती. त्यामुळे मी लहानपणी मनसोक्त आंबे खाल्लेले आहेत -- ते सुद्धा विविध जातींचे. घरांत रोज आमरस-पोळीचे जेवण असे. पण मला आंब्याचा रस खाणे - तोही दूध-तूप-साखर इत्यादी घालून खाणे हा प्रकार कधीच आवडला नाही. कदाचित म्हणूनही मला हवे तेवढे आंबे खायला परवानगी होती.

नानांची एक मजेदार आठवण आई सांगते. माझा जन्म आमच्या घरांतच झाला. सकाळीच पोटात काही तरी वेगळ वाटतय म्हणून देवघराची मोठी खोली रिकामी करून तयार करून ठेवली होती. बाळंतपण करण्यासाठी माझी आत्या अणि सुईण होत्या. दुपारी नाना जेवायल घरी आले - तो पर्यंत माझा जन्म झालेला. मुलगी झाली म्हणून जरा हिरमुसले होऊन ते लौकरच दुकानात परत गेले. सायंकाळी दोन तरुण मुले त्यांच्याकडे आली. कधीकाळी त्यांच्या वडिलांनी नानांकडून कर्ज घेतले होते आणि नानांनी त्याची आशा सोडून दिली होती. पण त्या शेतक-याने मरतांना मुलांना सांगून ठेवले - ``अरे, त्या सज्जन माणसाचे कर्ज वुडवू नका ``. म्हणून वडिलांचे सर्व कार्य पार पाडल्यावर सर्वात आधी ने दोघे भाऊ नानांकडे दोन हजार रूपये परत देण्यासाठी आले होते. मग नानांचा मूड एकदमच पालटला . लगेच सोनाराकडून माझ्यासाठी गळ्यातली सोनसाखळी घेऊन व मिठाई घेऊन पहिली बेटी, धनाची पेटी म्हणत घरी आले. गंमत म्हणजे माझ्या वाढदिवसाला पुष्कळदा असे घडते की कुठले तरी जुने येणे- मग कधी ने अगदी किरकोळी असेल - पण माझ्या वडिलांना मिळत राहिलेले आहे. मी लाडकी नात असण्याच एक हे कारणही असेल.

धरणगांवच्या घरातले नाना मला फारसे आठवत नाही. एकदा तंबोरा घेऊन भजन म्हणायला बसले होते - तेवढेच आठवतात, आणि गणित विचारायचे तेवढे. स्वप्नांत मात्र कधीतरी दिसतात- म्हणजे चेहरा ओळखीचा नसतो-- पण संदर्भ त्यांचाच असतो.
---------------------------------------------------------------------------------------------

Sunday, August 28, 2011

बजेटमधे 'आम आदमी'चे काय? मटा मधील माझी टिप्पणी 1 Mar 2011,

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-7598390,prtpage-1.cms
'आम आदमी'चे काय?
1 Mar 2011,
- लीना मेहेंदळे
माजी सनदी अधिकारी
एका आटपाट गावातील वस्ती गरीब, कमी गरीब आणि खाऊन पिऊन सुखी अशा तीन श्रेणींमध्ये विभागली होती. श्रीमंत म्हणावे असे कुणीच नव्हते. पण, गावाला श्रीमंतपणा हवा होता. मग सरपंचांनी दूर प्रांतातील काही धनिकांना विनंती करून गावात बंगला बांधण्यास सांगितले. त्यासाठी जमीन, रस्ता, पाणी, वीज देण्याची तयारी दर्शवली. बाहेरूनच त्यांची श्रीमंती ओळखता यावी अशी अट असणारे बंगले बांधले गेले. त्याबरोबर गावातील एकूण घरांच्या सांपत्तिक मूल्याची बेरीज झटक्यात वाढली आणि दरडोई सांपत्तिक मूल्याची सरासरीही वाढली.

बजेट मांडले जात असता मला हीच गोष्ट आठवत होती. आमचा 'जीडीपी' वाढत राहील. कारण आम्ही परदेशस्थ पाहुण्यांना बँक क्षेत्र, म्युच्युअल फंड आणि रिटेल बाजारात सहभागासाठी पाचारण केले आहे. यामुळे देश श्रीमंत होतो आणि आम आदमी गरीबच राहतो.

बजेटमध्ये आम आदमीसाठी काही खास गोष्टी केल्याचे सांगत अर्थमंत्र्यांनी ज्या बाबी गोष्टी अधोरेखित केल्या त्या अशा. नाबार्डकडे अधिक पतपुरवठा देण्यात आला आहे. पावणेपाच लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी उपलब्ध होतील. त्याचा व्याजदर ७ टक्के असला तरी कर्जफेड केल्यास ३ टक्के सूट मिळेल. यासाठी नाबार्डचे शेअर कॅपिटल वाढवून ३ हजार कोटींऐवजी ५ हजार कोटी केले आहे.

' ग्रामीण रोजगार हमी'त रोजंदारी मजुरी वाढवणे, 'स्वाभिमान' योजनेतून ८० वर्षांवरील वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ 'स्वावलंबन'मध्ये २० हजार खेड्यांना ब्रॉडबँडने जोडणे,अशा चांगल्या योजना आहेत. पण ब्रॉडबँडसाठी ऑप्टिकल फायबरसारख्या स्वस्त पर्यायाचा कुठेही उल्लेख नाही.

पतपुरवठा, शेतमालावर आधारित प्रक्रिया आणि शेतमालाचे नुकसान थांबवणे असा त्रिसूत्री कार्यक्रम हाती घेण्याची घोषणा आहे. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेची तरतूद ७ हजार कोटींवरून ९ हजार कोटी केली आहे. त्यात डाळींचे उत्पादन, तेलबिया, भाजीपाला, वरकड धान्य, चारा उत्पादन यांना जास्त सुविधा आहेत. अशा घोषणा मी १९७५ पासून ऐकत असून त्या यशस्वी झालेल्या नाहीत.

खाद्यान्न नासाडी थांबवण्यासाठी गोदाम, शीतगृहे उभारण्याची घोषणा आहे. पण, खाद्यान्न सडले तर त्याचा पुरवठा बीअर कारखान्यांना केला जातो. अशा पुरवठ्यासाठी खाद्यान्न सडवले जाते, या विरोधाभासाचे उत्तर दिलेले नाही. सिंचनाबद्दलही काही विशेष योजना नाही. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पदरातही फारसे काही नाही. महिलांसाठी बजेटमध्ये काहीही नाही. देशात ५० कोटी महिला असतील. पण, बजेटमध्ये मात्र अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस मिळून सुमारे २० लाख महिलांना दुप्पट पगारवाढ दिली आहे. देशात २० कोटींपेक्षा जास्त बालके असून त्यापैकी २० टक्के, म्हणजे सुमारे ४ कोटी बालके कुपोषित आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले असले तरी त्यांच्याकडे पुरेसे अधिकार दिलेले नाहीत.
-------------------------------------------------------------------------------------------------------

Sunday, August 21, 2011

अभियांत्रिकी -मूळ व DTP sanskriti साठी

अभियांत्रिकी प्रवेश : एका पालकाचा सुखद अनुभव
- लीना मेहेंदळे

 दै. महानगर - १९९4

   
१९९1-९2 या शैक्षणिक वर्षात कर्नाटकात एका मुलीने शिक्षण हा संवैधानिक हक्क आहे या बाबीचा उल्लेख करून सुप्रीम कोर्टापुढे अशी मागणी केली की, तिला मेडीकल कॉलेजात प्रवेश घ्यायची इच्छा आहे तिला मार्कही ब-यापैकी आहेत, असे असतांना तिला खाजगी मेडीकल कॉलेजमध्ये मोठया प्रमाणावर डोनेशन देण्याची गरज असता कामा नये. कारण हवे ते शिक्षण मिळू शकणे हा तिचा संवैधानिक हक्क आहे. या दाव्यावर बरीच उलट सुलट चर्चा झाली. वकीली मुद्दे मांडले गेले शेवटी कोर्टाचा निर्णय झाला, तो असा की खाजगी अभियांत्रिकी मेडीकल कॉलेज मधील संचालकांना या पुढे मन मानेल तशी फी आकारता येणार नाही आणी काळ्या मार्गाने तर नाहीच नाही. या कॉलेज मधे मेरिट आधारित प्रवेशासाठी शासनाने कांही नियम ठरवून द्यावेत. ते कशा प्रकारचे असतील याचे मार्गदर्शक तत्व पण कोर्टाने ठरवून दिले.
  
   तो पर्यन्त वस्तुस्थिती अशी होती की, अभियांत्रिकी मेडीकल शिक्षणासाठी फार कमी सरकारी महाविद्यालये तर मोठया प्रमाणावर खाजगी महाविद्यालये होती. खाजगी महाविद्यालयामध्ये सरसकट कॅपीटेशन फीचा  प्रकार रूढ होता. यामध्ये प्रवेश देण्यासाठी इच्छुक पालकांकडून मन मानेल त्या पद्धतीने पैसे वसूल केले जात असत. ते सर्व शिक्षण सम्राटांच्या खिशांत जात असत. या प्रवेशासाठी अभियांत्रिकीचा दर प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षाला दीड ते दोन लाख तर वैद्यकीय शिक्षणाचा दर वर्षाला पांच लाखापर्यन्त जात असे. एवढया मोठया प्रमाणावर कॅपीटेशन फी भरणे हे सर्वसामान्य पालकांना शक्य नव्हते. सरकारी माहविद्यालये जेवढया कमी किंमतीत विद्यार्थ्याना शिक्षण पुरवू शकतात तेवढया कमी पैशात खाजगी कॉलजेना हे शिक्षण पुरविणे शक्य नव्हते ही त्या कॉलेजांची अडचण वरवर मान्य करायलाच हवी होती. कारण सरकारी महाविद्यालयामध्ये ब-याच मोठया प्रमाणावर सरकारी मदतीच्या रूपाने पैसा ओतलेला असतो त्याचा फायदा त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणा-या विद्यार्थ्याना मिळत असतो. हा प्रवेश त्यांच्या हुशारीवरच अवलंबून असतो त्यामध्ये कुठलाही भेदभाव किंवा पक्षपात केला जात नाही. असे असले तरी देखील मुळात सरकारी महाविद्यालयाची संख्या अत्यंत कमी असते. गेल्या कित्येक वर्षात सरकारी महाविद्यालयांची गरज आहे असा निष्कर्ष महाराष्ट्रात फार पूर्वीच काढण्यात आला पण त्याला अनुसरून महाविद्यालये निघू शकली नाहीत. शेवटी १९८२-८५ या काळात मोठया प्रमाणावर खाजगी महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली. याच्या कितीतरी अगोदरच कर्नाटकामध्ये अशा प्रकारे खाजगी मेडीकल महाविद्यालयांना परवानी देण्यात आलेली होती. इतर राज्यातही हळू हळू अशी कॉलेजेस वाढतच होती. मात्र या कॉलेजना कांही नियम लागू करावेत अशी हिम्मत शासनयंत्रणेला दाखवता आली नव्हती. इथे हे ही नमूद करावे लागेल की शिक्षण - प्रसाराच्या नांवाखाली खाजगी संस्थांनी शासनाकडून कित्येक सवलती मिळवल्या होत्या ज्यांची एकूण किंमत कोटयावधीच्या घरात जाते. तरी देखील त्यांच्यावर प्रवेशाबाबत कोणतेही नियंत्रण आणणे शासन यंत्रणेला जमले नव्हते.

   या पार्श्र्वभूमीवर जेंव्हा कालांतराने म्हणजे १९९1 मध्ये कँपिटेशन फी विरुद्ध आवाज उठवला गेला त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सुनवाई करून तो निर्णय महाराष्ट्रात देखील लागू करावा लागला त्यावेळी कुठे पहिल्यांदा  खाजगी महाविद्यालयामधून प्रवेश देण्याबाबत शासनामार्फत नियम करण्यांचे ठरले. तेंव्हा कुठे खाजगी महाविद्यालयामध्ये प्रवेश धेणा-या विद्यार्थ्यांना भरमसाठ मनमानीपणाने फी द्यावी लागता सरकारने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे फी देऊन प्रवेश मिळण्याची सोय झाली.
   
सुप्रीम कोर्टाच्या आदेशा प्रमाणे सरकारने सर्वप्रथम अभियांत्रिकी वैद्यकीय फी किती असावी ते ठरविले. शासकीय महाविद्ययालयांना फीचे प्रमाण काय असेल त्याचबरोबर इतर खाजगी महाविद्यालयांच्या फी चे प्रमाण काय असेल असा विचार करण्यात आला. याबाबत जे महत्वाचे निर्णय घेण्यात आले ते खालील प्रमाणें --

1.  पहिले मार्गदर्शक तत्व कोर्टानेच ठरवून दिले होते की प्रत्येक महाविद्यालयाने हुषार विद्यार्थ्यांना सरकारी फी इतक्याच फी मधे शिक्षण द्यावे तसेच सर्व प्रवेशेच्छु विद्यार्थ्याना त्यांच्या हुषारीच्या निकषावरच प्रवेश द्यावा. यासाठी सर्व सरकारी महाविद्यालयातील १०० टक्के जागा सर्व खाजगी महाविद्यालयातील ५० टक्के जागा या विद्यार्थ्यांच्या हुशारीच्या आधारावर दिल्या जातील त्यांना फक्त सरकारी फी भरावी लागेल. ही फी दरवर्षी रू. ४०००/- असेल. ही फी अत्यंत कमी असल्याने या जागांना फ्री सीट म्हणण्यांत आले.

२. खाजगी महाविद्यालयामधील उर्वरित ५० टक्के जागा इतर मुलांना प्रवेशासाठी उपलब्ध होतील परंतु त्यांना जास्त फी भरावी लागेल. ही जास्त फी देखील वर्षाला फक्त रु. ३२,००० एवढीच असेल यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्याना पावती द्यावी लागेल. थोडक्यात हा पैसा परस्पर कोणाच्या खिशात जाणार नाही कुणालाही विद्यार्थ्याला अडवून त्याच्याकडून मनमानी फी घेता येणार नाही. या जागांना पेड सीट असे नांव पडले.

३. वरील उर्वरित ५० टक्के जागा देखील विद्यार्थ्याना हुशारी प्रमाणेच  द्याव्या लागतील. कारण सुप्रीम कोर्टाच्या संपूर्ण निकालाचा खरा रोख मेरिट प्रमाणे प्रवेश या एका मुद्यावर होता. सबब पेड सीटसमध्ये देखील मेरीट प्रमाणेच विद्यार्थ्यांची निवड करण्याचे ते सुद्धा राज्य शासनामार्फत करायचे ठरले. खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांत विभिन्न शाखांमधे जेवढया जागा निर्माण केल्या गेल्या होत्या त्याच्या मानाने दरवर्षी अभियांत्रिकी प्रवेश घेऊ इच्छिणा-या  विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. या साठी शासनाने पर प्रांतातील विद्यार्थ्यांना देखील हुशारीच्या आधारीवर प्रवेश द्यावेत असा नियम केला. या विद्यार्थ्यांना देखील फक्त रू० ३२०००/- प्रतिवर्षी हीच फी लावली जाते. यामुळे महाराष्ट्रांत कमी खर्चांत चांगले शिक्षण मिळते हा बोलबाला होऊन पुन एकदा महाराष्ट्र हे शैक्षणिक राजधानी म्हणून मान्यता पावले.

४. तरीही खाजगी संस्थांनी असा आर्थिक हिशोब दाखवला की जर त्यांच्या निम्म्या जागा रु. ४०००  फी घेऊन उरलेल्या निम्म्या जागा रु. ३२००० फी घेऊन भरल्या तर त्यांचा आर्थिक व्यवहार तुटीचा होतो. यासाठी तोडगा म्हणून आधी मान्य झालेल्या जागांच्या दहा टक्के ज्यादा जागा सर्व खाजगी कॉलेजेस्‌ ना वाढवून देण्यांत आल्या. यादहा टक्के जागांवर परदेशस्थ भारतीय नागरिकांच्या मुलांना या महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी जास्त फी लावायची परवानगी देण्यांत आली. यामुळे खाजगी महाविद्यालयांना थोडी जास्त फी घेण्याची सोय निर्माण झाली. या जागा संबंधीत खाजगी महाविद्यालयांना स्वतःच्या अखत्यारीत भरता येतील, त्यासाठी त्यांनी किती फी आकारावी किती प्रमाणात तसेच कुठल्या मुलाला घ्यावे हे संपूर्णतया महाविद्यालय चालकांच्या हातात राहील. असा शेवटचा नियम करण्यांत आला.

   हे सर्व नियम ठरवतांना शेवटच्या दहा टक्के जागांखेरीज बाकी सर्व जागा शासना मार्फतच भरल्या जातील असे ठरले होते. यामुळे विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे प्रवेश मिळतील ही जबाबदारी ज्या त्या महाविद्यालयाची रहाता सुप्रीम कोर्टानेच दिलेल्या मार्गदर्शनाबरहुकुम  सरकारचीच होती. महाराष्ट्रांत त्या वेळी माझ्या सारखे कित्येक हजार पालक असतील ज्यांना वाटत असे की खाजगी महाविद्यालयामधे बिनपावतीचे (म्हणजे सर्व हिशोब - अकाऊंटिंग टॅक्सेस चुकवून ) पैसे भरणे - तेही लाखांच्या घरांत, हे नैतिकतेला धरुन नाही आणि खिशाला परवडणारे तर नाहीच नाही. १९८४ या १९९४ या दहा वर्षांच्या काळात मी असे हजारो पालक मुले पाहिली आहेत ज्यांना हुषारी असून देखील आर्थिक परिस्थिती मुळे चांगले व्यावसायिक शिक्षण घेता आले नाही. त्यांचे निराश चेहरे, शासन यंत्रणेविरुद्धचा आक्रोश आणि शिक्षण सम्राटांपुढे पत्करलेली अगतिकता आणि लाचारी हे भी जवळून पाहिले आहे.  माझ्या मुलांवर तशी वेळ आलीच तर त्यांनी अभियांत्रिकी कडे जाता इतर शाखा निवडायची असाही मनाचा निर्णय घालमेल होत होती. अशा परिस्थितीत १९९४ चे प्रवेश या पद्धतीच्या मार्गदर्शक तत्वाखाली झाले आणि आमच्या घरांत सर्वांनी सुटकेचा श्र्वास सोडला. आता माझ्या मुलांना जे मिळेल ते त्यांच्या योग्यते प्रमाणे - कुणाच्या मेहेरबानी ने नाही हा आत्मविश्र्वास फार मोठा होता.
   १९९४ मधे माझ्या एका सहका-याच्या मुलाने या पद्धतीने इंजीनियरिंग कोर्स मधे दाखला मिळवला, त्यावेळी दिसून आले की शासन यंत्रणेने या कामासाठी फार चांगली त्यारी केली होती. पुढील तीन चार वर्षात ऍडमिशनचे काम जास्त सुधारत गेले. हा तमाम पालकांना मिळालेला दुसरा सुखद अनुभव होता. एका युनिव्हर्सीटी मधे प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना छापील फॉर्म सुलभ रीतीने मिळण्यापासून (मात्र ते अजनूही ऑन लाइन झाले नाहीत - ही कमतरता आहेच - ते ही फक्त एवढया छोटया कारणासाठी की त्यांच्य कडून नंतर फॉर्म फी घेता येऊ शकेल यावर शासनाचा विश्र्वास नाही) त्यांची मेरिट लिस्ट नोटिस बोर्डावर वेळेत लावणे, मुलाखती साठी हजार - हजार मुलांच्या बॅचेस बनवून त्यांना निरनिराळ-या वेळी बोलावून त्यांचा खोळंबा कमी करणे, कोण कोणत्या कॉलेज मधील सीट्स भरल्या जात आहेत त्यांची अनाऊंसमेंट करणे इत्यादि कित्येक प्रशासकीय बाबी लक्षपूर्वक केल्या गेल्या. खरे तर ज्या दहा - बारा अधिका-यांनी मिळून हे केले त्यांनी आपली प्रयत्न - गाथा लिहून काढली तर ते एक वाचनीय पुस्तक ठरेल यांत मला शंका नाही. त्या कानडी मुलीपासून सुरुवात करून या सर्व अधिका-यांना खुल्या दिलाने धन्यवाद. पण
सुमारे बारा वर्षानंतर सर्वोच्च न्यायलयाचा वरील निर्णय मोठ्या खंडपीठाने फिरवला. खाजगी विद्यापीठांना त्यांच्या मर्जीप्रमाणे फी आकारण्याची सवलत दिली आहे. ज्या उदात्त तत्वांचा उल्लेख पहिल्या निकालाच्या वेळी केला होता त्यांचे काय झाले। या सवलतींमुळे पुनः एकदा काळा पैसा देणाऱ्यांची चलती होणार आणि पैशाच्या जोरावर ऍडमिशन मिळवली जाणार पण पैसे नसणारे वंचितच रहाणार. या नव्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी तशा गरीब मुलांची बाजू मांडणारे कुणी नव्हते. सरकारनेही फारसा विरोध केला नाही. समाजाची, पालकांची, हुषार पण पैसा नसलेल्या विद्यार्थ्यांची बाजू न्यायालयापुढे आलीच नाही. म्हणून पुनः एकदा सर्वोच्च न्यायलयाकडे हा मुद्दा नेण्याची गरज आहे.
-------------------------------------------------------