Wednesday, March 7, 2007

13 पाणी उपसल्याने काय झाले ? The case of excessive lifting of water

13 पाणी उपसल्याने काय झाले?
written sometime in 1984 and published by Sakal Kolhapur
रोजगार हमी योजनेचा जन्म ७२-७३ च्या दुष्काळातून झाला. मागेल त्याला काम ही घोषणा सुरू झाली या योजनेचे यश मोजायचे झाले तर काय पट्टी लावावी या बद्दल श्री वि.स.पागे यानी एकदा मला एक फार चांगला निकष सांगितला होता. ते म्हणाले, तुमच्या घरातील शिळा भात पाण्याबरोबर खायला कोणी तयार आहे का? ओडिसा सारख्या दुष्काळी राज्यात त्यावर लोक तुटून पडतील पण आपल्या राज्यातील मजूरांवर ही पाळी येत नाही कारण रोजगार हमी योजनेमुळे त्यांच्या पदरांत कांही तरी पडते.

पाणी टंचाईबद्दल मात्र आपण असा सर्वकष विचार करू शकलो नाही. १९७२-७३ च्या पुढे सुरुवातीला तरी सर्व गावांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आपण फार मोठे व योजनापूर्वक प्रयत्न केल्याचे दिसून येत नाहीत आणि तरी देखील पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी १९७७-७८ पासून पुढ़े दरवर्षी सातत्याने जास्ती पैसे खर्च पड़त आहेत. विशेषतः गेली दोन-तीन वर्षे हा खर्च म्हणजे एक कायम बाब द्मदृथ््रड्ढद्यण्त्दढ़ थ््रत्द्मद्मत्दढ़ ण्ड्ढद्धड्ढ नाही मात्र या योजना बरोबर दिशेने चाललेल्या नाहीत असे खेदाने म्हणावे लागेल. म्हणूनच आता पाणी टंचाईसाठी खर्च होणारा पैसा नेमका कुठल्या कामासाठी खर्च होतो व त्यातून काय निष्पत्त्िा होते ते तपासून पहायची वेळ आली आहे.

पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनाने सात आठ योजना हाती घेतल्या आहेत. नवीन विहिरींची खोदाई करणे, जुन्या विहिरी पुनः एकदा खोल करणे, विंधन विहिरी (बोर वेल्स) घेणे, विहिरींवर पंप बसवणे, नदीच्या पात्रात बुडक्या विहिरी घेणे, गांवतळी खोदणे, सिंचन तलाव बांधणे आणि टँकरने पाणी पुरवठा करणे या त्या योजना आहेत. या सर्व योजनांसाठी पाणी कुठून येते याचा आपण विचार केलेला नाही. महाराष्ट्रात आपल्याला तीन प्रकाराने पाणी मिळते. एक, पावसाचे पाणी तलावांत साठवले गेल्याने. दुसरे, भूपृष्ठाखाली गेली कित्येक हजार वर्षे साठून राहिलेले पाणी. तिसरा प्रकार पश्च्िामेकडील सहयाद्री च्या रांगांमधून सुरू होणा-या नद्या. या नद्यांना पाणी मिळते ते देखील पावसामधूनच हिमालयातून वाहणा-या नद्यांचे एक बर आहे. उन्हाळयांत बर्फ वितळल्याने त्यांना पाणी मिळते. त्यामुळे या नद्या कोरडया होत नाहीत. तसे आपल्याकडील नद्यांचे नाही .
त्यामुळेच आपल्या पाण्याचा साठा कुठे व कसा आहे व सध्या त्याचा कसा उपयोग केला जातो हे तपासून पहायला हवे. पहिला साठा आहे भूपृष्ठाखाली पाण्याचा. हा साठा होण्यासाठी हजारो वर्षांचा काळ जावा लागला. हा साठा झाला म्हणून आपल्याला विंधन विहिरींचा कार्यक्रम हाती घेता आला, त्यातून आपल्याला शेतीसाठी व पिण्याचे पाणी मिळू शकले. १९६० ते १९७५ या काळांत खाजगी जमिनींवर शेतीसाठी विंधन विहिरींचा मोठा कार्यक्रम राबवण्यात आला. यासाठी जे भूजल सर्वेक्षण केले जाते त्यामुळे फक्त जमीनीच्या कोणत्या भागात पाणी आहे तेवढेच कळू शकते पण या पाण्याचा साठा किती मोठा किंवा लहान आहे हे कळू शकत नाही. आपण असे गृहित धरून चालतो कि हा साठा अमर्याद आहे. पूर्वी हा साठा उरसून शेतीसाठी वापरला जात असे. १९७५ ते १९८७ च्या काळांत पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी या पाण्याचा वापर मोठया प्रमाणावर केला गेला व इथून पुढे देखील या कामासाठी करावा लागणारच आहे. याचा अर्थ शेतीसाठी खाजगी विंधन विहिरी घेणे बंद झाले असे नाही. खाजगी व शासकीय विंधन विहिरींची संख्या दर वर्षाला मोठया प्रमाणावर वाढतच जात आहे.
या पाण्याचा उपसा देखील जास्तीत जास्त वेगाने वाढत आहे कारण गांवागांवातून ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमाची व्याप्त्िा वाढली आहे. त्यामुळे विहिरींवर पंप बसवून पाण्याचा उपसा वाढवला जात आहे. हे होत असतानाच निसर्गाने आपल्याला अत्यंत कठोरपणे दाखवून दिले आहे कि जमीनीतल पाण्याचा साठा अमर्याद नव्हता. जो साठा हजारो वर्षाच्या प्रयत्नाने साठला होता तो वीस-पंचवीस वर्षातच संपत आलेला आहे. त्यामुळे जुन्या विंधन विहिरी कोरडया पडत आहेत व नवीन विहीरांचे पाणी जेमतेम कांही महिनेच पुरते. ज्या तालुक्यांत किंवा ज्या जिल्हयांत विंधन विहीरींवर वीजपंप बसवण्याचे प्रमाण जास्त आहे, त्या त्या ठिकाणी विहिरी कोरडया पडण्याचे किंवा नवीन विंधन विहिरींना पाणी न लागण्याचे प्रमाण जास्त आहे. या प्रश्नाला उत्तर शोधतांना शेतीसाठी विंधन विहीरी किंवा वीजपंप दिले जाऊ नयेत अस आपण म्हणणार आहोत कां? तसे करणे अत्यंत चुकीचे ठरणार आहे. शेतीसाठी भसाभसा पाणी उपसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढते ही बाजू जितकी खरी, तितकीच दुसरी बाजू पण खरी आहे. शेतीला पाणी न देण्याने किंवा शेतीचे पाणी थांबवून आपला ग्रामीण महाराष्ट्र जगूच शकत नाही.

जी गोष्ट विंधन विहिरींची तीच गोष्ट नद्यांची महाराष्ट्रातल्या मुख्य नद्यांपैंकी कृष्णा गोदावरी व त्यांच्या सर्व
उपनद्यां पश्च्िामेकडून किंवा उत्तरेकडून दक्षिण पूर्वेकडे वहात जाऊन पुढे आंध्र प्रदेश, किंवा कर्नाटक मार्गे समुद्राला मिळतात. तापी मात्र पूर्वाभिमुखी नदी आहे व खानदेश मार्गे पुढे गुजरात मध्ये जाते. त्यामुळे या नद्यांचे सर्व पाणी अडवणे आपल्याला शक्य नाही. इतर राज्यांकरिता पाणी सोडणे आपल्याला भाग आहे. तरीसुध्दा या नद्यांवर व त्यांच्या उपनद्यांवर आपण बंधारे बांधतो. ते पाणी शेती व पिण्यासाठी वापरतो. नद्यांवर बंधारे बांधतांना आपण असे गृहीत धरले असते की, बंधा-याखालील भागांत चांगला पाऊस पडेल व त्यामुळे नदीच्या पाण्यावर अवलबूंन असलेल्या पण बंधा-याच्या कमांड मध्ये न येणा-या गावांना पूर्वीइतकेच पाणी मिळत राहील. दुर्दैवाने गेल्या दशकांत आपल्याला दिसून आले की, कित्येकदा बंधा-याखालील गांवामध्ये नेहमीसारखा पाऊस पडत नाही. म्हणूनच जरी आपण बंधा-याच्या कमांड खाली कांही नवी गांवे आणू शकलो असलो तरी दुसरीकडे कांही अशी गांवे कोरडी होत गेली जिथे पूर्वी वर्षानुवर्षे लांबून जाणा-या नदी- ओढयाचे भरपूर पाणी झिरपून मिळत असे व त्या पाण्यावर शेती होत असे. विशेषतः जी गांवे रेन शैडो भागांत मोडतात तिथे ही समस्या मोठया प्रमाणावर जाणवते. उदाहरणार्थ मराठवाडयातील जिल्हे व पश्च्िाम महाराष्ट्रातील जिल्हे किंवा तापी बेसिनचा विचार करायचा म्हटला तर तापीवरील बंधा-यांच्या पश्च्िामेकडील तालुक्यांना हा प्रश्न मोठया प्रमाणावर भेडसावतो. गेल्या ३-४ वर्षात तर ही समस्या इतकी वाढली आहे की, पिण्याच्या पाण्यासाठी बंधा-यावरून नळ पाणी-पुरपठा योजना कार्यान्वित केल्याशिवाय या गांवाना शेतीलाच नव्हे तर पिण्याला देखील पाणी मिळू शकत नाही. या पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करतांना खर्च भरपूर येतो. वेळही जातो, किमान चार-पांच महिने तरी जातातच. शिवाय नळ फोडून शेतीसाठी पाणी चोरण्याचा प्रयत्न केला जातो, इतर कारणांमुळे नळ तुटतात. या योजनेच्या पाईपलाईन आणि पंपांच्या दुरुस्तीचा प्रश्न येतोच आणि जेंव्हा बंधा-यातील पाणी कमी होते तेंव्हा या योजनाच निष्फळ ठरतात. बंधारे बांधतांना त्यांचे पाणी पुरेल असे आपण गृहित धरून चाललो होतो पण बंधा-यात देखील वर्षभर पुरेल इतके पाणी साठत नाही व साठलेले पाणी वाफ होऊनच जास्त वाया जाते.

या सर्व चर्चेचा ओघ एकाच गोष्टीकडे वळतो. तीस-चाळीस वर्षापूर्वीच नव्हे तर अगदी अलीकडे ९९७२-७३ च्या दुष्काळानंतर देखील पावसाची टंचाई निर्माण होईल या शक्यतेचा आपण कधीच विचार केला नव्हता. पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी किंवा टिकवून धरण्यासाठी देखील आपण कांही प्रयात्न केलेले नाहीत हे उधड आहे.

गेल्या दहा पंधरा वर्षांचे प्रत्येक तालुक्याचे पावसाचे आकडे पाहिले. तर आपल्या लक्षांत येईल पावसाचे प्रमाण अतिशय वेगाने कमी कमी होत गेले आहे. अगदी घाट माथ्यावरील तालुक्यांचे आकडे पाहिले तरी हीच समस्या दिसून येते. इगतपुरी, खंडाळा, महाबळेश्र्वर, शिराळा, मावळ यांसारखे सहयाद्री च्या घाटमाथ्यावरचे मधील तालुके काय किंवा साक्रीसारखे सातपुडाच्या रांगेतले तालुके काय, या प्रत्येक तालुक्यांत गेल्या १५ वर्षात पावसाचे प्रमाण तीन चतुर्थाश ते निम्म्यावर येऊन ठेपले आहे. नद्यांच्या वरच्या भागात ही अवस्था आहे. तर बंधा-याखालील तालुक्यांमध्ये, जिथे मुळातच पावसाचे प्रमाण कमी होते, तिथे यापेक्षाही वाईट अवस्था आहे. तिथेही नद्यांचे पाणी पुरेसे नाही. शिवाय तिथल्या भूपृष्ठाखालील पाण्याचे पुनर्भरण होऊ शकले नाही हे ही गेल्या कांही वर्षात स्पष्टपणे दिसून आले आहे.

आता इतक्या मोठया दुष्काळानंतर तरी आपण दोन गोष्टी ओळखण्याची वेळ आली आहे. पहिली म्हणजे शेतीसाठी जाणारा पाण्याचा ओघ थांबवला पाहिजे, व ते देखील शेतीचे नुकसान न होऊ देता. थोडक्यांत म्हणजे आपल्याला पाण्याचा कमीत कमी वापर करायला आपण शिकले पाहिजे.
something to add
------------------------------------------------------------------------------

No comments: