नीती आणि दंड या माझ्याच विभूति आहेत
दैनिक सकाळ दिनांक ११.२.९७
भगवद्गीतेत ज्या कित्येक संकल्पनांची मांडणी आणि विवेचन केले आहे त्यातली एक अतिशय सुंदर कल्पना म्हणजे विभूतियोग. केषु केषु च भावेषु चिन्त्योसि? तुला मी कोणकोणत्या रूपात पाहू? तूच तुझ्या रूपडायाचे वर्णन कर. असे अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो. देव अनाकलीनीय आहे. निर्गुण, निराकार आहे वगैरे सगळे सिद्धान्त बाजूला ठेवून भगवतांनी आपल्या ओळखीच्या खुणा सांगितल्या. आपण देवापर्यन्त पोचू शकत नाही, देवपण मिळवू शकत नाही ही कल्पना मोडीत काढून प्रत्येक माणूस देवपण मिळवू शकतो अस सांगणारा हा विभूतियोग आहे, उत्तुंगाचा ध्यास घेतलेल्या मनाला मोठे आव्हान देऊन जी देवपणाची प्राप्ती आपल्या सर्वाना सुणावत असते, पण अप्राप्य वाटत असते, ते सहज शक्य असून पुढे हो आणि ते प्राप्त करून ये असे सांगणारा हा विभूतियोग. भगवतांच्या अपस्थितीच्या खाणाखुणांची साध्या सोप्या मनमोहक उदाहरणामधून ओळख करून देतांना हा अध्याय सहजगत्या आपल्या कर्तृत्वाला कधी हात घालतो ते कळून पण येत नाही आणि त्याचे आमिष काय, तर साक्षात त्या भगवतांची समकक्षता मिळवणे! एक वेगळी ध्येयासक्ति आपल्या, मनांत निर्माण करून भगवंत (किंवा व्यास गुनी) अलगदेपणे विश्र्वरूप दर्शनाकडे वळले खरे, पण हा दहावा अध्याय आपल्याला पुनः पुन्हा मागे ओढून आणतो आणि गुंगवून टाकतो.
माझा अस्तित्व कुठून कस सुरू झाल ते माझ्या शिवाय कुणालाच माहीत नाही. सर्व ऋषि, मुनी, देव प्रजापती, मनु- थोडक्यांत ज्यांनी कुणी सुरवातीच्या छोटया अवस्थेपासून पुढे मोठया प्रमाणावर ही ऋष्टी
सांभाळली व लोकांच भरण-पोषण करून सृष्टीचा व्यापार वाढवला-त्या सर्वांची उत्पत्तीमात्र माझ्यापासून झाली. असे श्रीकृष्णाने म्हटल्यावर अर्जुनाने त्याला सांगून टाकल- सगळीकडे मी आहे, सर्वाचा आदि मी आहे, असल व्यापक पण निराकर वर्णन मला नको. तुझ्या उस्तित्वाच्या ठळक खुणा, उदाहरण, ज्यांव्याकडे पाहून मला तुझ्या असण्याची प्रचीती येईल, ज्यांच्यामधे तू प्रकर्षाने वास करीत आहेस, अस पटेल अशांची वर्णन मला सांग. म्हणजेच संपूर्णपणे निराकारता सोड, तुझ साकार रूपच मला सोईच आहे. तिथे तू असलास तर सांग! या प्रश्नावर श्रीकृष्णाने उत्तर दिले अर्जुना, माझ्या साकार रूपाच्या खुणा सांगायव्या झाल्या तरी त्यांची अगणित उदाहरणे देता येतील. पण माझ्या कांही ठळक खुण तुला सांगतो.
आणि अशा ठळक खुणा वाचतांना आपल्याला प्रत्यय येतो की सामर्थ्य, कर्तृत्व, सत्य आणि विजीगिपु वृत्ति इथे भगवंतानी स्वतःच अस्तित्व जास्त प्रकर्षाने असल्याच कबूल करून टाकल.
मी सर्वच भूतांचा आत्मा आहे, त्यांचा आदि, मध्य आणि अंत मीच आहे. तरी पण तुला माझा विचार करायचा असेल तेंव्हा तू सर्व आदित्यांपैकी विष्णूचा, सर्व प्रकाशमान वस्तूंपैकी सर्याचा, आकाशस्थ चांदण्यांपैकी चंद्राया, वा-यामधे अतिवेगावान मरीचीचा आयुधांमधे वजाचा, प्राण्यामधे सिंहाचा, पक्षांमधे मरूडाचा जलचरांमधे, मगरीचा, शस्त्रधारींमधे रामाचा, पांडवांमधे अर्जुनाचा, वृष्णींमधे स्वतः माझा, मुनींमधे व्यासमुनींचा, सापांमधे वासुकीचा, सेनापतीमधे स्कंदाचा विचार कर.
या शिवाय ऐरावत, हत्ती, उच्चेश्रवा नामक घोडा, कामधेनु नांवाची गाय, राक्षसराज प्रल्हाद, देवराज इंद्र, यक्षराज कुबेर, जलाधिपती वरूण, देवगुरू बृहस्पति, माणसांमधे राजा, अशा सामर्थ्यशाली व्यक्तीमध्ये माझेच प्रतीक बघ. अनेकांपैकी सर्वश्रेष्ठ कोणी एक अशा खुणांबरोबरच निसर्गातील भव्यता, आणि सौंदर्य दाखविणा-या खुणांचा देखील समावेश केला आहे. पर्वतामधे उच्चतम शिखर असलेला मेरू पर्वत, नद्यांमधे गंगा, स्थिर वस्तूंपैकी हिमालय, तेजस्वी वस्तूपैकी खुद्द अग्नि, सरोवरांमधे समुद्र, ऋतुमधे वसंत, सर्व महिन्यांमधे मार्गशीर्ष आणि सर्व वेदांमधे गेयेतेमुळे गोड झालेला सामवेद अशा सौंदर्याच्या खुणांकडे पण स्वतःचे प्रतीक म्हणून श्रीकृष्णाने बोट दाखवलेले आहे.
फक्त व्यक्तीमधेच नाही तर कलाकृतींमधे पण स्वतःच्या खाणाखुणा सांगतांना त्यांच्यातील दिव्यत्वाचे भान आपल्याला करून दिले आहे वेदांमधे सामवेद, कुठल्याही साहित्यिक रचनेत तिची सुरूवात, तिचा उत्कर्षबिंदू व शेवट, छंदामधे गायत्री छंद, यंज्ञापैकी इतर कोणत्याही अवडंबराची गरज नसलेला जपयज्ञ! ; याचबरोबर इंद्रियांपैकी इतर कोणत्याही अवडंबराची गरज नसलेला जपयज्ञ! याचबरोबर इंद्रियांपैकी मन, सर्व सजीव प्राण्यामधे सजीवपण म्हणजे चैतन्य, ज्ञानीजनांचे ज्ञान, गुप्तपणासाठी मौन, सत्वशील माणसाचे सत्व, चर्चा-संवादातील वादपटुता, व्यवसायामधे जय, तेजस्वी माणसाचे तेज आणि संयमशील व्यक्तीमधला यम! ही कृष्णाने आपली रूपे म्हणून सांगितली. यातील यम हा शब्द समजून घेण्यासारखा आहे. पातंजली योगसूत्रामधे सत्य, अहिंसा, अस्तेय (म्हणजे स्वकष्टार्जित वस्तूशिवाय इतर वस्तू न स्वीकारणे) ब्रम्हचर्य, आणि अपरिग्रह (म्हणजे गरज नसलेली वस्तू संग्रह करून न ठेवणे) असे पाच गुण म्हणजे यम अशी व्याख्या केली आहे. आणि आपल्या ग्रंथांनी यम धर्म यालाच मृत्यूची देवता पण मानले आहे तसेच नचिकेत यम संवादाचे सार असे आहे की ज्याने वरील पाच यम आत्मसात केले असतील त्याला मृत्यूची भिती नाही. अशा यमांच श्रेष्ठत्व सांगायला भगवान विसरले नाहीत, आणि स्वतःच्या प्रतीकांमधे त्यांचा समावेश केला आहे.
मी मृत्यू आहे, काल आहे, धाता आहे. म्हणजे गतकाळात सृष्टी घडवणारा धाता मीच आहे तर भविष्यकाळातील होणे किंवा असणे ही क्रिया पण मीच आहे अशा शब्दात स्वतःचे प्रतीक सांगताना जीवन, मृत्यू, काळ, वेळ या सर्व विषयांना तात्विक चिंतनाच्या अंगाने स्पर्श केला आहे.
माणसाला हवेहवेसे पण फक्त कर्तृत्व आणि प्रयत्न यांच्यामुळेच साध्य होऊ शकणारे कीर्ती, श्री वाणीसामर्थ्य, स्मृति, मेधा, क्षमा आणि धृति हे संपादनयोग्य गुण पण स्वतःची ओळखे म्हणून सांगितले, याशिवाय अगदी सुरवातीलाच बुद्धि, ज्ञान, दान, भय-अभय, यश-अशय, सुख दुख, असणे व नसणे हे देखील
स्वतःचेच प्रकट होण्याचे भाव म्हणून सांगिले आहेत. यावरून स्वतःच्या विकासासाठी माणसात कोणते गुण असावेत त्यांची कल्पना येते.
असे प्रकारे उत्कर्षांची, प्रयत्नांची, यशस्वीतेची, परंपरा सांगणारा- तिथे तू मला निश्चितपणे जाण अस सांगणारा हा विभूतियोग! आळस व अकर्तृत्वाला झटकून टाकून भव्यता आणि दिव्यता संपादन कर - तस केल्यास तू माझ्या समकक्ष होशील कारण लोकांना माझी खूण पटावी म्हणून मी तुझ्याकडे बोट दाखवीन- तुझ्यावरून त्यांना माझे अस्तित्व जाणवेल, तुझ्याकडे पाहून तुझ्या मार्फत त्यांना माझे दर्शन घडेल व माझी अनुभूति मिळेल अस हा विभूतियोग सांगतो, अशा प्रकारे व्यक्तिच्या व समाजाच्या विकासाठी कर्तव्यपयायणतेची दिशा दाखवून देतो.
ही दिशा दाखवतांना समाजाचा उत्कर्ष जपणारी आणि व्यक्तिइतकेच समाजासाठी महत्वाचे असलेले दोन गुण सांगितले आहेत ते आहेत- शासन चालवणा-यामधे दंड करण्याची क्षमता आणि नीती! दंड करण्याची क्षमता आणि दंडुकेशाहीत फरक आहे, न्याय अन्यायाचा, सत्य असत्याचा सारासार विचार व विवेक करून प्रभावीपणे दंड देणे, त्या दंडामुळे इतर दुष्प्रवृत्त लोकांना आळा बसणे आणि सज्जनांच्या सत्प्रवृत्तींना विकासाचा मार्ग मोकळा रहाणे हा त्या दंडाच्या शक्तीमधला दैवी गुण, असा दंड देऊ शकणे ही भगवंतांनी स्वतःची खूण म्हणून सांगितली आहे.
त्याचप्रमाणे नीतिरस्मि जिगीषिताम् हे सूत्र देखील एक परमोच्च आदर्श घालून देते.जिंकण्याची इच्छा असणाऱ्यांमधे नीतिनेच विजय मिळवण्याची चाड असणे हा गुण भगवंतांनी स्वतःची खूण म्हणून सांगितला. नीतिनेच विजय मिळवून नीतिनेच राज्य चालवणे ही ईश्वराची विभूति आहे. आपल्यामधे शासनकर्ता हा विष्णूरूप समजला जातो. तो नीतिनेच राज्य करील, कुणाला लुबाडणार नाही, प्रसंगी युद्ध करावे लागले तरी युद्धांत अनीतिने वागणार नाही, आणि शासनांत तर नाहीच नाहीया भूमिकेने जो वागेल तो ईश्वराच्या समकक्ष होईल.
जे कांही अस्तित्वात आहे, जीवनमय, आहे त्याचे बीज मीच आहे, जिथे जिथे तुला विभूति दिसेल, श्री, सत्व, उर्जा, किंवा तेज दिसेल ते ते माझ्याच अशातून प्रकट झालेले व माझाच ठावाठिकाणी दाखवून देणारे आहे, ही ओळख, ही खूणगांव अर्जुना, तू मनाशी बाळग अस सांगतांना व्यासांनी आपल्या सर्वासमोर एक जादुगरी पसरून ठेवली आहे - तस वागून, तसे गुणसंपादन करून देवत्व मिळवाव्याचे आव्हान देऊन ठेवले आहे. देव कुठेतरी लांब नसून आपल्या प्रयत्नांत, आपल्या सत्वात, आपल्या नजरेव्या टप्प्यांत आहे. फक्त आपण आपल्याला ओळखून घेतले पाहिजे!
-------------------------------------------------------------------
Thursday, March 22, 2007
3/ नीती आणि दंड या माझ्याच विभूति आहेत -- Ch 10 of bhagvadgeeta
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 1:27 PM 0 टिप्पणियाँ
05 जा जरा चौकटीपलीकडे! (Look beyond your frame)
05 जा जरा चौकटीपलीकडे!
महाराष्ट्र टाइम्स दिनांक २९.७.९८
ही गोष्ट सन १९८१-८२ मधली. मी तेव्हा औरंगाबाद व सांगली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी होते. एकात्मिक ग्रामीण विकास योजना (आय.आर.डी.पी) नुकतीच 'गरीबी हटाव' या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जाहीर झाली होती. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना थोडेसे भांडवल कर्जरूपाने द्यायचे व त्यातून त्यांनी एखादी भांडवली वस्तू विकत घ्यायची, उदा. गाय, हातमाग, ठेला इत्यादी. त्या वस्तूंच्या आधारे एखादा जोडधंदा करायचा आणि अशा त-हेने त्यांच्या कुटुंबाला पूरक उत्पन्न मिळून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायची. अशा प्रकारची ही योजना होती. या योजनांची सर्व जबाबदारी गट विकास अधिकारी व पर्यायाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर होती. अशा पात्र व्यक्ती शोधून त्यांच्या कर्जाची प्रकरणे मंजूर करणे, त्यांना व्यवसायात उभे करणे हे उद्दिष्ट सर्वांना देण्यात आले. या योजनेत बैंकेचे अधिकारी व गट विकास अधिकारी किंवा प्रकल्प अधिकारी, यांच्या आपसातील सहकार्याशिवाय केस मंजूर होऊ शकत नाही, अशा परिस्थितीत प्रकल्प अधिकारी, बैंकेचे अधिकारी आणि या योजनेतील इतर कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या कामाबरोबरच त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कथाही निश्चितपणे कानावर पडत असत.
माझ्या फार चांगल्या ओळखीचे एक वरिष्ठ बैंक अधिकारी होते. एकदा त्यांच्याबरोबर सहज चर्चेत वरील मुद्दा निघाला असता कोणीही बैंकअधिकारी या प्रकरणी भ्रष्टाचार करीत नाही, असे त्यांनी मला ठामपणे सांगितले. त्यांच्या मते या कार्यक्रमाची अंमलबजावणीची पद्धत अशी आहे, की कोणीही बैंकअधिकारी यामध्ये भ्रष्टाचार करू शकत नाही. मात्र प्रकल्प अधिका-यांचे भ्रष्टाचाराचे बरेच किस्से मला ऐकवण्याची त्यांची तयारी होती. सांगली जिल्ह्यातील एक-दोन बैंक अधिका-यांबद्दल कागदपत्रे मी पाहिली असता त्यात गैरव्यवहाराची मोठी शक्यता दिसत होती. सबब 'तुम्ही काही बैंक अधिका-यांची कागदपत्रे स्वतः तपासली का' असा प्रश्न मी त्यांना विचारल्यावर 'त्याची गरज नाही' असे आपले निश्चित मत त्यांनी पुन्हा एकदा दिले.
शेवटी मी त्यांना एकच प्रश्न विचारला की, आपले संबंध वैयक्तिक ओळखीच्या व मैत्रीच्या पातळीवरून आहेत, आपल्या दोघांनाही एकमेकांच्या प्रामाणिकपणाबद्दल, कार्यक्षमता व खरेपणाबद्दल शंका नाही, असे असताना मी जर काही बैंकअधिकारी 'आय.आर.डी.पी.' मध्ये भ्रष्टाचार करतात, अशी माझी वैयक्तिक माहिती असल्याचे संबंधित अधिका-यांच्या नावा-निशी सांगितले, तर ते त्यावर विश्वास ठेवून सखोल चौकशी करतील का? की त्यांची बैंकिंग सिस्टिम अतिशय उत्तम व विश्वसनीय असल्यामुळे माझ्या आरोपांकडे दुर्लक्ष करतील? यावर त्यांचे उत्तर असे की, बैंक सिस्टिम अतिशय उत्तम व भ्रष्टाचारास थारा न देणारी असल्याने त्यांचा त्यावर विश्वास आहे. आमची मैत्री व माझा सचोटी, तसेच वरिष्ठ पदावरील माझा अनुभव या तिन्ही गोष्टींकडे ते दुर्लक्षच करतील आणि आय.आर.डी.पी. मधील सर्व भ्रष्टाचार हा फक्त प्रकल्प अधिकारी व जिल्हा परिषदेतील कर्मचारीच करतात, या त्यांच्या मतात बदल होणार नाही. 'मी ज्या बैंक सिस्टिममध्ये काम करतो, त्याबद्दल मला अभिमान आहे. तुमच्याकडील माहितीदेखील माझ्या या अभिमानाच्या आड येऊ शकत नाही' असा काहीसा सूर त्यांच्या बोलण्यामध्ये होता. व्यक्ती म्हणून माझ्याबद्दल त्यांना कितीही आदर वाटत असला, तरी माझी वैयक्तिक माहिती जास्त विश्वसनीय का ते ज्या व्यवसायात आहेत त्या व्यवसायाबद्दलचा त्यांचा ढोबळ अंदाज जास्त विश्वसनीय, या प्रश्नात त्यांची ओढ त्यांच्या व्यवसायकडेच जास्त होती. थोडक्यात काय, तर तुम्ही विरूद्ध मी, असा हा विषय नसून तुमचे खाते विरूद्ध माझे खाते असा हा विषय होता.
॥॥॥
१९८५ ते १९८८ या काळात माझ्या पोस्टिंगमध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात देवदासींच्या आर्थिक पुनर्वसनाच्या काही योजना मी राबबिल्या. सर्वसाधारणपणे उपेक्षित स्त्रियांपैकी अति उपेक्षित अशा या महिला! आय.आर.डी.पी. मधून या स्त्रियांना काही आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळवून देणे, त्यासाठी त्यांना कर्ज मिळवून देणे, मशिन्स विकत घेऊन देणे, त्यांच्यासाठी खेळत्या भांडवलाची व बाजारपेठेची तरतूद करणे, पुढेमागे या सर्व गोष्टी त्यांना स्वतः करता याव्यात यासाठी त्यांना उद्युक्त करून तसे प्रशिक्षण देणे यासारखी कित्येक कामे मी हाती घेतली. त्या वेळी मी उद्योग विभागातील एका कार्पोरेशनमध्ये होते. देवदासींना उद्योजक बनविण्याच्या या एकूण प्रवासात माझ्या संस्थेलाही सुरूवातीस बराचसा खर्च करावा लागणार होता. परंतु मी पडले उद्योग खात्यात व देवदासी हा शब्द म्हटला की सरकारच्या कुठल्याही अधिका-याच्या डोळयासमोर प्रथम समाज कल्याण खाते येते. त्यामुळे सतत तीन वर्ष माझ्या संस्थेला करावा लागणारा खर्च उद्योग विभागाच्या बजेटमधून करावयाचा का समाजकल्याण खात्याच्या बजेटमधून करावयाचा, हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला गेला. सुदैवाने आमचे उद्दिष्ट व काम चांगले आहे म्हणून 'त्यात खीळ घालू नका, त्यांना तात्पुरती परवानगी देऊन 'अंतिम परवानगी समाज कल्याण विभागाकडूनच मिळवावी' अशी अट घालून थोडाफार खर्च करण्यास परवानगी द्या', अशा सूचना उद्योग सचिव यानी दिल्यामुळे ते काम टिकविणे व त्याला पुढे गती देणे मला शक्य झाले.
परंतु शासनामध्ये असा दृष्टिकोण नेहमी ठेवला जात नाही. दुसरे एखादे उद्योग सचिव काय भूमिका घेतील हे सांगता येत नाही. समाजकल्या विभागाचे बजेट प्रत्यक्ष हातात पडल्याखेरीज या कामाबाबत पुढे काही करू नका किंवा या कामासाठी आपल्या उद्योग विभागाचा पैसा खर्च करू नका, असे आदेश मला दिले गेले असते, तर ते काम थांबविणे मला भाग पडले असते. या उलट समाज कल्याण विभागाची फाईल ज्या प्रश्नाभोवती तीन वर्ष फिरत राहिली तो प्रश्न असा की, आपल्या विभागाचे बजेट वापरून उद्योग विभागातील एखाद्या अधिका-याने देवदासी स्त्रियांसाठी योजना का राबवावयाची? मात्र माझे मत असे होते की, एरवी देवदासींच्या बाबतीत चांगल काम कुणी करून दाखवत नाही. असे असताना खात्याचे कप्पे थोडे बाजूला सारून उद्योग विभागानेच मला खर्चाची परवानगी का देऊ नये? इथे पुन्हा खात्या-खात्यामधील विभाजनाचा मुद्दा टोकापर्यंत ताणला जात होता. सर्वानी मिळून एखादे उद्दिष्ट माठणे ही संकल्पनाच जणू सर्वजण विसरले होते व राबवू शकत नव्हते.
॥॥॥॥
श्रीमती मीरा बोरावणकर यांनी एकदा एक किस्सा सांगितला. त्या एका डोगराळ भागात तपासासाठी गेल्या असताना पोलिस तपास पूर्ण केल्यानंतर सहज म्हणून समोर जमलेल्या महिलांना त्यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल व साक्षरतेबद्दल प्रश्न विचारले. 'मुलांना शाळेत पाठवता का? त्यांना वेळेवर लस टोचून धेता का?' असे पोलिसी कामाच्या अगदी बाहेरचे प्रश्न विचारले. हे विचारत असताना त्यांना सारखे वाटत होते की, कदाचित त्यांच्याबरोबर असलेल्या ज्युनिअर पोलिस स्टाफला वाटेल की, मॅडम आपल्या खात्याची ठरवून दिलेली चौकट सोडून दुस-या खात्याच्या कामामध्ये इंटरेस्ट घेत आहेत.
त्यांच्या तोंडून हा अनुभव ऐकत असताना मला असे पण वाटत होते की, कदाचित जिल्हा परिषद, शिक्षण, आरोग्य या खात्यातील मंडळींना असे वाटेल की, या पोलिसबाई आमच्या अधिकारकक्षेतील प्रश्न का विचारतात? किंवा आमच्या चौकटीमधील प्रश्नाबाबत त्यांचा काय संबंध! मात्र या अनुभवामधे समाजाच्या गुणग्राहकतेचा भाग असा दिसून येते की, एका वरिष्ठ स्त्रीपोलिस अधिका-याने स्रियांच्या मूलभूत प्रश्नांची जाणीव ठेवून डयूटी संपल्यावर त्याबाबत स्त्रियांशी संवाद साधला, याचे कौतुक समाजाला तसेच कनिष्ठ कर्मचान्यांना देखील असते. फक्त उच्च शासकीय पातळीवर याची दखल घेणे किंवा याचा उपयोग करून घेणे जमत नाही, असे चित्र दिसून येते.
॥॥॥॥।
कांही दिवसांपूर्वी मुंबई येथील स्वकष्टातून पुढे आलेल्या व आज आघाडीवर असलेल्या एका महाराष्ट्रीय उद्योगपतीबरोबर माझी चर्चा चालू होती. आपल्याकडील उद्योगक्षेत्रात नीतिमत्ता कमी आढळते. योग्य ते कर भण्याऐवजी ते चुकावयचे; तसेच अन्य उपायांनी हिशेबाचे ताळेबंद मागेपुढे करून मोठा नफा जाहीर करणे व त्यातून शेअर होल्डरची फसवणूक करणे, विशेषतः वित्तीय कंपन्या काढून नंतर त्या बुडविणे; मालाचा दर्जा चांगला नसणे, दिलेला शब्द न पाळणे आदी गैरप्रकार करण्यामध्ये कित्येक उद्योगपती पुढे आहेत. हे थांबविण्याबद्दल चांगले अधिकारी व चांगले उद्योगपती यांच्यामध्ये चर्चा होण्याची गरज आहे, उसे माझे मत मी त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने बघितले व चांगले अधिकारी कोठे असतात, असा प्रश्न विचारला. कस्टमचे नियम, आयात-निर्यातीचे नियम, परकीय चलनाचे नियम इत्यादी राबविण्याचे अधिकार असणारे अधिकारी नियम सोपे करण्यास नाखुश असतात, कठीण नियमामुळेच त्यांना भ्रष्टाचार करता येतो; तेच त्यांना हवे असते, इत्यादी अनुभव त्यांनी मला सांगितले. उद्योगपतींशी चांगली चर्चा व्हावी असे सरकारी अधिका-यांना वाटत असेल तर 'आधी जाऊन तुमची बिरादरी सुधारा' असे त्यांनी मला सांगितले. मी त्यांना म्हटले की, हा माझा बिरादरीचा किंवा त्यांच्या बिरादरीचा असा प्रश्न नसून अद्योजकांपैकी चांगली मंडळी व कांही चांगले अधिकारी यांनी एकत्रपणे बसून काही चांगली चर्चा होण्याची आवश्यकता आहे. एखादा चांगला अधिकारी एकट्यानेच स्वतःची बिरादरी सुधारू शकणार नाही, त्याने त्याच्या खात्याबाहेरील चांगल्या लोकांची मदत घेणे गरजेचे असेल, वगैरे वगैरे! त्यावर त्यांनी चांगले अधिकारी असतच नाहीत म्हणून ही चर्चा होऊच शकत नाही, असे त्यांचे ठाम मत असल्याचे मला सांगितले.
॥॥॥॥॥॥।
या सर्व अनुभवांवरून मला जो मुद्दा मांडावयाचा आहे तो असा की, आपआपले वेगवेगळे गट, वेगवेगळ्या बिरादरी इत्यादी संकल्पना त्या-त्या कामामध्ये तज्ज्ञता येण्यासाठी उपयोगी असतात. अशी तज्ज्ञता आली तर त्या त्या कामाचा चांगला उठाव होऊ शकतो, हे मला मान्य आहे; परंतु काही वेळेस आपण ती चौकट ओलांडून बघणे गरजेचे आहे! विशेषतः प्रशासनामध्ये ही गरज असते असे लक्षात घेतले जात नाही. असे गृहीत धरले जाते की, त्या त्या पदावर बसलेला अधिकारी त्या त्या पदाची माहिती व तज्ज्ञता आपोआप मिळवेलच! कोणीही अधिकारी तेथे बसला, तरी ते सर्वच सारख्या प्रमाणात अशी तज्ज्ञता मिळवतील व ती कामेही सारख्याच प्रामाणिकपणे करतील! ते त्यांच्या कामात अत्यंत कर्तव्यदक्ष असतील व काम १०० टक्के यशस्वी, पूर्ण करतील. सबब इतरांना त्यांत लक्ष घालण्याची गरज नाही! असे पुस्तकी वर्णन प्रशासनात इतके टोकाला जाऊन स्वीकारलेले आहे की चौकट ओलांडून इतर क्षेत्रांबरोबर आपली सांगड घातली, तर आपली प्रत कमी ठरविली जाईल अशी भीती चांगल्या अधिका-यांना वाटू लागते. त्याचप्रमाणे 'बिरादरीशी इमान' व जे काही वाईट घटते ते इतर बिरादरी वाल्यांमध्येच, हेही मत इतके खोलपणे प्रत्येकाच्या मनात रूजलेले आहे की, प्रत्येक क्षेत्रातील चांगल्या माणसांनी एकत्र येणे त्यांना जमतच नाही. त्यामुळे चांगल्या माणसांनी करता येण्यासारख्या कित्येक गोष्टी ते करू शकत नाहीत. इतर बिरादरीतील चांगल्या व्यक्तींची दखल न घेण्याची मनोवृत्ती तसेच आपल्या बिरादरीत काही वाईट लोक असतात व त्यांच्यामुळे काहीतर वाईट घडत असते हे कबूल न करण्याची मनोवृत्ती सगळीकडे दिसून येते. आपल्या कित्येक योजना नीट पूर्ण न होण्यामागे समन्वयाचा अभाव हे महत्वाचे कारण आहे.
॥॥॥॥।
एकदा माझ्या एका पत्रकार मैत्रिणीबरोबर मी वरील चर्चा केली. वेगवेगळ्या क्षेत्रातील चांगल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रातील चुका दुरूस्त करण्याबद्दल काय करता येईल याची चर्चा करण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न मी तिला विचारला. त्यावर तिने एक मार्मिक उत्तर दिले. ती म्हणाली, 'अशा चर्चेत आय.ए.एस अधिकारी असणारच व ते म्हणणार, प्रत्येक चर्चेतील बहुमान मलाच मिळावा. कारण माझा प्रशासनाचा अनुभव हाच सर्वश्रेष्ठ आहे. प्रशासनातील विविध खात्यांमध्ये काम केल्यामुळे देशातील सर्व प्रश्नांची जाण मला आहे व त्यामुळे मला इतर कोणीही काही शिकवायची गरजच काय? या टण्यावर आल्यानंतर ही बैठक तिथेच थांबेल. पुढे जाऊ शकणार नाही, मग ती अयशस्वी होईल.'
या उत्तराने सहाजिकच मला अस्वस्थ केले आहे. तिने मला ब-याच वेळा तिचा हा शेरा वैयक्तिक माझ्यासाठी नाही असे सांगूनही मी अस्वस्थच आहे. पण आय.ए.एस. अधिकारी तसे वागत असतील तर त्यालाही कारण आहेच.
ब्रिटिश राज्यकर्त्यानी जी प्रशासकीय व्यवस्था आपल्या देशात घालून दिली त्यामध्ये तत्कालिन आय.सी.एस. अधिकारी हे अत्यंत महत्वाचे पद होते. हे अधिकारी काळजीपूर्वक निवडून, पारखून घेतले जात. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असे. त्यांचे अधिकारही खूप असत. नवनवीन प्रशासकीय पद्धतीची घडी कशी बसवावी आदींबाबत त्यांनी काही शिस्तबद्ध व आखीव-रेखीव पद्धती निर्माण करून त्या राबविल्या. आजच्या काळात त्या अपु-या किंवा चुकीच्या वाटत असल्या तरी पण त्याच राबविल्या जात आहेत.
त्या काळामध्ये या प्रशासकीय व्यवस्थेला राजकीय पैलू नव्हता. आज मात्र प्रशासनात दोन भाग आहेत. राजकीय व नोकरशाही. त्यांच्यामधे कोणाचे अधिकार किती हा वाद वारंवार उद्भवतो. कोणतीच जबाबदारी माझी नाही असे म्हणणारे महाभागही आहेत. त्यातून महत्वाचे म्हणजे कुठेही प्रशासकीय व्यवस्थेची घडी कशी असावी व त्यासाठी कोणते नियम व कार्यपद्धती ठरवावी, याचे प्रशिक्षण राजकीय व्यक्तींना किंवा प्रशासकीय अधिका-यांना देखील दिले जात नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे. बिटिशांनी स्थापन केलेल्या कार्यपद्धतीत कित्येक दोष मान्य करूनही ते बदलण्याची जबाबदारी कोणावर, हा प्रश्न कायम रहातो. आय.ए.एस अधिका-यांना खचितच असे वाटते की, नवी व्यवस्था निर्माण करण्यास ते सक्षम आहेत. प्रसंगी प्रशिक्षणाची गरज पडल्यास एकमेकांच्या सहकार्याने ते करू शकतील. पण मग ते तसे का करीत नाहीत, कुणाची वाट पहात आहेत हा सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न अनुत्तरित रहातो. मात्र एखादे चर्चासत्र कोणी भरवले व तेथे आय.ए.एस. अधिकारी गेले असतील तर नेमका चांगला बदल कसा असावा हे मी सांगू शकतो असे बोलायचा मोह त्या अधिका-यास आवरत नाही. हा बदल प्रत्यक्षात एकट्याने आणणे हे त्याच्या आवाक्यावाहेरचे आहे का? अंमलबजावणी साठी त्यांना इतरांची मदत हवी असते का? आणि तसे जर असेल तर चर्चामंडळात जे होईल त्याचा सर्व बहुमान स्वतःकडे रहावा हा त्यांचा आग्रह का असा माझ्या मैत्रिणीचा प्रश्न कायम रहातो. माझ्या भावाने मला एकदा सांगितले, 'आय.ए.एस मध्ये प्रत्येकालाच फुटबॉल टीमचा सेंटर फॉरवर्ड व्हावयाचे असते. प्रत्येक स्वतःला त्या तोडीचा समजत असतो. त्यामुळे सगळेच चेंडूवर तुटून पडतात. आणी गोल मात्र दुस-याच पक्षाचा होतो. तिकडचा चेंडू अडवायला आपल्या टीम मधील कोण ते ठरलेले नसते.'
स्वतंत्र्यानंतर ५० वर्षाच्या कारभार सुधारण्याची गरज आहे हे समजत असूनही त्यासाठी बिरादरीची चौकट ओलांडून बाहर पडता न येणे व सुधारण्यासाठी आवश्यक असलेली 'एकमेकां सहाय्य करू' अशी भूमिका न घेणे, ही आपल्याकडील कार्यपद्धतीची व आजच्या प्रशासनातील कार्यक्षम अधिका-यांची शोकांतिका आहे.
............................................................
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 1:22 PM 0 टिप्पणियाँ
07 बेरोजगारीवर उत्तम उपाय- रेशीम उद्योग (silk for employment)
07 बेरोजगारीवर उत्तम उपाय- रेशीम उद्योग
महाराष्ट्र टाईम्स दिनांक ३०.१०.९०
गेन्धा दहा तीस वर्षात महाराष्ट्रात व देशांतही व उद्योग व्यवसाय घटनाने वाढले पर बेरोजगारीची समस्या अजूनही आ वासून उभीच आहे. दारिद्रयनिमूलनाव्या योजनाना प्रयास मिळाले, पर गरीबी हटाओ सारख्या घोषणा देउनही गरीबी हटली नही. एकीकडे उद्योगकाना स्पर्धेत टिकून रहाराच असेल तर मोठया, व ल्यूशन मोठश प्रमाणंत भोडवाली गुलवणूक करावी लागत आहे. तीन ते पांच कोटी गुलवणूक करवास कारखानदारही आज छोटा कारखानदार समजला जातो- शामुलवणूकाल सरकारी बैंकाने सहारा फार मोठया प्रमाणावर अस्ते. तशांच सरकारी मदत (अनुदान) देखील. तरी पण रोजगार निर्मितीसाठी सरकारला या शुलवणकौचा फारसा उपयोग होत नाही. लघु उद्यागांच्या क्षेत्रांत एका व्यक्तिसाठी रोजगार निर्माण कराधला दोने ते तीन लाख रूपये भांडवली गुंतवणूक सहज लागते मोठसा उद्योधरात हे प्रमाण शाहूनही व्यस्त आहे.
एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे बेराजगारीचा फुगत चाललेला आकडा।दारिदयरेषेलील खाद्य केघौडी संपू झकणार नाड़ीत अशा एकात्मिक ग्रामीण विकास योजनेसारख्या योजनांना म्हणावे तरी यश आलेले नाही. अब परिस्थितीत जर ग्रामीण विकास विभाग अणि उद्योग विभाग या दोघांच्या कार्यक्रमांची एकत्र सांगड घालणे शक्य असेल तर सरकारला रेशीम उद्योगाचा कल्पकतेने वापर करून रोजगार निर्माण करणे मोठया प्रमाणावर शक्य होईल.
रेशीम उद्योगाची आपल्या देशांत फार जुनी परंपरा आहे. महाराष्ट्रीय पेठणे साइसाबरोबरच बंगाल, काश्मीर, कांजीवरम्, मैसूर, बनारस अशी रेशीम उद्योग व रेशीम व्यापारची प्रसिद्ध ठिकाण पूर्वापार गाजलेली आहेत. आज मात्र संपूण भारतातील सत्तर वे ऐशी टक्के उत्पान आणि विशेषतः निर्यात कर्नाकांतून होते. किबहुना कर्नाटकांत या व्यवसायातीन निरनिराळया प्रक्रियांकडे जस लक्ष देऊन त्यांच नियोजन करण्धंत आल तसा प्रकार इतर राज्यांत झालेला नाही. त्यामुळे इतर ब-याच राज्यातून जरी रेशीम उद्योग चालू असला व जरी त्यांतून गोरगरिबाना रोजगार मिळत असला तरी तो रोजगार अक्षरशः पोटापुरताच पुरता- त्यातून कुणीही गरीबीच्या परिस्थितीतून निधून मध्यमवर्गीय स्थितीत आला नसावा. कर्नाटकाने मात्र या व्यवसायातील विभिन्न प्रक्रिया लक्षांत धेऊन त्यामधरो सुधारणा करून, व्यापारी तत्वांशी या व्यवसायाची सांगड घालून मोठी मजल मारली आहे व या व्यवसायातील किमान पन्नास टक्के मंडळौना तरी निश्च्िातच सुबत्तता मिळवून दिली आई. आपल्याकडेही ते किंवा त्याहून चांगल कांडी करता रोईल का हा प्रश्न आहे व मला तरी त्याचे उत्तर होय असेच काटते.
रेशीम उद्योगकडे आपण कोणत्या दृषटिकोणांतून पहायचे हे आपण पहिल्यांदा ठरवले पाहिजे. उत्तम परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय हे याचे एक रूप तर बेरोजगारीचा प्रश्न मोठया प्रमाणावर सोडवू शकणारा व्यवसाय हे याचे दूसरे रूप. शिवाय या दोन्ही उद्देशांची सांगड घालता येडफ शकते हा ही एक प्लस पॉईंट.
रेशीम उद्योगाची सुरूवात शेतक-याच्या शेतापासून होते. जगात रेशीम निर्माण करण-या चार प्रकारच्या क्रिडयांच्या जातौ आहेत व हे चारही प्रकार फक्त आपल्याच देशंत आदळून योतात. हे आहेत तूतीपासून बनलेले सिल्क, टसर सिल्क, मूगा मिल्क आणि एसी सिल्क. सर्वात लोकप्रिय व मोठया प्रमाणात निर्मिती होणारे तूती किंवा मलबेरी सिल्क, मूंगा सिल्क फक्त आसामात होते. एसी सिल्कचे किडे एरडाच्या पारांवर पोसले जातात व हे सिल्क ओरिसा व बिहार मधेच तयार करतात- इतस्व त्याचा विशेष्ज्ञ प्रसार नाही. टसर सिल्क चे किडे अजुन, साल अशा काही ठक्साविंक वृक्षावर पोसले जातात व याचा प्रसार विदर्भ व मध्य प्रदेश मधे जास्त आहे. विदर्भात टसर निर्मिती करपास मोठा उद्योजक म्हणजे विदर्भ विकास महामंडळ. मात्र फार मोठया प्रमाणावर सर्वत्र रूजलेले रेशीम म्हणजे तूतीच्या झाडांवर पोसलेल्या किडयांपासून.
तूतीची लागवड शेतकारी आपल्या शेतात मोठया प्रमाणावार करू शकतात. तृतीच्या बागाघती शेतीतून एकरी बीस हजार पर्यंत व जिराइती मधून देखील एकरी दहा ने बीस हजार पर्यंत उत्पन्न मिळू शकते.
मात्र शेतक-याने तूतीचे पीक ध्यायचे- त्यावर किडे पोसायचे, त्यांचे पंचबीस ते तीस दिवसांत निधणारे कोष गोळा कराधचे व पुढे त्यांचे काय करावे हा प्रश्न शेतक-याला किंवा सरकारला पडणार असेल आणि पुढची कांहौच व्यवस्था आपल्याकडे नसेल तर हा व्यवसाय मूळ धरू शकत नही हे खादी ग्रामोद्योग मंडळाच्या गेल्या बीस-पंचवीस वर्षाच्या
अनुभवावरून सिद्ध झाले आहे. कोष निर्मितीनंतर जे कांही लागते ते शेतकरी करू शकत नाही कारण तो वेगळाच व्यवसाय आहे.
म्हणूनच शेतक-यांच्या बरोबरीने आणखीन कोणकोणत्या व्यवसायांना रेशीम उद्योगमुळे चालना मिळू शकते ते आपण पाहू या. कोष बनबण्याच्याही आधी कांही शेतकरी आपल्या शेतात मोटया प्रमाणावर तूतीची लागवड करून त्या ब्राडांची कटिग्ज जुलै ते सप्टेबर या काळांत इतर शेतक-याना बिकू शकतात. सध्यातरी कटिग्ज विक्रौचया व्यवसायात खादी ग्रामोद्योग मंडळाचे सहारय घेणे फायद्याचे ठरेल. कारण एरवौ आपल्या मंडळाला ही कटिग्ज कर्नाटकांतून आणवी लागतात.
अंडीपंज निर्मिती व बिक्री हा असाच दुसरा फायदा देऊ शकणास व्यवसाय. कोष फोडून बाहेर निघलेली पाखर एकत्र आल्यानंतर त्यातील मादी एका जागी बसून अंडी घालते. ही अंडी रोगमुक्त आहेत किंवा नाहीत हे आपल्या थोडयाशा उपकरणांच्या महारूयाने तपासून पहाता येते. रोगमुक्त सर्टिफाइड अंडी इतर इच्दुक शेतक-यांना विकता येतील. रोगमुक्त अंडी नसल्यास त्याचा एकूण रेशीम अद्योगवरच मोठा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून केंद्रीय रेशीम बोर्डाच्या परवानगीनेच शासनामार्फतच ही केंद्र चालवातीत उसा निर्बध आहे. तसे का असेना तरी या केंद्रांमधूनही रोजगार निर्मिती होते.
अंडयातून निघालेले किडे जेव्हा तूतीच्या पानांवर पोसते जात असतात तेव्हा त्यांना ठेवण्यासाठी लागण-या बांबूच्या विविध वस्तू उदाहरणार्थ ट्रे, चंद्रिका, नेट्स या साठी देखील ग्रामीण भागात मोठी रोजगार निर्मिती होते.
कोष निर्मितीनंतरचा मुख्य व्यवसाय म्हणजे कोषातून धागा काढणे. हे काम मोठी स्पिनिंग मिल उभारून पण होऊ शकते व छोटया छोटया प्रमाणावर असंख्य व्यक्तीना रोजगार मिळवून देऊन पण होऊ शकते. जी गोष्ट कापसच्या धाग्यापासून कापडापर्यंत च्या यात्रेची तीच रेशीमाचा धागा माढण्यापासून रेशीम कपडा तयार करे पर्यतची. इथे इडलूमलाही वाव आहे आणि पॉवरलूमला ही. मात्र मोठया प्रमाणावर मशीनीकरण या क्षेत्रात अजून झालेले नाही. त्यामुळे अगदी छोटया अद्योजकापासून म्हणजे सहा कॉटेज बेसिनचे युनिट वापरणा- घापासून तर दहा ते वीस वेसिनचे एक अशी दहा बारा युनिट्स बाळगणारे पण या व्यवसायांत दिसून येतात (महाराष्ट्रांत नव्हे). छोटीशी फॅक्टरी सुरू करायची म्हटली तरी त्यासाठी लागणारी मशिनरी बाजारांत उपलब्ध आहे. धागा निर्मितीचे काम अतिशय कौशल्याचे आहे व त्यांतील बारीक सारीक चुकांमुळे मालाचा भाव कमी होऊ शकतो. मात्र धागा उत्तम निघाल्यास मालाचा भावही तेवढाच समाधानकारक असतो.
सध्या छोटया प्रमाणावर सूत काटण्याचे प्रशिक्षण खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत वाईला दिले जाते तर पश्च्िाम महाराष्ट्र विकास महामंडळामार्फत मडहिंग्लजला व विदर्भ विकास महामंडळामार्फत नागपूरला मात्र घा व्यवसाय शिक्षणाच्या प्रशिक्षणासाठी ग्रामीण विकास व रेशीम विभाग यांनी एकत्र यायचे ठरवले तर प्रत्येक जिल्हयांत ट्रायसेम या योजनेखाली हे प्रशिक्षण वर्ग सुरू करता येतील. घासाठी ट्रेनिंग वर्ग उभारावे लागतील, मशिनरी आणावी लागेल आणि प्रशिक्षक शोधावे लागतील. हे सर्व आयोजन क्ष्ङक़्घ् मधून करता येईल.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर धागा निर्मितीची यंत्र बसवायला जो भांडवली खर्च येती लघुउद्योग समजला जातो आणि ज्या ज्या भागातल्या विकास महामंडळातर्फे अशा उद्योजकाला कक़्घ् योजनेखाली पंचवीस टक्के अनुदान मिळते. शिवाय द्रठ्ठड़त्त्ठ्ठढ़ड्ढ द्मड़ण्ड्ढथ््रड्ढ दृढ त्दड़ड्ढदद्यत्ध्ड्ढ (घ्च्क्ष्) या खाली मिळणा-या सवलतीना देखील तो पात्र ठरतो.
धाग्यावर मजबूतीसाठी बेगवेगळया प्रक्रिया कराव्या लागतात. साधारणपणे धागा बनवणा-या दहा युनिट्स मागे ड्डदृद्वडथ्त्दढ़, द्यध््रत्द्मद्यत्दढ़, द्यण्द्धदृध््रत्दढ़ या प्रक्रियांचे एक युनिट चालू शकते. याला देखील कक़्घ् व घ्च्क्ष् खालील सवलती मिळू शकतात. खरेतर क्ष्ङक़्घ् खालील सवलती पण मिळू शकतात. फरक हाच की कघ्घ् मधील सवलतीसाठी दारिद्रयरेषेखाली असण्याची अट नाही, व एकूण सवलती देखील जारूत आहेत, मात्र कर्ज घेण्यासाठी बॅकेकडे तारण द्यावे लागते. क्ष्ङक़्घ् मधील सवलत घेण्यासाठी तारण द्यावे लागत नाही.
धाग्यांना रंगवणे हाही एक मुख्य व्यवसाय आहे. तरीही येवल्यातील रंगारी समाजाची एकूण उपेक्षा पहिल्यानंतर या क्षेंत्रांतही सरकारने खूप कांही करण्याची गरज आहे हे पटले. या रंगारी व्यावसायिकांना त्यांच्या रंगकामाच्या धंद्यातील नवीन मशिनरीची माहिती नाही- पक्के रंग बनवण्यासाठी लागणारे खेळते भांडवल पुरेसे उपलब्ध नाही. रंगारी तंत्रात ज्या सुधारण झाल्या त्यांची माहिती नाही. हे ठ्ठत्त्त्थ्थ् द्वद्रढ़द्धठ्ठड्डठ्ठद्यत्दृद चे काम क्ष्ङक़्घ् मार्फत नाही तरी शासनाच्या व्यवसाय शिक्षण विभागाकडून होऊ शकते. तसे झालेले नाही हे मात्र खरे.
रेशीम धाग्यापासून कापड विणण्याचा व्यवसाय देखील महाराष्ट्रांत अगदी थोडया प्रमाणावरच आहे व आहे तो सर्व हातमागावर. तरी देखील या व्यवसायाला चांगले दिवस आहेत कारण देशांतील बहुतेक सर्व रेशीम कपडा हातमागावरच विणला जातो- मोठया मिल्स थोडयाच आहेत. कापउ उद्योगाप्रमाणेच या मधे सुद्धा छोटे छोटे पॉवरलूम
टाकणे, बीम भरून देणे असे उद्योग सुरू करता येतील. या सर्व व्यवसायांना लघु-उद्योगांना मिळणा-या सवलती लागू आहेत.
कापडविणण्धानंतर पुढे प्रिटिंग, ड्रेस मेकिंग इत्यादि व्यवसाय देखील सुरू होऊ शकतील. मात्र या उद्योगात बाजारात चढ उतार खूप आहेत. दलाली मोठया प्रमाणावर वाटून सर्व नफा दलालांकडेच अशीही परिस्थिती येऊ शकते. यासाठी कर्नाटक शासनाने केलेली उपाययोजना बाखणण्योरसी आहे. रेशीम कोष हा नाशवंत असल्याने तो तत्काळ विकला जावा व शेतक-याला भाव मिळावा या साठी निरनिराळया ठिकाणी दररोज रेशीम कोषांचे लिलाव केले जातात व लिलावांत सरकार देशील सहभागी होऊन शेतक-याला निदान हमी किंमत मिळेल याची काळजी घेते. मात्र याचबरोबर सर्व कोष विकत घेण्याचे व मोनोपोली पचेंसिंगचे सरकारी धोरण नाही हे मुदाम लक्षात घेण्यासारखे आहे. रेशीम कोषाची उलाढाल करणारे रामनगरम् हे एशियातले सर्वात मोठे केंद्र आहे.
याच बरोबर राज्यात काही मुख्य ठिकाणी (व विशेषतः बंगलौर येथे) सिल्क एक्सचेंच देखील आहे. हथे देखील साधे सूत, प्रक्रिया केलेले सूत, रंगवलेले सूत यांची ओपन लिलवाने विक्री सतत चालू असते. व त्यांतही राज्य शासनाचे ख़्च्क्ष्क् हे मंडळ भाग असते. हे मंडळ देकील सुताच्या एकूण उत्पादनापैकी फक्त दहा ते पंधरा टक्के सूतच विकत घेऊ शकते. मंडळाची उत्पादन क्षमता तेवढीच आहे व ती जाणून बुजून वाढवलेली नाही. हेतू एवढाच की खाजगी क्षेत्रांना मर्यादित स्पर्धा असावी व सूत काढणा-घांना किंमतीची काहीतरी हमी मिळावी. सिल्क एक्सचेंज मार्फत गि-हाईकांना व विक्रेत्यांना दिल्या जाणा-या एकूण सुविध व सवलतीची एक मोठी यादीच होईल. तरी देखील मंडळाचे हे व्यवहार तोटयांत चालत नाहीत यावरून त्यांची कार्यक्षमता दिसून येते. तसेच रेशीम उद्योग फायद्यांत जातो हे ही कळते.
असा हा रेशीम उद्योग महाराष्टांत वाढावयाचा असेल व त्यातून कांही प्रमाणावर का होईना रोजगार निर्माण करायचा असेल तर शासनाने याचे योग्य ते नियोजन केले पाहिजे. शेतक-यांना वेळच्या वेळी कटिंग्ज व रोगमुक्त अंडी पुरवणे व त्यांच्याकडून वेळच्या वेळी योग्य भावांत कोष विकत घेण्याची कारवाई सुरू झाली आहे. तरी पण कोष निर्मितीनंतर सुरू होऊ शकणारे इतर व्यवसारा वाढविण्यासाठी, त्यांचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांना कर्जपुरवळा होईल यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. ज्या ठिकाणी द्मत्त्त्थ्थ् द्वद्रढ़द्धठ्ठड्डठ्ठद्यत्दृद आवश्यक आहे तिथे सरकारी सहारय अपेक्षित आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर रांची येशी प्रयोगांत असे दिसून आले की जे एरि सिल्क सर्व रेशिमांमध्ये निकृष्ट समजले जाते, जाडे भरडे असते, तेच योग्य प्रमाणांत तूती सिल्कच्या धाग्याबरोबर ब्लेड करून वापरल्यानंतर एकदम एक्सपोर्ट क्वालिटी चा माल तयार झाला. असे प्रयोग करून बघणे त्या गरीब एरि सिल्क उत्पादकाला शक्यच झाले नसते. दुसरे उदाहरण एण आहे- विदर्भ महामंडळाने प्रयत्न पूर्वक नवीन व आकर्षक प्रिंट्स शोधून मालाचा खप जोरदार वाढवला, एक तिसरे उदाहर मुदाम नमूद करण्यासारखे आहे. इतर सर्व कोषांपासून धागा काढतांना धागा तुटू नये म्हणून ते कोष पाण्यांत उकळवतात. यामुळे आतील किडा मरतो. एरवी तो बाहेर आला असता तर त्यामुळे प्रत्येक धाग तुटला असता व फक्त टकळी वरच सूत काटणे जमू शकले असते. मशीनवर जमले नसते. मात्र एरि सिल्कच्या कोषाचे सूत टकळीवरच काढावे लागते. त्यामुळे त्या किडयांना संहार करणारे सिल्क वापरू नका असा प्रसार करायला सुरूवात केली होती. त्यांना एरि सिल्काची माहिती दित्यानंतर हे आम्हाला कुठे विकत मिळैल अशी कित्येकांनी विचारणा केली.
शेवटी रेशीम हा अतिशय नाजूक धागा आहे. त्यामुळे त्याच्या उत्पादनात दर्जा सांभाळणे फार महत्वाचे आहे. शासनामार्फत जे प्रशिक्षण वर्ग चालवले जातात त्यामध्ये दर्जा सांभाळण्याचे तंत्र देखील शिकवले गेले पाहिजे. तसे ज्यांना प्रशिक्षण मिळाले त्यांनी व्यवसाय सुरू करावा यासाठी जे कांही नियोजन करावे लागेल त्याचा पण विचार केला पाहिजे.
मुख्य म्हणजे बाजारभावातील अनपेक्षित चढ-उतारमुळे शेतक-यांना किंवा लघु व्यावसायिकांना झळ पोचून ते पार गाडले जाऊ नयेत यासाठी आवश्यक ती यंत्रणा पण शासनानेच उभी केली पाहिजे.
रेशीम उद्योगांतील कित्येक परदेशी तंत्रज्ञ त्यांचे तंत्र व मशिनरी आपल्याकडे निर्यात करू इच्छितात. त्याही बाबत शासनाने योग्य तो विचार आताच केला पाहिजे. असे झाल्यास रेशीम उद्योगाचा उपयोग आपल्याला मोठया प्रमाणावर स्वयं रोजगार निर्मिती साठी करता येईल.
.............................................................................................
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 1:20 PM 0 टिप्पणियाँ
06 हिंदीला धोपटणे थांबवा (stop bashing Hindi)
06 हिंदीला धोपटणे थांबवा
सालावाद प्रमाणे मराठी साहित्य संमेलन आले आणि सालावाद प्रमाणे माझी भीती या वर्षीही खरी ठरली. ती भीती होती विनाकारण हिंदीला धोपटण्याची - बडवण्याची.
नोकरी निमित्ताने महाराष्ट्रात पहिल्या प्रथम पाऊन टाकले १९७४ मधे. तेव्हा पासून हे धोपटण पहात आले आहे. त्याच बरोबर मराठीचे अवमूल्यन देखील. पण त्याला केंद्र सरकार किंवा हिंदी संस्था जबाबदार नसून मराठी सारस्वत आणि मराठी बाबतचे शासनाचे धोरणच जबाबदार आहेत असं माझं मत आहे.
मराठीच काय पण सर्वच भारतीय भाषांच्या गळेचेपीला खरं कारण काय आहे- तर इंग्रजीचे आपणच वारेमाप स्तोम माजवले, इंग्रजीमधे आपले प्राविण्य दाखविले तरच प्रतिष्ठा मिळते ही दुरावस्था त्यातूनच निर्माण झाली. त्या प्रतिष्ठेसाठी आपण सर्वांनीच इंग्रजीची कास धरली. मग मराठी भाषकडे दुर्लक्ष झालं त्याच खापर फोडायला हिंदी बरी सापडली.
मला एक वेगळ उदाहरण आठवत. १९९० ते १९९३ पर्यंत मी राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा (नॅचरोपेथी), संस्थान पुणे या केंद्र सरकारच्या एका संस्थेत डायरेक्टर म्हणून काम पहात होते. त्या काळी बजेट विभागणी साधारण अशी कसे - आरोग्य खात्याच्या एकूण बजेट पैकी सुमारे ९० टक्के ऍलोपेथी वर तर उरलेले १० टक्के इंडियन सिस्टम्स आफ मेडिसन वर - यात आयुर्वेद, होमियोपथी, नॅचरोपथी, वगैरे सगळ आलं. सहाजिकच या दहा टक्कांपैकी ७ ते ८ टक्के आयुर्वेदाच्या वाट्याला येई - कारण आपल्या देशात सुमारे ५ लाख वैद्य आहेत. इतर होमियोपेथी वगैरे सगळे मिळून जेमतेम ५० हजार.
या सर्व इंडियन सिस्टम्स मधील मूळ सिद्धान्त एकमेकांशी बरेचसे सुसंगत आणि ऍलोपथी पेक्षा खूप प्रमाणात वेगळे आहेत. मग या सर्वांनी एकत्रितपणे एकमेकांना सपोर्ट दिला तर सर्वांची प्रगति जास्त चांगली होणार नाही कां? पण छे। आरोग्य मंत्रालयातील कुठलाही होमियोपेथी किंवा प्राकृतिक-चिकित्सा, योग-चिकित्सेचा ऍडवायझर किंवा कन्सल्टन्ट सदा आयुर्वेदाच्या नावाने खडे फोडायचा. यांच्यामुळे आमची गळचेपी होते म्हणायचा - ऍलोपथीमुळे नाही! देशात ऍलोपथीचे डाँक्टर्सही सुमारे पाच लाखच तरीही त्यांचे बजेट एवढे कसे असा प्रश्न इंडियन सिस्टमया माणूस विचारत नाही. इंग्रजी, हिंदी आणि मातृभाषेच्या संदर्भात आपण तेच करतोय. परकीय इंग्रजी भाषेला समर्थपणे सामोरे जाण्यास आपण कुठे कमी पडतो ते पहायला हवे त्याऐवजी आपण हिंदीला जबाबदार धरतो.
मी ज्या काळात शाळेत होते त्या काळात राष्टाभिमानी असणं हा एक चांगला संस्कार मानला जाई आणि तो माइयात उतरला. याचा अर्थ इतर राष्टांचा व भाषांचा द्वेष केला पाहिजे असे नाही. पण हिंदी भाषा उत्तम प्रकारे येणं ही माइया दृष्टीने कसोटी होती राष्ट्राभिमानाची. तसेच उत्तम मराठी येणे ही पण कसोटी होती. कारण ती माझी मातृभाषा आहे- म्हणूनच बिहारसारख्या दूरवरच्या प्रातांत हिंदीतून संपूर्ण शिक्षण घेऊनही माझं मराठी इतकं चांगल होत की उन्हाळयाच्या सुट्टीत खानदेश मधे आल्यावर चुलत-मावस भावंडांना मी मराठी निंबध लिहून देत असे आणि त्यांच्या मराठी धडयांची तयारी त्यांच्यापेक्षा माझी पक्की असे.
याशिवाय माझं इंग्रजी पक्क होत - संस्कृत पक्क होत - ऊर्दू, बंगाली, नेपाली, मैथिली, भोजपुरी, येऊ लागल्या होत्या. अमचे हेडमास्टर फारसी आणि अरबी चे तज्ञ होते आणि मला हिंदी - हिंदी - संस्कृत ऐवजी फारसी - अरबी - ऊर्दू हे विषय निवडण्यासाठी खूप सांगत होते. ते न ऐकून मोठीच चूक केली अशी खंत अजून वाटते. पुढे मला चांगल्या येणा-या किंवा समजणा-या भाषांमध्ये पंजाबी, ओरिया, आसामी, गुजराथी, मारवाडी, हरियावाणी, अवधी, बज्र, छत्तीसगढ़ी, अहिराणी इत्यादि भाषा व बोलीभाषांची भर पडली.
या सर्व अनुभवातून मी ठामपणे सांगू शकते की भाषांचा बोजा पडतो असा आरडा-ओरडा लोक उगीचच करतात. एकजात सर्व भारतीय भाषा एकमेकांशी इतक्या समरस आहेत की त्यांची ट्रिक कळायचा अवकाश! मुख्य म्हणजे सर्वांची वर्णाक्षरे सारखीच, सर्वांचे व्याकरण सारखेच (लिंगांचे प्रकार सोडले तर) वाक्य रचना सारखी, पौराणिक कथा आणि दृष्टांतांचा वारसा - तोही सारखाच, छंदांचे, काव्य, नाट्य, गायन या सर्व प्रकारांचे मूळ स्ट्रक्चर सारखेच, मातृभाषेनंतर दुसरी भाषा शिकायला थोडा फार वेळ लागेल तेवढाच - त्यांनतर तिसरी, चौथी, पाचवी पटापट येऊ लागतात. याचा फायदा आपण घेतला नाही तर ती आपलीच चूक ठरते. तरीही आपण बालमनावर पडणा-या ओझ्याची काळजी सांगत इतर भाषांपासून अंतर वाढवण्याचे काम आपण करत असतो.
माझी धाकटी भाची - वय वर्षे पाच पासून तिला उत्तम प्रकारे हिंदी, मराठी, बंगाली, ओरिया, इंग्रजी आणि संस्कृत येऊ लागले - हसत खेळत - कुठला आलाय् बोजा! आज तिच्या ज्ञानाच्या कक्षा इतरांपेक्षा कितीतरी अधिक विस्तीर्ण आहेत.
युरोप मधे प्रत्येक देशांत पाचवी पासून मुलांना दुसरी युरोपीय भाषा आणि आठवीनंतर तिसरी भाषा शिकावी लागते. तिथे नाही पडत बोजा!
कुणी म्हणेल की मला बालपणासून हिंदीतून शिकण्याची संधी मिळाली म्हणून मला हिंदीचा बोजा वाटत नाही. तर मग इतर महाराष्ट्रीय मुलांना ही संधी द्यायला काय हरकत होती किंवा अजूनही काय हरकत आहे? दूरदृष्टिचा अभाव, की फुटीरतेची जुनी भारतीय परंपरा! शेजारील राजा वरचढ होऊ नये म्हणून दूरदेशीच्या मुगल किंवा इंग्रज सैन्याला आमंत्रण देऊन शेवटी त्यांना बळी पडण्याची आपली परंपरा होतीच. ती स्वातंत्र्यानंतर आपण पुन्हा सुरू केली. फक्त मराठी माणसांनीच नाही, इतरांनीही तसेच केले. पण म्हणून आपला दोष संपत नाही. आपण काही वेगळ करू शकतो ते केलं पाहिजे.
आज तामिलनाडू मधे इंग्रजी, व तामिल खेरीज इतर भाषा चालणार नाहीत अशी गर्जना झाली आहे - ती खूप खूप वर्षापूर्वी देखील होती. बंगाल मधे तेच झाले. पंजाब मधे तेच झाले. सीमावादामुळे बेळगाव निपाणी मधे तेच झाले. आज ही प्रवृत्ती असेल तर उद्या एक राष्ट्र असावे ही प्रवृत्ती टिकू शकेल का? हरियाणा मधे लोकांनी पंजाबी शिकू नये म्हणून त्यांची पर्यायी भाषा तेलगू असेल अशी घोषणा झाली. एक तरी दक्षिणी भाषा शिकावी अशी भलावण झाली - चांगली होती. पण मग ते धोरण यशस्वी करण्याचे प्रयत्न किती झाले? हरियाणवी - आंध्र सद्भावना किती वाढली?
मराठी किंवा इतर गैरहिंदी भाषिकांनी हिंदी विरूद्ध गळा काढण्याच एक कारण मला दिसत. जर संपूर्ण देशाचा कारभार हिंदी भाषेतून चालणार असेल तर ज्यांची मातृभाषा हिंदी आहे त्यांना नैसर्गिक लाभ मिळणार, राज्यकर्ते किंवा विचारवंत म्हणून ते जास्त प्रभावी ठरणार, आपण मागे पडू, आपल्याला वर्चस्व गाजवता येणार नाही, ही खरी भीती होती. त्याऐवजी ना तुमची, ना आमची अशी इंग्रजी जर संपर्क भाषा आणि राज्य करण्याची भाषी झाली तर आम्ही त्या हिंदीवाल्यांपेक्षा वरढच आहोत, हे सहज दाखवून देऊ असे ते गणित होते. जर आम्ही ते दाखवण्यात पुढे येऊ शकणार नसलो तर निदान आम्ही अमेरिकत तरी निघून जाऊ असही गणित होत. शेवटी कांय झाल? दिल्लीतल्या सरकारी फाईली जशा जास्तीत जास्त इंग्रजी-धार्जिण्या होत गेल्या तशाच त्या मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, लखनऊ इथेही झाल्या. राज्य कारभारात आपापली राजभाषा पुढे आणण्यासाठी आवश्यक, तसेच सोप्या आणि सुटसुटीत शब्दावल्या निर्माण होतील यासाठी मी मी म्हणणा-या साहित्यिक आणि भाषांविदापैकी कोणीही पुढाकार घेतला नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, सामाजिक शास्त्र इत्यादि शिक्षण मातृभाषेतून मिळवता यावे यासाठी हिरिरीने लेखन कार्य झाले नाही. मातृभाषा ही विचारांची भाषा म्हणून रूजली नाही. ती रूजावी असं कुणाला वाटलं नाही.
मराठी किंवा इतर गैरहिंदी भाषिकांनी हिंदी विरूद्ध गळा काढण्याच एक कारण मला दिसत. जर संपूर्ण देशाचा कारभार हिंदी भाषेतून चालणार असेल तर ज्यांची मातृभाषा हिंदी आहे त्यांना नैसर्गिक लाभ मिळणार, राज्यकर्ते किंवा विचारवंत म्हणून ते जास्त प्रभावी ठरणार, आपण मागे पडू, आपल्याला वर्चस्व गाजवता येणार नाही, ही खरी भीती होती. त्याऐवजी ना तुमची, ना आमची अशी इंग्रजी जर संपर्क भाषा आणि राज्य करण्याची भाषी झाली तर आम्ही त्या हिंदीवाल्यांपेक्षा वरढच आहोत, हे सहज दाखवून देऊ असे ते गणित होते. जर आम्ही ते दाखवण्यात पुढे येऊ शकणार नसलो तर निदान आम्ही अमेरिकत तरी निघून जाऊ असही गणित होत. शेवटी कांय झाल? दिल्लीतल्या सरकारी फाईली जशा जास्तीत जास्त इंग्रजी-धार्जिण्या होत गेल्या तशाच त्या मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, लखनऊ इथेही झाल्या. राज्य कारभारात आपापली राजभाषा पुढे आणण्यासाठी आवश्यक, तसेच सोप्या आणि सुटसुटीत शब्दावल्या निर्माण होतील यासाठी मी मी म्हणणा-या साहित्यिक आणि भाषांविदापैकी कोणीही पुढाकार घेतला नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, सामाजिक शास्त्र इत्यादि शिक्षण मातृभाषेतून मिळवता यावे यासाठी हिरिरीने लेखन कार्य झाले नाही. मातृभाषा ही विचारांची भाषा म्हणून रूजली नाही. ती रूजावी असं कुणाला वाटलं नाही. ही शास्त्र एखाद्या भाषेत जरी लिहिली गेली असती तरी एकीतून दुस-या भाषेचा प्रवास सोपा होता, पण आजही सगळ्याच भाषांकडे ठणठणाटच आहे.
मराठी भाषा म्हणजे काय याचे उत्तर संत वाड्मय, कथा, कांदब-या, नाटकं, कविता, आणि फार तर मराठी सिनेमे एवढेच आहे का? की विज्ञानावरील एखादे उत्कृष्ट पुस्तक, बलात्काराच्या प्रश्नावरील चांगला लेख, एखाद्या राजकीय घटनेचे विश्लेषण यांना देखील साहित्य म्हणता येईल? या परिभाषा कोण आणि कस ठरवतं? हे साहित्य असेल तर त्याची किंवा त्याच्या अभावाची आतापर्यंत कुणी दखल का घेतली नाही, मराठी साहित्य संमेलनांमधे चर्चा का झाली नाही आणि हे साहित्य नसेल तर साहित्य-संस्कृती मंडळापेक्षा वेगळ शास्त्र आणि समाज-विज्ञान मंडळ का निर्माण होत नाही, त्याचा आग्रह का धरला जात नाही?
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून साहित्य संस्कृती मंडळाने या बाबत किती प्रभावीपणे अशा पुस्तकांच्या निर्मिती आणि प्रचाराचा प्रयत्न केव्हा याचा शोध घेतला ता फारस चांगल चित्र दिसून येत नाही. किती चांगले शास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ मराठीतून लिहिते झाले? दर वर्षी होणा-या साहित्य संमेलनांमधून ही खंत कितीदा व्यक्त झाली? ज्यांनी असे थोडे फार प्रयत्न केले त्यांचा कधी सत्कार झाला?
वॉल्ट डिस्नेने लहान मुलासांठी अणुबॉम्बवर एक शास्त्रशुद्ध पुस्तक लिहिले व त्याला 'माझी श्रेष्ट साहित्यिक कृति' म्हटले आहे. असं किती लेखकांना जमल हा प्रश्न साहित्य संमेलनात विचारला जात नाही, हिंदीच्या नावाने मात्र खडे फोडले जातात. हा नाचता येईना सारखा प्रकार तर नाही ना?
त्याऐवजी मराठी जर ठामपणे हिंदीच्या पाठीमागे उभी राहिली तर अजूनही हिंदीला राष्ट्रभाषेचा आदर, सन्मान प्राप्त होईल आणि तो आपोआप मराठीलाही मिळेल. नाही म्हटले तरी जगभराच्या सहा अब्ज लोकसंख्यपैकी एक ते सव्वा अब्ज आपल्या देशात असून त्यातील सत्तर कोटी लोकाना हिंदी समजते तर सुमारे बारा कोटींना मराठी समजते. या सर्वांनी एकमेकाना सहाय्य केले तरच आपण सगळी एकत्रपणे पुढे जाणार. हे न समजल्याने हिंदीला डावलून इंग्रजी आणण्याच्या धोरणाचे पर्यवसन शेवटी मराठीला डावलून आय्.टी. आणण्याच्या धोरणातच झालेले आपण पाहिले.
मराठी ऐवजी पर्याय म्हणून आय्.टी. हे धोरण मला योग्य वाटते कां? नाही! कारण मराठी शिकून तिला टिकवली तरच आपली भारतीय आणि महाराष्ट्रीय एकात्मता कायम रहाते अस मला वाटत. कुणी म्हणेल मराठी भाषा शिकून भाकरी मिळत नाही. पण त्यासाठी मराठीतून किंवा मराठी शिकणारा माणूस उपाशी राहणार नाही यासाठी धोरण आखायचे की मराठीच बंद पाडायचे या मुद्यावर नीट चर्चा झाली पाहिजे.
एक पर्याय म्हणून मला वाटते की ज्यांना मराठी शिकून शिवाय आय्.टी. शिकायच आहे त्यांच्यासाठी दोन्ही विषय शिकण्याची किंवा त्यांत वेगळी परीक्षा पास होऊन सर्टिफिकेट मिळवण्याची संधी देणं हे खरं उत्तर आहे. ती संधी आपण का नाही निर्माण करत? जर एखाद्याचं मराठी कोणात्याही बी.ए. किंवा एम्.ए. च्या विद्यार्थ्याइतकच उत्कृष्ट असेल तर थेट परीक्षा देऊन ते सिद्ध करण्याची, त्याबाबत सर्टिफिकेट मिळवण्याची व त्या जोरावर इतर प्रमोशन्स मिळण्याची संधी त्याला का असू नये? त्यासाठी कॉलेज प्रवेश घेणे, हजेरी लावणे, टयुटोरियल्स भरणे हे जाचक प्रकार कशासाठी? किंवा एखाद्याला अर्थशास्त्रामधे थेट मास्टर्स डिग्रीचे सर्टिफिकेट हवे असेल तर तशा परीक्षेला बसण्याची संधी आणि सुविधा दिल्याने काय बिघडते? थोडक्यात काय तर अशी सुविधा निर्माण करणे हे जास्त चांगले धोरण ठरले असते - हे किंवा ते एकच निवडा असा कूपमण्डूकी पेच टाकणे हे चुकीचे धोरण आहे अस मला वाटत.
त्याचप्रमाणे पहिलीपासून इंग्रजीच आक्रमण लादण्याचे धोरण. हे ही चुकीचे असे मला वाटते. कारण त्यामुळे आपण हिंदी आणि इतर भारतीय भाषांना अजून दूर लोटणार आहोत.
उद्या देशातल्या प्रत्येक हिंदीतर भाषिकांनी हिंदी नको, इंग्रजी हवी असे म्हणण्याने आज हिंदीचे सामर्थ्य कमी होईल तसे उद्या त्यांच्या मातृभाषेचे सामर्थ्य देखील कमीच होईल अस मला वाटत. नव्हे, इतक्या वर्षांत तेच दिसलं.
कुणी म्हणेल चूक - उलट पहिलीपासून मराठी - इंग्रजी शिकली की आमची मुलं लग्गेच दोन्हीं भाषांतून साहित्य निर्मीती करतील - त्यांच साहित्य वैश्र्विक होईल! ती कधीही परदेशात येऊ जाऊ शकतील- त्यांच जीवन वैश्र्विक होईल! ते चांगल साहित्य मराठीच्या माध्यमातून लिहिण्याची गरजच उरणार नाही- कारण त्यांना इंग्रजी येत असेल. ते दिल्लीतही राज्य करू शकतील कारण ते वैश्र्विक भाषेतून राज्य करतील. हिंदी चांगल येत नसल्यामुळे यशवंतराव चव्हाण दिल्लीत अप्रभावी ठरले, पण आता तस होणार नाही, कारण दिल्लीचीच भाषा हिंदीऐवजी इंग्रजी करून टाकू किंवा दिल्लीकडे बघायची गरजच काय? त्यापेक्षा अमेरिकेकडे बघण केव्हाही जास्त फायद्याचं. इसाक असिमोव्ह ने वर्तवल्याप्रमाणे जेव्हा वैश्र्विक सरकार येईल आणि इंग्रजीतूनच वैश्र्विक सरकारचा कारभार चालेल तेव्हां हिंदी भाषिकांपेक्षा आम्ही पुढे असू!
ठीक आहे. पण मग यात राष्ट्र ही सकंल्पना कुठे आहे, राष्ट्राभिमान असावा की नसावा हे प्रश्न कुणाला पडतात का? मी अजून तरी राष्ट्र आणि राष्ट्रभिमान या कल्पनांना फाटा दिलेला नाही. '' जिन्हे नाज है हिन्द पर उनको लाओ '' हा माझा शोध चालू आहे.
नोकरीच्या अगदी सुरवातीला उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्र कॅडर मधे आलेल्या एका भाप्रसे आधिका-याने मला म्हटले,
'' मी माइया मुलांना कॉन्व्हेन्ट मधे टाकलय म्हणजे मराठी चांगल आलं, नाही आलं ही भानगड नको ''
''आणि मातृभाषेच काय?''
''इंग्रजी हीच मातृभाषा मानायला काय हरकत आहे? त्यांना पुढे तिकडेच जायच आहे! त्याना कुठे उत्तर प्रदेशात परत जायचय्?''
''मी पण मुलांना कान्व्हेंट मधे घातल आहे. पण घरी मी त्यांना आवर्जून हिंदी, मराठी आणि संस्कृत शिकवते. पाढे व तोंडी गणितं मराठीत सोपी पडतातच, पण इतिहास भूगोलही ती मराठीतून पण वाचतात.''
''हा दुराग्रह आहे - मुलांवर एवढं ओझ लादून काय उपयोग? शिवाय मराठी, हिंदी मधे वाचण्यासारखं काय ठेवलय जे न वाचून चालणार नाही?''
त्यांच्या मुद्यामधला शेवटचा भाग बरोबर होता असं माझ्या मुलांनी मला वेळोवेळी सांगितल आहे - मराठी, हिंदी मधे वाचायला काय आहे? स्कूटर कशी रिपेअर करायची- आहे? एरोडायनॅमिक्स काय असते- आहे? कॅल्क्यूलस शिकायची सोय- आहे? फटाके बनवण्याच चांगल पुस्तक- आहे? अर्थशास्त्र लहान मुलांना कळेल (लहान म्हणजे ६ ते ८ वर्ष वयोगट) अशा प्रकारे- आहे? कॅमे-याची माहिती- आहे? नाही ना? मग आम्हाला ''पण लक्षात कोण घेतो?'' किंवा ''बटाटयाची चाळ'' वाचायला लावू नकोस. ''प्रेमचंद'' किंवा ''साहिर लुधियानवी'' पण वाचायला लावू नकोस. कधी मघी तूच वाचून दाखवलस तर चालेल. प्रत्येक मूल ललित साहित्याचा चाहता असणार नाही. आम्ही बार्बरा कार्टलंड किवा शेक्सपियर तरी कुठे वाचतो? पण आम्हाला जे काहींही वाचावस वाटत ते इंग्रजीत हमखास मिळेल याची गॅरंटी आहे - ते तशाच स्टॅण्डर्डने हिंदी मराठीतून असेल तर आम्ही ते पण वाचू !
हिंदीच्या आक्रमणामुळे मराठीची गळचेपी होते असं म्हणणा-याना मला सांगावस वाटत की मराठीत ''सर्वस्पर्शी वाचनीय'' नसल्यामुळे मराठीचे अवमूल्यन होत आहे - हिंदीमुळे नाही. खुद्द हिंदीतही तसे साहित्य नसल्याने हिंदीचीही गळचेपी होत आहे. ते निर्माण करण्यासाठी मराठीच्या लेखक, प्रकाशक, साहित्य निर्मीती मंडळे यांनी प्रयत्न करायला हवे आहेत. मल्याळी भाषेत असे प्रयत्न झाले आहेत. साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी निदान अशा मल्याळी पुस्तकांची एक यादी तरी मराठीतून प्रकाशित करावी.
मी स्वतः अर्थशास्त्र कसं शिकले? तर इंग्लड मधे असताना आठ वर्षांखालील वयोगटासाठी लेडी-बर्ड सिरिजमधे असलेले एक पुस्तक आणि पंधरा वर्षांखालील वयोगटासाठी त्यांनीच काढलेले दुसरे पुस्तक वाचून! हे जर साहित्य नसेल तर काय आहे? आणि इंग्रजीची कास धरणा-यानी इंग्रजांचे अनुकरण म्हणून कां होईना मराठी मधून अशा ''असाहित्यिक'' प्रकाराला प्रोत्साहन द्यायला काय हरकत आहे? की त्यापेक्षा मुलांना पहिलीपासून इंग्रजी शिकवून ''ती'' पुस्तक वाचायला देण सोप आणि शहाणपणाचं आहे?
आज माझी मुलं ई-मेल पाठवताना रोमन लिपी मराठी भाषा असा प्रकार करून पाठवतात. त्यांच्या हिदी भाषिक मित्रांना रोमन लिपी हिंदी भाषा अशी पाठवतात. हळू हळू त्याच्या मानसातून लिपी बाजूला होणार. अगदी सुरवातीला मी प्रयत्न केले त्यांनी देवनागरी लिपी वापरावी म्हणून. पण कम्प्यूटर वर देवनागरी लिपीच्या वाटयाला जे दुदैंव सरकारने आणि सी-डॅक ने लिहून ठेवल आहे त्याची एक वेगळीच कहाणी आहे, जिचे मूल्यमापन देखील अत्यावश्यक आहे. तिची एक एवढीच झलक देता येईल की संस्कृत शिकण्यासाठी मी कम्पयूटर वर तयार केलेली एक अर्धी-मुर्धी साईट पाहून कॅनडा मधील संस्कृत शिकू पाहाणा-या एका अभारतीय मुलाने मला लिहून कळवल की कम्प्यूटर वर आपली लिपी कशी आणावी याबाबत तुमच्या देशाने इस्त्राईल कडून खूप काही शिकायची गरज आहे.
हिंदीला दूषणे देण्याऐवजी साहित्य संमेलनामधे हिंदीचे ऋण मान्य करायले हवे. हिंदीमुळेच स्वातंत्र्य-संग्रामाच्या वेळी सपूर्ण देश एकत्र येऊ शकला. विवेकानंद किंवा दयानंद सरस्वती सारख्या मंडळींनी आपल्या कडील विचारवंतांबरोबर चर्चा केल्या. स्वातंत्र्यानंतर देशातील इतर भाषांच्या हिंदी अनुवादाने ते साहित्य मराठीत आणण्याकामी मोठी भर घातली आहे.
हिंदी भाषेचे मोठे बलस्थान म्हणजे वेगवेगळया प्रातांत बोलली जाणारी, वेगवेगळया लकबींची हिंदी। बंगाली माणसाची हिंदी वेगळी, राजस्थानी हिंदी वेगळी, हैद्राबादची वेगळी, अलाहाबादाची वेगळी, नेपाळी लोकांची हिंदी वेगळी, मुंबईची वेगळी आणि पुणेरी माणसाची तर त्याहून वेगळी. विभिन्न प्रांतीयांनी हिंदीला वेगवेगळे पैलू पाडले आहेत, तिचे सौंदर्य खुलवले आहे.
ज्यांनी गोनिदांच्या लिखाणांतील मराठी भाषेचा प्रांतवार वेगळेपणा अनुभवला असेल त्यांना हा मुद्दा पटेल. हिंदीतील अशा लकबी आणि शब्दावल्या देखील मराठीत आणल्या जाऊ शकतात.
आज मराठी मंडळींनी हिंदीसाठी पुढे सरसावण्याची गरज आहे. ते कसे होईल याची चर्चा साहित्य संमेलनांत व्हावी. हिंदीची पीछेहाट होत असतांना मराठी मात्र पुढे जाऊ शकेल असे होणार नाही. म्हणूनच हिंदीला धोपटले जाऊ नये.
-----------------------------------------------------------
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 12:30 PM 4 टिप्पणियाँ
3/ जळगांव स्कँडलाच्या निमित्ताने -पूर्ण(Issues in Jalgaon scandal)
जळगांव स्कँडलाच्या निमित्ताने
(म.टा. दि. -- ? )
गेले दोन महिने दररोज गाजत असलेल्या जळगांव स्कँडलमध्ये दोन महत्याचे टप्पे पार पडून गेले आहेत. या निमित्ताने मागील घटना व पुढील संभावनांचा विचार करणे आवश्यक वाटते.
एकीकडे महिला धोरणाची घोषणा होत असतांना, व महिलांकारिता काहीतरी भरीव घडू पहात असतानाच जळगांवचे सेक्स स्कँडल उघडकीस आले आणी सामान्य जनता गांगरून गेली. आपल्या समाजाचं खर चित्र कोणत? हे - जे घडू पहातय, की ते - जे प्रत्यक्ष घडून गेलेलं आहे. विद्यालयीन, महाविद्यालयीन तरूणी व घर संसारात स्थिरावलेल्या महिलांचे सुध्दा अश्लील फोटो काढून त्याद्वारे त्यांना व पालकांना ब्लॅकमेल करणा-या टोळीची वर्णनं येऊ लागली, यांत गुंतलेल्या स्त्रियांची घोषित आकडेवारी फुगून पाचशेपर्यंत गेली. त्याचवेळी डीएसपींची बदली झाल्याने एक वेगळाच गदारोळ उठला. शेवटी शासनाने अगोदर तीन स्त्री-अधिका-यांना पठवून व नंतर सीआयडी चे एक खास पथक नेमून या प्रकरणी उसळलेला लोकक्षोभ थोडासा थांबवला. त्यानंतर आता सीआयडीच्या टास्क फोर्सची चौकशीपण संपली आहे, न्यायालयाच्या व पोलीस चौकशीच्या इतर प्रकिया नेहमीप्रमाणे पुढे चालू रहातील. त्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी मी एक होते.
या निमित्ताने जे कित्येक मुद्दे मला जाणवले, त्यातील पहिला मुद्दा आहे सामाजिक संवेदनांचा - जी दिसून आली ती व जी दिसली नाही तीही. १८ जून पासून या विषयी बातम्या दररोज पेपरला येत असून सुध्दा याचा जाहीर निषेध किती उशीरा झाला? तो देखील समर्थपणे झाला तो फक्त जळगांव शहरांत, इतर कुठेतरी अगदी छोटे मोर्चे. नाशिक, धुळे, औरंगाबाद सारखी शेजारची मोठी शहरं तर अजूनही झोपलेलीच - समाजातील भयानकता आपल्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत कशाला काय बोलायचे अशी भूमिका बाळगलेली. मुंबईत राजकीय मोर्चे सतत निघत असतात. पण जळगांव प्रकरणाच्या धिक्कारासाठी किती मोर्चे निघाले? अशा थंड वातावरणांत वाखणण्यासारख्या तीन गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे वासनाकांडात पोलिसांनी ताब्यांत घेतलेल्या कोणत्याही आरोपीसाठी आम्ही जामीन रहाणार नाही हा जळगांवच्या मुस्लिम समाजाने घेतलेला निर्णय. दुसरा या प्रकरणांत अडकलेल्या मुलींची नावे गुप्त ठेवण्यावद्दल पत्रकांरानी दाखवलेला संयम. तसेच अडकलेल्या मुलींवरोबर लग्न करायची तयारी काही तरूणांनी दाखवली आहे ही पण एक आशादायक गोष्ट आहे.
जळगांव किंवा लातूर भूकंपासारखी घटना जेव्हा घडते तेंव्हा समाजात दोन त-हेच्या प्रकिया सुरू होऊ शकतात. लोकांनी तात्काळ आपली संवेदना नोंदवणे ही एक-- या संवेदनेतून समाजाची मूल्ये दिसून येतात. जळगांवच्या नगराध्यक्षांनी अत्याचारित मुलींवद्दल सहानुभूती व्यक्त न करता 'ज्यांचा न्यायालयात गुन्हा सिध्द झाला नाही ते दोषी कसे?' असा सूर लावला. मुद्दा म्हणून हे बरोबर आहे- पण त्यातून त्यांची प्रायोरिटी काय- त्यांना जास्त काळची कशाची ते दिसून आले. त्या उलट आरोपींना जामीन रहाण्याचे नाकारणारा मुस्लिम समाज किंवा सुजाण नागरिकांनी वेगळया समाजमूल्यांचे दर्शन घडवले. तरीही या सर्व घटना 'संवेदना नोंदवणे' या सदरात मोडतात.
आपल्याला एखाद्या घटनेची जेवढी तीव्रता वाटली तशी ती इतरांनापण वाटाची यासाठी हे संवेदना नोंदवणे ठीक आहे. पण पुढे काय? जळगांव सारख्या घटनेने रक्त उसळून येणे जितके गरजेचे आहे तेवढेच नंतरच्या काळांत शांत डोक्याने पुढील विचार करणे गरजेचे. आज गुन्हेगारांना तातडीने शिक्षा होतांना दिसत नसेल तर नेमके काय केले असता तसे होईल- त्यासाठी कायदेकानून व तपासाच्या पध्दतीत काय बदल करावे हा विचार उसळत्या रक्ताने नाही तर शांत डोक्याने व्हायला पाहिजे. पण समाजात हा पुढचा विचार होताना दिसून आला नाही. जळगांवव्या अनुषंगाने कित्येक गोष्टी होऊ शकल्या असत्या ज्या झाल्या नाहीत. पंडित सपकाळेला पकाडावे म्हणून आग्रह धरण्यांत आला पण त्याला किंवा ज्या इतर नगरसेवकांविरूद्ध न्यायालयाने सुध्दा जामीन नाकारला आहे, म्हणजेच सकृतदर्शनी ज्यांचा दोष दिसून आला आहे, त्यांचे नगरसेवकत्च तात्पुरते तरी रद्द करा ही मागणी होऊ शकली असती. त्यांचे आर्थिक व्यवहार जाहीर करायची मागणी करता येऊ शकते का? याबद्दल चर्चा होऊ शकली असती, कारण आरोपीपेंकी कित्येकांची गुर्मी पैसा व सत्ता यातून आलेली आहे. या कांडात काही डाक्टर्स व वकील देखील गुंतले होते, ज्यांचे रजिस्ट्रेशन किंवा सनद तात्पुरती रद्द करण्याची मागणी होऊ शकली असती. अजूनही होऊ शकेल, पण झालेली नाही.
या कांडात अडकलेल्या सर्व नाही पण काही मुलींनी पोलीसाकंडे तक्रार नोंदवली आहे. जर त्यांच्यापैकी कुणी जाहीरपणे पुढे आली तर समाज तिच्या धाडसाबद्दल तिला हार-तुरे, शौर्यपदक इत्यादी देईल? या अत्याचारित मुलींच्या मते समाज त्यांच्याकडे एक वाईट मुलगी, विशेषतः भविष्यातही इतरांना वापरण्यासाठी उपलब्ध होऊ शकेल अशी मुलगी या नजरेने पाहील आणी त्या निंदेला तोंड देणे त्यांना जड जाईल. अशा मुलींना दिलासा किंवा समाजावद्दल विश्वास वाटावा म्हणून काय करता येऊ शकते यावावत चंर्चासत्र व्हायला हवीत. ती पण होतांना दिसत नाहीत.
या निमित्ताने इंडियन एव्हिडन्स ऍक्टचा व न्याय प्रकियेचा पण विचार व्हावा. आपल्या व पाश्च्चात्य देशांच्या सामाजिक मूल्यांमध्ये एक मोठा फरक हा आहे की, आपल्याकडे कुंटुब हा आपल्या अस्तित्वाचा केंद्रबिंदु मानला जातो. लग्नाशिवायची मुलगी आपल्याला समाजात चालत नसते. आणी कौर्मायभंग झालेली मुलगी आपल्याला लग्नांत चालत नसते. पाश्चात्य देशांत एखाद्या मुलीवर बलात्कार झाल्यावर दोन-चार वर्षानी त्या मुलीबरोबर लग्नाचा विचार करणारा मुलगा मागील बलात्काराच्या कारणास्तव तिच्याबरोबर लग्न नाकारत नसतो. त्यामुळे अशी मुलगी कोर्टापुढे साक्ष द्यायलाच आली नाही असे होत नाही. तसे झालेच तर इतर कारणासांठी - पण माझा पुढचा संसार कसा होईल या काळजीमुळे नाही. भारतात मात्र अत्याचारित मुलींच्या मनांत ही पहिली भिती असते. अशा वेळी आपल्या साक्षी पुराव्याच्या पध्दतीत बदल करण्याची गरज नाही काय? पुरूषाने बलात्कार केला किंवा तो बलात्कार करू शकण्वाच्या स्थितीत होता असे इतर परिस्थितीजन्य बाबीमधून जेव्हा दिसून येत असेल तेंव्हा केलेला संभोग बलात्कार नव्हता हे सिध्द करण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली पाहिजे. तसेच जर तो आपण बलात्कार केला हे कबूल करत असेल तर मुलीची साक्ष न काढता देखील त्याच्यावरील न्यायालयीन प्रकिया पूर्ण करता आली पाहिजे.
इंडीयन एव्हिडन्स ऍक्टमधे बदल करून आपण इन कॅमेरा ट्रायलची कलमे कायद्यात समाविष्ट केली. पण त्यावद्दल जळगांव सारख्या शहरातील लोकांना विशेष माहिती नव्हती व या पध्दतीमुळे त्या स्त्रियांबाबत पूर्ण गुप्तता राखली जाऊ शकते का, आणि कशी या बाबत लोकांचा विश्वास नव्हता असे मी कमिश्नर म्हणून केलेल्या प्राथमिक चौकशीत दिसले. हे लोकशिक्षण निरनिराळया बार कौन्सिल्सना, शासनाच्या महिला कल्याण तसेच न्याय व विधी विभागाला किंवा मुक्त विद्यापीठाला किंवा नाशिक विद्यापीठातर्फे एखाद्या न्यायशास्त्राच्या प्राध्यापकाला करता येईल. हे ही व्हायला हवे. याची खूप गरज आहे.
आपली पोलीस व्यवस्था व न्याय व्यवस्था याची लोकांना एवढी भिती वाटते की, नको ते पोलीस व नको ते कोर्ट, त्यापेक्षा झालेला बलात्कार परवडला अशी कित्येक मुलींची व त्यांच्या पालकांची भावना झाली होती. न्याय प्रकीयेला जो वेळ लागतो त्यामुळे त्या न्यायादानाचे उद्दिष्टच कित्येक वेळा संपून जाते. हा उशीर कां लागतो? याची क्वचित व किंचित चर्चा न्यायाधीश मंडळींच्या काही चर्चासत्रांत होते. पण त्यांत लोकांचा सहभाग काहीच नसतो. न्यायालयांना योग्य त्या बिल्डींग्स नाहीत, पुरेसे न्यायाधीश नाहीत, रेकार्ड जपून ठेवण्यासाठी चांगले रेकार्डरूम नाही- त्यामध्ये मायक्रो फिल्मिंग, झेरोक्स इत्यादि सारख्या आधुनिक फॅसिलिटिज नाहीत. खटले वर्षानुवर्षे रेंगाळतात. सतत अपील्स व सतत केसेस रिमांड होत असतात. स्टे दिले जाऊन वर्ष न वर्ष केस पडून रहाते. यदाकदाचित ती निकाली निघाली तर अंमलवजावणी होण्याला वेळ लागतो. यात सुधार कसा होईल?
आणी न्यायालयांची विश्वासार्हता कशी वाढेल यावावत चर्चासत्र व्हायला हवीत. पुष्कळ वेळा खास न्यायालये बोलावून एखाद्या प्रश्नाची तड लागेल असे लोकांना वाटत. पण कित्येक वेळा असा अनुभव येतो की, खास न्यायालयांची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष नेमणूक होऊन अशा न्यायालयांची कार्यकक्षा व अषिकारांची मर्यादा ठरविणे, त्यांच्यायाठी इमारत उपलब्ध होणे, इतर स्टाफ नेमले जावून प्रत्यक्ष कामावर रूजु होणे, एवढे उरकायलाच किती तरी वेळ जातो. शिवाय अशा खास न्यायालयांच्या अधिकाराला चँलेज करून अंतुले यांच्या सारखा एखादा, माणूस सुप्रीम कोर्टापर्यंत आपली केस वर्षानुवर्षे रेंगाळात ठेवू शकतो हे ही लोकांनी पाहिलेले असतेच. त्यामुळे खरे तर खास न्यायालय नेमल्याने ही तात्पुरती मलमपट्टी झाली. खरा उपचार म्हणजे न्यायप्रकियेतील विलंब कणखरपणाने कमी करणे हाच होय. यासाठी प्रशासकीय व्यवस्था जेवढी महत्वाची तेवढेच वकिलांचे निरर्थक फसवे युक्तीवाद बाजूला ठेवून प्रश्नावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी लागणारी न्यायालीन शिस्त देखील आवश्यक आहे. हया सुधारणांच्या बाबत सखोल चर्चा समाजांत होत नाही तो पर्यंत कार्यक्षम न्याय पध्दती मिळू शकणार नाही आणि तोपर्यंत समाजाच्या मनातील न्याय प्रकियेबाबतचा निरुत्साह व भिती कमी होणार नाही. तो पर्यंत लोकशाही अधुरीच राहील.
जळगांव स्कँडल मध्ये किती मुली. किती पुरूष माणसे व किती सूत्रधार गुंतले आहेत? किती फोटो, किती ब्ल्यू फिल्मस् निघाल्या आहेत? या बाबत एक फुगीर आकडेवारी आधी प्रसिध्द झाली. नंतर नवीन डीएसपी आले व घोषित आकडेवरी एकदम खाली आली. यामुळे लोकांच्या मनांत जे संशयाचे वातावरण निर्माण झाले ते कषीही पुसले जाणे अशक्य. त्यांत कोणी काय केले हा प्रस्तुत लेखाचा विषय नाही. पण त्या निमित्ताने शासकीय पारदर्शकतेचा विषय नक्कीच चर्चिला जाऊ शकतो. आज शासनाच्या वेगवेगळया यंत्रणेत, पण विशेष करून पोलीस यंत्रणेत लोकांचा सहभाग मला आवश्यक वाटतो. एखादी त्रस्त मुलगी पोलीसांकडे फिर्याद द्यायला आली तर तिला निदान मोकळेपणाने बोलता येईल, प्रसंगी तिला शरम
वाटली तर कोणी धीर देऊ शकेल असे वातावरण असले पाहिजे. जळगांव स्कँडलमध्ये आधी एकही स्त्री तक्रार द्यायला पुढे येत नव्हती. मात्र जळगांवला आमची - (म्हणजे स्त्री अधिका-यांची) टीम गेल्यानंतर माझ्याकडे मुलींचे किंवा त्यांच्यावतीने अर्ज येऊ लागले. आणि सीआयडी ने खास महिला पोलीसांची नेमणुक केल्यानंतरच व नेमलेल्या सीआयडी पथकातील अधिका-यांची विश्वासार्हता खूप असल्यामुळेच, शिवाय त्यात बोरवणकर यांच्यासारखी स्त्री अधिकारी असल्यामुळेच स्त्रिया माहिती द्यायला पुढे आल्या. सांवतवाडीत दिसलेले चित्र या तुलनेने किती तरी आशादायक होते. तिथे डीएसपी यांनीच ही केस पुढे आणण्यामध्ये व त्यांतील मुलींना दिलासा देण्यामध्ये जातीने लक्ष घातले. उद्या सांवतवाडी मध्ये पुनः अशी दुसरी केस झाली तर पोलीसांच्याबद्दल विश्वास बाळवून त्या मुली तक्रार करतील. ही विश्वासार्हता समाज गृहीत धरत नाही. एखाद्या प्रसंगातून ती निर्माण होते आणि तरीही पुढे बराच काळ टिकवून ठेवायची असेल तर शासनाला वेळोवेळी समाजापुढे आपल्या चांगल्या कामाचे उदाहरण ठेवावे लागते. जळगांव येथे मागे घडलेल्या एका घटनेत अशीच एक बलात्कारित स्त्री फिर्याद द्यायला पुढे आली व थोडया कालांतराने ती जळून मेली. याही घटनेचा तिथल्या स्त्रियांच्या मनावर पगडा होता.
त्यामुळे अत्याचारित मुलींच्या मनात तीन वेगवेगळया प्रकारची भिती आहे. या प्रकरणांन गुंतलेली कांही मंडळी सत्तास्थित असल्याने त्यांच्या वतीने आपल्याला शारिरिक इजा केली जाईल ही पाहिली भिती. कोर्टात ही केस गेली तरी कधी चालेल, किती रेंगाळेल आणी अपराध्यांना नक्की शासन होईल कां, की याला, त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जातील ही भिती होती व समाज आपल्याकडे वेगळया नजरेने पाहील ही सर्वांत मोठी भिती. तक्रारी न करणा-या कित्येक माहेरवासाला आलेल्या आहेत. कांही प्रसंगी त्यांच्या घरच्या मंडळींना या प्रकारांची पूर्ण जाणीव आहे. पण ते घर काही झाल तरी माहेर आहे. हा स्पष्ट फरक स्त्रियांच्या मनात होता. ज्या मुलींची लग्न झालीत, ज्यांना एक-दोन मुले आहेत अशांनी कृपा करून आमच्या घरी येऊ नका, आमच्या नव-याला, सासरी, हे कळू नये अशी चौकशी अधिका-यांकडे विनती केली. अन्याय सहन करून गप्प बसणेच या स्त्रियांना का योग्य वाटले, व ही सामाजिक परिस्थिति बदलता येईल का यावर जास्तीत जास्त चर्चा व्हायला हवी.
या साठी आजची व्यवस्था काय आहे? गुन्हा घडल्यानंतर पोलीसाकडेच रिपोर्ट केला पाहिजे हे खरे तर बंधन नाही. एखाद्या न्यायाधीशाकडे देखील तक्रार करता येते. शिवाय तपासाच्या पध्दतीत सुधारणा होऊ शकते. विशेषतः अत्याचारित स्त्रियांबाबत तपासपी करतांना त्या त्या भागांतील एखादी दोन-तीन स्त्रियांची समिती त्या तपासामध्ये सुरवातीपासुन शेवटपर्यंत सहभागी असेल तर ते उपयोगी पडू शकते. कित्येक देशांत खटला चालण्याच्या काळात ज्यूरींची सिस्टम आहे. तशीच ही तपासणीच्या काळातली सिस्टम होऊ शकते. हे व असे कित्येक मुद्दे चर्चेत घ्यायला हवेत.
नवीन पिढीतील तरूणांनी, आणि ३५ वर्षापर्यंतच्या वयोवटातील विवाहित तरूणांनी या चर्चासत्रांमध्ये पुढाकार घ्यायला हवा. त्यांचे मत समाजापुढे मांडायला हवे. या समाजाचे भवितव्य त्यांच्याच भूमिकेवर व त्यांच्याच कामगिरीवर अवलंबून आहे त्यामुळे अत्याचारित किवा अन्य तरूण मुलींना धाडसाने पुढे यावे हे आवाहन जेवढे गरजेचे आहे तेवढेच तरूण मुलांनी देखील समाज सुधारणसेठी पुढे यावे हे ही आवाहन गरजेचे आहे. ते मी या निमित्ताने करू इच्छिते.
------------------------------------------------------------------------------
जळगांव सेक्स स्कॅण्डल 1994 मधे घडलेत्यावेळी या केसची तपासणी व सुनावणी अतिशय वेगाने होईल यासाठी शासनाने सर्व प्रयत्न केले. खास न्यायालये नेमून एकूण 18 खटल्यांची सुनावणी झाली.त्यापैकी 4 खटल्यांत गुन्हा शाबित होऊन आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. मात्र हायकोर्टात अपील होऊन तिथे हे सर्व गुन्हे नाशाबित ठरले. उच्च न्यायालयाचा मुख्य आक्षेप असा होता कि खटल्यातील मुलींची याक्ष विश्वासार्ह वाटत नाही.
यावर माझा प्रश्न असा आहे कि मुलींनी ही साक्ष कधी दिली -- तर जवळ-जवल दीड ते दोन वर्षानंतर, कारण खास न्यायालय नेमले जाऊन सुनावणी सुरू होईपर्यंत तेवढा काळ उलटला होता. विचार करा, तुम्हाला एखादी मोठी जखम झाली आणि तिच्या तीव्रतेचं वर्णन तुम्ही दोन वर्षांनी करू लागले तर जखमेच्या काळाइतकी तीव्रता तुमच्या वर्णनात येईल का ।पण बलात्काराच्या किंवा सेक्स स्कॅण्डलच्या खटल्यातील स्त्रीने मात्र दोन-तीन किंवा कधी कधी तर दहा वर्षानंतरही ती वेदना त्याच तीव्रतेने पु्हा आठवावी, पुन्हा अनुभवावी व वर्णन करावी अशी अपेक्षा कितपत न्यायोचित आहे ।
अगदी अलीकडील जपान टाइम्स मधली ही बातमी पहा --तिथल्या समाजधुरिणांनी एकत्र येऊन विचार केला कि आफल्याकडील खटल्यांचा निकाल लागायला उशीर लागतो,त्यावर अमुक अमुक उपाय केले पाहिजेत.त्या प्रमाणे उपाय झाले व आता जपान मधले खटले अधिक वेगाने संपवले जातात.पूर्वी एका खटल्याला सरासरी एक महिना लागत असे. आता सरासरी पंधरा दिवसात खटल्याचा निकाल लागतो.
आपल्याही समाजधपरिणांनी विचार केला पाहिजे कि आपण कुठे आहोत ।
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखानंतर सुमारे चार वर्षांनी कोल्हापूरच्या डॉ. लीलाताई पाटील यांनी "निमित्त जळगांवचं, बोलूया जिव्हाळ्याचं" या शीर्षकाने वरील कित्येक प्रश्नाचा उहापोह करणारे एक सेमिनार कोल्हापूरला भरवले होते. त्याचा अहवाल कुणाकडे असल्यास या ब्लॉगवर संग्रही ठेवायला आवडेल.
---------------------------------------
शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
chaturang@expressindia.com हा सिक्स्थ सेन्स नव्हे २८ जुलैच्या ‘स्त्री जातक’ सदरातील डॉ. अनघा लवळेकरांचा लेख वाचला. त्यांच्या एका सहकारी स्त्रीला नवीन घरात अस्वस्थ वाटायला लागले. नंतर कळले, त्या घरात आधीचे जे कुटुंब राहत होते त्यांच्यातील कुणी आत्महत्या केली होती. हे उदाहरण स्त्रीचा सिक्स्थ सेन्स म्हणून लवळेकरांनी उद्धृत केले आहे, पण सिक्स्थ सेन्स म्हणून हे उदाहरण स्वीकारावेसे वाटत नाही. सिक्स्थ सेन्समध्येही तुमच्या तार्किक- सारासार विचारशक्तीच तुमच्या नकळत काम करत असतात. त्या कुटुंबात अशी काही घटना घडलेली आहे, हे माहीत नसताना कोणा परक्या स्त्रीला अस्वस्थ वाटायचे काय कारण? ‘गूढकरा’वर विश्वास ठेवणाऱ्यांनाच हे उदाहरण पटेल असे वाटते. विज्ञानवादी विचारसरणी सिक्स्थ सेन्स म्हणूनसुद्धा हे ‘अस्वस्थ वाटणे’ स्वीकारणार नाही. बाकी सर्व वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध पद्धतीने एखादा विचार मांडताना असे विसंगत काही लिहिणे खटकते. - प्रभा वझे, पुणे. तीच शिक्षा योग्य ‘बलात्काऱ्याला भय कोणते’ (४ ऑगस्ट) असे राहिलेलेच नाही याची मुख्य कारणे म्हणजे न्यायदानाला लागणारा अक्षम्य विलंब, राजकीय वा गुंडांच्या धाकाने फुटणारे साक्षीदार, तर कधी पीडित स्त्रीसुद्धा साक्ष फिरविते. गाजलेल्या जळगाव सेक्स स्कँडलमध्ये हेच झाले. त्या वेळच्या तेथील महिला सनदी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी अतिशय परिश्रमपूर्वक हा खटला तयार केला होता. या नराधमांना जन्मठेपेपेक्षा जास्त शिक्षा खून केला तरी होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली शिक्षा राष्ट्रपतींनी कमी करून जन्मठेपेची केली. अशी बक्षिसी मिळाल्यावर त्याचे परिणाम काय होणार? वरील लेखात अशा नराधम बलात्काऱ्याला लिंगविच्छेदनाचीही एकमेव शिक्षा योग्य आहे, असे म्हटले आहे. त्या मताशी मी पूर्णत: सहमत आहे. अशा शिक्षेची अंमलबजावणी करण्याआधी व नंतर जोरदार प्रसिद्धी व्हायला हवी. या नराधमाच्या दुष्कृत्याने एखादी स्त्री जीवनातून उठते तशीच शिक्षा त्याला द्यायला हवी. याबाबत मुद्दामहून नमूद करावेसे वाटते की, दिल्ली न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती कामिनी लाऊ यांनी असे खटले चालविताना एप्रिल २०११ व फेब्रुवारी २०१२ मध्ये निकाल देताना लिंगविच्छेदनाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करावी, अशी सूचना निर्भीडपणे आणि उघडपणे केली होती. अशा न्यायाधीश महोदयांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ठरेल. - सुधीर देशपांडे, विलेपार्ले (पूर्व). संदर्भग्रंथाची यादी उपयुक्त ठरेल ४ ऑगस्टच्या अंकातील ‘आदर लिंगभावनेचा’ हा मंगला सामंत यांचा लेख वाचला. विषय अत्यंत क्लिष्ट असूनही त्यांनी तो अधिकाधिक सोपा करून सांगितला आहे. लेख खूप आवडला. लेखाच्या शेवटी संदर्भग्रंथांची यादी दिली असल्यामुळे ज्यांना या विषयाची अधिक माहिती हवी असेल त्यांना ती मिळवणे सोयीचे ठरेल. स्त्री व पुरुष समागमानंतर निर्माण झालेला गर्भाशयातील भ्रूण हा ७७ क्रोमोझोम धारण केलेला स्त्रीभ्रूण तरी असतो किंवा ७७ क्रोमोझोम घेऊन पुरुषभ्रूण तरी असतो’ असे त्या लिहितात.गर्भाशयातील भ्रूण ७७ क्रोमोझोम धारण करणारा असावा की ७८ धारण केलेला असावा हे कसे ठरते? योजनाबद्ध निर्णय नसेल तर यामागे कोणती यंत्रणा आहे? -डॉ. भा. वा. आठवले, सिंधुदुर्ग या कार्याला त्वरित सुरुवात व्हावी डॉ. मंगला आठलेकर यांनी ‘र.धों.च्या निमित्ताने’ या सदरातून बलात्काराच्या गुन्ह्य़ासाठी सध्या कायद्यात असणाऱ्या शिक्षेच्या तरतुदीचा पुनर्विचार करण्याबाबत जो प्रस्ताव मांडला आहे तो योग्यच आहे, पण या कार्याला त्वरित सुरुवात झाली पाहिजे. मात्र सध्याची शासनयंत्रणा व प्रसिद्धी-पैसा-प्रतिष्ठा यासाठीच धडपडणाऱ्या सेवाभावी संस्था यांना या कार्यरचनेत स्थान देता कामा नये. हे काम समाजातील संवेदनशील पण प्रगल्भ वृत्तीच्या व्यक्तींनी एकत्र येऊन केल्यास त्यातून काही निश्चित, ठोस मार्ग दिसेल. आठलेकर यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, असे मला वाटते. - सुहास बाक्रे, ठाणे तुलना चुकीची नव्हे काय? ‘बलात्काऱ्याला भय कोणाचे’ या माझ्या लेखावरची शुभा परांजपे यांची प्रतिक्रिया (१८ ऑगस्ट) वाचली. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्दय़ावर खरे तर एकेक लेख लिहिता येईल. पण सध्या मला म्हणायचे आहे .. १.पुरुष वासनांध असू शकतो तशी स्त्रीही वासनांध असू शकते हे कोणीच अमान्य करणार नाही. पण त्यांचे दृश्य परिणाम वेगळे आहेत. मुळात फक्त पुरुषच स्त्रीवर लैंगिक बलात्कार करू शकतो. ‘बलात्कार’ या शब्दात बळाचा वापर, क्रौर्य, हिंसा, शारीरिक इजा, सक्तीच्या संभोगातली प्रचंड वेदना आणि भक्ष्य झालेल्या स्त्रीचा जीवघेणा आक्रोश आहे. बलात्कारानंतर स्त्रीला गर्भ राहू शकतो, बलात्काराने दिलेल्या शरीर-मनाच्या जखमा आयुष्यभर एखाद्या दु:स्वप्नासारख्या तिचा छळवाद करीत राहतात. मुख्य म्हणजे अशी स्त्री समाजाकडून ‘टाकली’ जाते. पण शुभा परांजपे म्हणतात तसे श्रीमंत स्त्री जरी तिच्या घरातल्या नोकराशी किंवा ड्रायव्हरशी वासनांध होऊन संबंध ठेवत असली तरी त्या नोकराला किंवा ड्रायव्हरला यापैकी कोणत्याच वेदनेला सामोरे जावे लागत नाही. म्हणूनच स्त्रीच्या आणि पुरुषाच्या वासनांधतेची तुलना होऊ शकत नाही. २. चार वासनांध पुरुष आपल्या वासनेच्या पूर्तीसाठी एखाद्या बाईला फरफटत नेऊन तिच्यावर सामुदायिक बलात्कार करतात, पण चार वासनांध स्त्रियांनी एखाद्या पुरुषाला आडरानात नेऊन त्याच्यावर बलात्कार केला हे ऐकिवात नाही. एका प्रसिद्ध पफ्र्युमच्या जाहिरातीत तो पफ्र्युम वापरणाऱ्या पुरुषाच्या मागे स्त्रिया लागतात म्हणून का त्या पुरुषाच्या चेहऱ्यावर वेदना दिसते? उलट इतक्या स्त्रिया मागे लागल्यात म्हटल्यावर आकाश ठेंगणे झाल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. ३. वासनांध बापाने आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या घटना आपण ऐकतो पण वासनांध आईने पोटच्या मुलावर बलात्कार केला ही घटना दुर्मिळात दुर्मिळ. तेव्हा पुरुषाची लैंगिक वासना आणि स्त्रीची लैंगिक वासना याची तुलना चुकीची नव्हे का? ४. राहता राहिला प्रश्न लिंगविच्छेदाची शिक्षा सुनावलेल्या ‘पुरुष’ या नाटकाचा प्रयोग नाटय़गृहाबाहेर लावावा की नाही हा! याचे उत्तर असे की, जी स्वत: बलात्काराचा बळी ठरली आहे किंवा जिची मुलगी एखाद्या लिंगपिसाट पुरुषाचे भक्ष्य झाली आहे किंवा जिला बलात्कारामुळे स्त्रीच्या वाटय़ाला येणाऱ्या भयंकर आणि कधीच भरपाई होऊ न शकणाऱ्या दु:खाशी स्वत:ला जोडून घेता येते अशा प्रत्येक स्त्रीचे यावरचे उत्तर ‘होय’ असेच असेल. पण ‘आग तर शेजारच्या घराला लागलेली आहे.’ अशी जिची वृत्ती असेल तिला मात्र बलात्कारासारख्या गुन्ह्य़ाला सध्या अस्तित्वात असलेली शिक्षा पुरेशी वाटेल. आणि शुभाताई, वास्तवातल्या गुन्ह्य़ासाठी शिक्षा काय असायला हव्यात यासाठी कोणी नाटकाची मदत कशाला घेईल? सत्य हे कल्पिताहून भयंकर असते. त्या भयंकराला कल्पित कवेतच घेऊ शकत नाही तर त्याच्या नाशाचे उपाय काय सुचवणार? डॉ. मंगला आठलेकर ------------------------------------------------------------ फेसबुकवर --
|
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 11:52 AM 0 टिप्पणियाँ
Wednesday, March 14, 2007
4/ युगान्तर घडतांना (पूर्ण dt 16-5-07)
Also kept at chakori_baheril_prashasan_16/chintaman_moraya
युगान्तर घडतांना
-- लीना मेहेंदळे--
नेहमी आपण ऐकतो कि हिंदू धर्मांत चार वेद संगितले आहेत -- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तसेच चार वर्ण आहेत -- ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आश्रम पण चार आहेत -- ब्रह्मचर्य, गार्हस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. युगे देखील चार आहेत -- सत्ययुग, त्रेतायुग द्वापरयुग आणि कलीयुग. मला तरी वाटते की या सर्व संकल्पना एकांत एक गुरफटलेल्या आहेत.
असे मानतात की सत्ययुगांत समाज ही संकल्पना उदयाला आली होती पण राजा आणि राज्य ही संकल्पना मात्र उदयाला आलेली नव्हती. आगीचा शोध, आकडयांची व गणिताची संकल्पना या सर्वांच्या पुढे मानवजात पोचलेली होती. शेतीला तसेच पशुपालनाला सुरुवात झाली होती पण तरीही ज्ञानाच्या कक्षा फारश्या रुंदावल्या नव्हत्या. माणूस समाजात रहात होता, तरी शेती आणी गांव-समाजावर अवलंबून नव्हता. अजूनही वने त्याला तेवढीच जवळिकीची होती ज्ञानसाधना मोठया प्रमाणावर होण्याची गरज होती. ज्ञानाच्या नव्या कक्षा शोघणे शोघलेल्या ज्ञानाचा प्रसार इतरांपर्यंत करणे आणी त्या ज्ञानाच्या आधारे उपजीविका करण्याची घडी बसवणे या तीनही बाबी महत्वाच्या होत्या. म्हणूनच जंगलात राहून ज्ञानासाधना चालत असे. तिथेच ज्ञानाच्या प्रसारासाठी गुरुकुलेही चालत. अशी मोठी गुरुकुले चालवणारे ऋषि आपल्याकडे विद्यार्थी आणून ठेवीत. त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करीत. त्यांच्याकडून कामेही करून घेत. फार मोठी विद्यार्थी संख्या असेल त्या ऋषिंना कुलगुरु हे नाव संबोधन होते. या संबोधनाचा वापर महाभारतात झालेला आहे.
एकीकडे व्यवसायज्ञानाचा प्रसार होऊन शेती, पशुसंवर्धन, शस्त्रास्त्रांचा शोध इत्यादि गोष्टी घडत होत्या. आरोग्य रक्षणासाठी आयुर्वद निर्माण होत होता. जलदगति वाहने तयार होत होती. शंकराचा नंदी, दुर्गेचा सिंह, विष्णूचा गरुड, कार्तिकेयाचा मयूर, गणपतिचा मूषक, लक्ष्मीचे घुबड, सरस्वतीचा हंस, यमाचा रेडा, सूर्याचा घोडा या सारखी वाहने नेमकी कुठल्या दिशेने संकेत करतात हे आज समजणे कठीण आहे. पण वायुवेगाने जाणारा व तशी गति लाभावी म्हणून जमीनी पासून काही अंगुळे वरून चालणारा इंद्राचा रथ होता तसेच पुढील काळांत आकाश मार्गे जाणारे पुष्पक विमान कुबेराकडे व त्याच्याकडून लंकाधिपती रावणाकडे आलेले होते. त्याही पलीकडे मनाच्या वेगाने संचार करण्याची व तीनही लोकांत कुठेही क्षणार्धात पोचण्याची युक्ति नारदाकडे होती. प्रसंगी आपल्या बरोबर ते इतंरानाही या प्रवासात सामिल करुन घेऊ शकत होते. थोडक्यांत तीव्र गतीच्या वाहनांचा शोध खगोल शास्त्र आणि अंतरिक्षशास्त्र या सारखे विषय लोकांना अवगत होते. या भौतिक विषयां बरोबरच जीवन म्हणजे कांय, मरण म्हणजे कांय, जीव कुठून आला, चैतन्य म्हणजे कांय, मरणोत्तर माणसाचे काय होते हे प्रश्न देखील माणसाच्या कुतूहलाचा विषय होते. सत्य आणि अमरत्वाचा कांहीतरी गहन संबंध आहे व तो नेमका काय याची चर्चा वारंवार होताना दिसते. कठोपनिषदात यम नचिकेत संवादातला कांही भाग मला नेहमीच विस्मित करतो. वडिलांनी सांगितले -- जा, तुला मी यमाल दान करतो. म्हणून नचिकेत उठून यमाकडे जातो, व तो घरी नाही म्हणून त्याच्या दारात तीन दिवस रात्र वाट बघत बसतो. याचा अर्थ यम ही कोणी आवाक्या बाहेरील व्यक्ति नव्हती. पुढे आलेली सावित्रीची कथा किंवा कुंतीने यमाला पाचारण करून त्यापासून युधिष्ठिरासारखा पुत्र मिळवणे या कथाही हाच संकेत देतात. यमाची पत्नी त्याला सांगते -- हा ब्राह्मण तीन दिवस कांही न खातापिता आपल्या दारांत बसून राहिला आहे. आधी त्याला कांहीतरी देऊन शांत कर जेणेकरून त्याचा आपल्यावर क्रोध न होवो व आपले कांही नुकसान न होवो.
यम नचिकेताला तीन वर मागायला सांगतो. त्यापैकी दोन वरातून नचिकेत वडिलांचे प्रेम व पृथ्वीतलावरील सौख्य मागतो पण तिसर्या वरातून मात्र मृत्युपलीकडील ज्ञानाची मागणी करतो. यम त्याला परावृत्त करण्यासाठी स्वर्गसुख व अमरत्व देऊ करतो तेंव्हा नचिकेत उत्तरतो --ज्या अर्थी तू मला या ज्ञानाऐवजी ती सुखे देऊ करतोस त्या अर्थी या ज्ञानाची महती नक्कीच त्या सुखा पेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणून मला तेच ज्ञान हवे. त्यानंतर यम प्रसन्न होऊन त्याला यज्ञाचा अग्नि कसा सिद्ध करायचा व त्यातून सत्याचे ज्ञान कसे मिळवायचे व त्यातून मृत्युपलीकडील गूढ रहस्य कसे समजून घ्यायचे हे शिकवतो.
दुसर्या सत्यकाम जाबालीच्या कथे मधे देखील जाबालीच्या सत्य आचरणावर प्रसन्न होऊन
स्वत आग्नि हा हंसाचे रूप धारण करून चार वेळा त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो. त्याचे वर्णन करताना -- ऐक, आज मी तुला सत्याचा पहिला पाद काय ते शिकवतो -- अशी भाषा वापरली आहे. त्रिलोकाच्या पलीकडे जाऊन अंतरिक्षातील ज्ञानाच्या संबंधात जे सात लोक सांगितले आहेत त्यापैकी सर्वांत शेवटच्या व सर्वात तेजोमय लोकाचे नाव सत्यलोक असे आहे. तिथे पोचण्यासाठी ब्रह्मज्ञान आवश्यक आहे. ईशावास्योपनिषदात याच ज्ञानाला विद्या व पृथ्वीवरील भौतिक ज्ञानाला अविद्या असे म्हटले आहे पण विद्या आणि अविद्या या दोन्ही सारख्याच महत्वाच्या मानल्या आहेत. जाणकार माणसे विद्या आणि अविद्या या दोघांना पूर्णपणे समजून घेतात मग अविद्येच्या सहाय्याने मृत्युपर्यंत पोचून मृत्यूला पार करून विद्येच्या सहाय्याने अमरत्वाचे प्राशन करतात -- म्हणूनच ईशोपनिषदात सत्यधर्माय दृष्टये ही प्रार्थना तर मांडूक्योपनिषदात सत्यमेव जयते नानृतम् हे ठाम प्रतिपादन केलेले आहे. अशा या सत्ययुगात देखील गणितशास्त्र फार पुढे गेलेले होते. विशेषत कालगणनेचे शास्त्र. पृथ्वीतलावरील कालगणना वेगळी आणी ब्रह्मलोकातील कालगणना वेगळी होती. ब्रह्मलोकातील अवघा एक दिवस म्हणजे आपत्याकडील कित्येक हजार वर्षे असे गणित होते. विविध देवतांनी किंवा असुरांनी कित्येकशे वर्ष तपस्या केली. पार्वतीने शंकरासाठी एक हजार वर्षे तप केले या सारखी वर्णने जर सुसंगत असतील तर त्यांचा संबध या इतर लोकांशी असावा असे मला वाटते. अशा कालगणनेच्या आधारे पृथ्वीतलावर सत्ययुगाचा काळ वर्षे आहे अस सांगितले आहे. त्या काळांत ज्ञानाच्या शोध आणि विस्तार हे समाजाचे प्रमुख ध्येय होते.
त्यानंतर आलेल्या त्रेतायुगाची कालगणना वर्षे सांगितली आहे. या काळात राजा ही संकल्पना उदयाला आली. तानचा विस्तार होताच पण आता जोडीला नगर रचना, वास्तुशास्त्र, भवन निर्माण, शिल्प यासारखे व्यावहारिक पैलू महत्वाचे ठरू लागले. ज्ञानातून सृजन झाले व संपत्ती निर्माण झाली, त्याच बरोबर संपत्तीचे रक्षण महत्वाचे ठरले. धनुर्वेदाचे शास्त्र जन्माला आले. आग्नेयास्त्र, महेंद्रास्त्र, वज्र, सुदर्शन चक्र, ब्रह्मास्त्र यासारखी बलाढय अस्त्र शस्त्र निर्माण झाली. समाजाचे रक्षण करण्यासाठी तसेच समाजातील व्यवस्था टिकवून धरण्यासाठी राजे राजवाडे आले. त्यांनी सैन्य ठेवले. त्याचा खर्च भागवण्यासाठी कर बसविण्याची कल्पना उदयाला आली. शेतीच्या जमीनींवर मालकी हक्क निर्माण झाले. उत्पादनावर कर बसवला जाऊ लागला. हे सर्व सांभाळले जावे म्हणून समाजाची धुरा क्षत्रियांच्या खांद्यावर आली. ज्ञानसाधनेच्या कारणासाठी ब्राह्मणांचा मान कायम होता पण पुढारीपण क्षत्रियांकडे आले. महत्वाच्या प्रसंगी राजगुरूंचा सल्ला घेतला जाई -- ब्रह्मदंडाचा मान राजदंडाच्या मानापेक्षा मोठा होता. पण राजगुरू व ब्रह्मदंड या दोघांचा वापर नैमित्त्िाक होता.
रोजच्या व्यवस्थेसाठी राजा हाच प्रमाण झाला. राजाच्या रूपाने विष्णु भगवान् स्वतचा वावरतात अशी संकल्पना पुढे आली. संपती निर्माण होण्यासाठी इतर कित्येक नवे व्यवसाय आणि तंत्रज्ञान पुढे यायला हवेत. भवन निर्माणासाठी धातुशास्त्र हवे तसेच सुतार लोहार ओतारी हवेत. इतर गोष्टींसाठी विणकर धनगर चांभार हवेत. आयुर्वेदातील स्वस्थवृत्तातील यम-नियम दुय्यम महत्वाचे होऊन औषध निर्मितीला अधिक महत्व आले कारण लढाईतील जखमांवर औषधे हवीत पशुवैद्यकातील ज्ञान एवढे वाढले की सहदेव नकुल आणि भीम यांच्या सारखे क्षत्रिय अनुक्रमे गाई-घोडे आणी हत्तींच्या वंशवृद्धिच्या शास्त्रात पारंगत होते. रथ निर्मिती, रथ हाकणे, होडया, रस्ते, बांधणे तलाव धरणे आणी कालवे बांधणे ही शास्त्र लोकांनी हस्तगत केली. भगीरथाने तर प्रत्यक्ष गंगाच स्वर्गातून उतरवून पृथ्वीवर आणल्याची कथा आहे- हिमालयातून निघून पश्च्िामेकडे वहाणार्या गंगेचा प्रवाह ज्या तहेने एकाएकी पूर्वाभिमुख झाला आहे त्यावरून धरणांचे शास्त्र देखील प्रगत झाले असावे असे कळते. रामाने समुद्रातच पूल बांधला. नाणी, विडा आरसे, धातुंचे शिल्प इत्यादी कित्येक उद्योग जन्माला आले.
सत्ययुगामधे शेतीचा जन्म झाला पण द्वापर युगात उद्योग व हस्तकलांचा जन्म झाला त्याचबरोबर वर्णाश्रमांची संकल्पना मोठया प्रमाणात मूळ धरू लागली. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार करेल तो ब्राह्मण. लढाया व राज्यकारभार बघेल तो क्षत्रिय. कृषि, गोरक्ष, व्यवसाय किंवा व्यापार करेल तो वैश्य आणि सेवा शुश्रुषा व देखभाल करेल तो शूद्र असे वर्ण भेद पडले. तरीपण हे प्रत्येक माणसाच्या जन्मावर अवलंबून नसून गुण व कर्मावर अवलंबून आहेत असे भगवद् गीता सांगते. त्याप्रमाणे खरेच विष्णुला क्षत्रिय तर त्याचाच पुत्र असलेल्या ब्रह्मदेवाला ब्राह्मण मानले जाते. शंकर वर्णांच्या पलीकडे आहे पण गणपति मात्र ब्राह्मण मानला जातो. पण कार्तिकेय मात्र क्षत्रिय. अश्र्िवनी कुमार व धन्वन्तरी कोण म्हणायचे? पण ही एवढी थोडी उदाहरणं सोडली तर समाजात मात्र एखाद्याचा जन्मजात वर्ण वेगळा असूनही अंगी असलेले गुण व केलेले कर्म यांच्या आधारे त्याचा वर्ण वेगळा ठरला असे विश्र्वामित्रासारखे एखादेच उदाहरण त्या काळाच्या वाड्मयात सापडते. की हे फक्त समाज धुरिणांचे स्वप्नच राहिले असे म्हणायचे? असो.
त्रेतायुगानंतर आलेल्या द्वापर युगाचा काळ वर्ष मानला जातो. या युगांत राज्य ही संकल्पना पूर्ण पणे भरभराटीला आली. असे मानतात की महाभारत युद्ध हे द्वापर युगाच्या शेवटच्या टप्प्यात घडले. या काळांत राज्य व्यवस्थेबरोबरच व्यापार व्यवस्था भरभराटीला आली. महाभारताच्या युद्धात त्या काळी शीर्षस्थ असलेले बहुतांश राजे व क्षत्रिय मारले गेले तेंव्हा सुव्यवस्या टिकवण्यासाठी कशाप्रकारची समाज रचना झाली किंवा आधी सत्ययुगांत राजे नव्हते तेंव्हा, त्यानंतर परशुरामाने एकवीस वेळा क्षत्रियांसोबत युद्ध करून निक्षत्रिय पृथ्वी केली त्या काळांत व महाभारत युद्धामुळे क्षत्रियांचा संहार झाला. त्याही काळांत राजे व राज्यव्यवस्था फारसे प्रभावी राहिलेले नसूनही समाज व्यवस्था कशी टिकून राहिली हा एक अभ्यासाचा विषय आहे. त्यानंतर आले ते कलियुग. त्याचा कालावधी वर्षांचा सांगितला जातो. सध्या त्यापैकी ---वे वर्ष चालू आहे. त्यामधे गेल्या दोन अडीच हजार वर्षात जे घडले ते आपल्या समोर आहेच. इ.स.च्या पंधराव्या शतकात लोकशाहीची कल्पना पुढे आली व गेल्या पाचशे वर्षात जगभर ही कल्पना ग्राहय होऊन तीच राज्यव्यवस्था ठरली. कांही देशांचे राजे व डिक्टेटर्स वगळता लोकशाही हा शब्द परवलीचा होऊन बसला.
याचाच अर्थ असा झाला की त्रेता व द्वापर युगांत जी राजा ही संकल्पना रूढ झाली ती आता कालबाह्य ठरत आहे. सोळाव्या शतकापासून खुष्कीच्या मार्गाने ससैन्य आक्रमण इत्यादिंच्या जोडीने समुद्री मार्गातून प्रवास व त्यातूनच व्यापार उदीम ही कल्पना उदयाला आली. काल्पनिक असूनही सिंदबादच्या सफरींच्या गोष्टींना अरेवियन नाइट्स मधे मानाचे स्थान होते. या कालांत इंग्लंड स्पेन पोर्तुगात या देशांमधे समुद्र सफरी, सागर मार्गांचे नकाशे तयार करणे, उच्च दर्जाच्या नौका व नौदल बांधणे हे महत्वाचे ठरले. त्या काळांत खुष्कीच्या मार्गाने व्यापारासाठी भारतातून यूरोपात येणारा माल उच्च कोटीचा असे त्यामधे कापड, रेशीम, जडजवाहिर, कलाकुसर, मसाले इत्यादि असत. त्याच्या बदल्यांत या देशांकडे व्यापारासाठी शस्त्रास्त्रे होती. तलवारी आणी तीरकामठयांचा जमाना चालू राहिला पण त्या जोडीला तोफा आल्या. हळू हळू बंदुका पण आल्या. भारता बरोबर व्यापार चालू ठेवायचा तर शस्त्रास्त्रातील प्रगति वाढायला पाहिजे. इथूनच पुढे यूरोपात शस्त्रनिर्मिती हा मोठा उद्योग आणि व्यापार बनून वाढू लागला.
समुद्री मार्गानेच भारतात यायचे हे ठरवून वास्को डि गामा सर्व प्रथम भारतात पोचला. त्यानंतर भारत शोधायला निघालेल्या कोलंबसने अमोरिका हा नवा प्रदेश, नवे जग शोधून काढले. हा प्रदेशही खनिजांच्या दृष्टीने सुसंपन्न होता. यूरोपीय देशांतून बोटीने भारतात तसेच अमेरिकेतही फे-या सुरू झाल्या. इकडे आपण मात्र त्याच सुमारास समुद्रोल्लंघन हे धर्माबाहेरचे ठरवून टाकले. पृथ्वी प्रदक्षिणा आणि वसुधैव कुटुम्वकम् ही संकल्पना असणा-या आपल्या देशांत समुद्र ओलांडायचा नाही, समुद्रयात्रा निषिद्ध ही संकल्पना कशी व कां आली? जर समुद्रोल्लंघन करणारा मारूति हा पूजनीय तर इतरांना समुद्रयात्रा कां बरे निषिद्ध? असो. पण कधी काळी हे झाले खरे. अठरावे व एकोणविसावे शतक दोन तर्हेने विशिष्ट म्हणता येईल. याकाळांत विज्ञानाची प्रगति भरधाव झाली. तसेच प्रगत व शस्त्रे आणि नौदल बाळगून असणार्या देशांनी इतर देश जिंकून तिथे आपली राजवट प्रस्थावित केली. एव्हाना लोकशाठीची कल्पना सगळीकडेच मूळ धरू लगली होती. विसाव्या शतकांत ज्यांनी वसाहतवादाच्या विरूद्ध लढा दिला त्यांनी लोकशाही आणि त्यातील तीन तत्वे समता, बंधुता आणि न्याय यांच्यावर भर देऊनच लढा दिला. आज आपल्याल सर्वत्र लोकशाही रूढ झालेली दिसते त्याचे कारण देखील हेच आहे.
लोकशाही मधे राजे संपले पण समाजव्यवस्था चालण्यासाठी राज्यव्यवस्था मात्र अजूनही आवश्यक राहिली. या नव्या राज्यव्यवस्थे मधे प्रत्यक्ष सैन्य, त्याने भूभाग जिंकणे समोरा समोरच्या लढाया इत्यादी संकल्पना मागे पडल्या. व्यापावी संकल्पना समोर येऊ लागल्या आहेत उत्पादनक्षम व्यावसायिक व्यापारी तसेच ज्याला आज आपण सर्विस सेक्टर म्हणतो ते म्हणजेच विविध प्रकारच्या सेवा पुरवू शकणा-या कंपन्या पुढे आल्या आहेत. ब्रह्मदंड किंवा राजदंडापेक्षा आता आथिर्क शक्ति अधिक प्रभावी ठरू लागली आहे. त्याच बरोबर काम हा पुरुषार्थ -- उपभोग घेणे, हेही समाजात जास्तीत जास्त मान्यता पाऊ लागले आहे. परंतु उपभोगवाद जास्त पसरला की त्याचे रूप विकृत होऊ शकते. महाभारत काळांतही असा प्रसंग आला की युद्धानंतर पृथ्वीवरील जवळ जवळ सगळीच राज्ये नष्ट झाली किंवा संपली. उरले ते हस्तिनापूर येथे युधिष्ठिराचे आणि लांब द्वारकेत यादवांचे. यादवांनी लढाईत भाग घेतलेला नव्हता. मग द्वारकेत चंगळवाद वाढू लागला. मद्य, शिकार, खेळ, मनोरंजन यातच सर्व गुरफटले. शेवटी त्या मनोरंजनाची परिसीमा झाली ती ज्ञानी सच्छील मुनींची टिंगल टवाळी करण्यांत आणि त्यांच्या शापातून यदुवंशी वीरांनी आपापसात भांडणे करून एकमेकांना नष्ट केले.
आज जगाकडे पहातांना अर्थकारण, अर्थव्यवहार, व्यापारी उलांढाली यांना अतिशय महत्व आलेले आहे हे कळून येते. याचा उगमही यूरोप मधे अठराव्या शतकांत जी औद्योगिक क्रान्ती आली त्यामधून झाला. उद्योगधंदे किंवा उत्पादन हे केंद्रित असू शकते तसेच विकेंद्रित देरवील असू शकतो विकेंद्रित उत्पादन व्यवस्था बहुतांश सर्वसमावेशक असते. तशीच ती टिकाऊ असते. दीर्घकाळ चालणारी असते. पण केंद्रित उत्पादन व्यवस्थेमधे त्या मानाने हजारोपट मोठी उत्पादनक्षमता असते. अशी क्षमता असेल तेंव्हा सर्व तर्हेचे मागचे व पुढचे धागेदोरे देखील त्याच पद्धतीने विणावे लागतात. उदाहरणार्थ एक फळ प्रक्रियेचा कारखाना असेल तर त्याला दररोज इतकी टन फळे, इतके पाणी, इतकी वीज, इतके टिनचे डबे लागणारच. तसेच तितके गिर्हाईक, तितके मार्केट, तितकी जाहिरातबाजी लागणारच. अशा वेळी नैतिक अनैतिक हा विचार फार जास्त करता येत नाही. अमेरिकेला तिथल्या शस्त्र कारखान्यांत बनणारी शस्त्रे विकली जायला हवी असतील तर जगांत कुठल्या तरी दोन देशांना आपसांत लढत ठेवणे हे देखील ओघाने आलेच. किंवा एखाद्या कंपनीने लाखो युनिट इन्सुलिन बनवणारा कारखाना काढला तर तेवढया लोकांना डायबिटिस होणे गरजेचे आहे तरच इन्सुलिन खपेल. असो ही टोकाची उदाहरणे आहेत. पण वस्तुस्थितीला धरूनच आहेत.
अठरावे आणि एकोणविसावे शतकांत हे औद्योगिक उत्पादन वाढीचे शतक होते. आधीची कृषिवर आधारित अर्थव्यवस्था झपाटयाने उद्योग आधरित बनत गेली. प्रायमरी सेक्टर चे वर्चस्व जाऊन सेकंडरी सेक्टर (उद्योग) पुढे आले. त्याबरोबर त्याला लागणारे वेगळ्या त-हेचे कसब पुढे आले. पूर्वीची कृषिला पोषक अशी बारा बलुतं मोडीत निघून नव्या प्रकारच्या कौशल्याची गरज निर्माण झाली. विसाव्या आणि एकविसाव्या शतकांत सेकंडरी सेक्टर देखील मागे पडले आहे. आता तिसरा टप्पा टर्शियरी किवा र्सव्हिस सेक्टरचा आहे. याला लागणारी कौशल्ये आणि प्रशिक्षण हे पुन्हा ओद्योगिक काळांत लागणा-या कौशल्यापेक्षा वेगळे असते.
या ही पुढे जाऊन आर्थिक क्षेत्रांत आता अर्थ उत्पादनाचा विचार करतांना प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी क्षेत्राखेरीज तीन सेक्टर्स महत्वाची टरत आहेत. आपण हवेतर त्यांना चौथे, पाचवे आणि सहावे क्षेत्र म्हणूं. त्यातले एक इन्फ्रास्टूक्चर किंवा मूलभूत सुविधा निर्माण करण्याचे क्षेत्र व दुसरे इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन चे क्षेत्र आहे. त्यांचा अंतर्भव पूर्वी जरी तिस-या सेक्टर मधे व्हायचा तरी आता त्यांची वेगळी नोंद घेण्याची गरज वाटू लागली आहे. सहावे सेक्टर आहे ते आरडी-एचआरडी चे. म्हणजे संशोधन आणि त्याचबरोबर मानव विकासाचे. म्हणूनच आता कौशल्य- प्रशिक्षण, पेटंट, इन्टेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट हे विषय वेगळे सेक्टर म्हणून हाताळण्याची गरज जाणवू लागली आहे. कदाचित उद्याचे युगांतर घडतांना ते या मुळेच घडेल.
या आधी औद्योगिक क्रान्ति ने एक नव्या युगाला जन्म दिला होता तसेच विजेचा शोध आणि त्याही पेक्षा मोठया अर्थाने विजेच्या बल्बच्या शोधाने एक नवे युगान्तर घडवले. बल्बचा आविष्कार एडिसन ने केला त्या अगोदर सर्वत्र तेलावर चालणारे दिवे किंवा मशाली होत्या. रात्रीवर अंधाराचे साम्राज्य असायचे. फार थोडया जागी व फार थोडया प्रमाणात रात्रीच्या वेळी व्यवहार चालू शकत. आता चोवीस तास उजेडाची व चोवीस तास काम करत रहाण्याची सोय झाली आहे ती या आविष्कारामुळे. बल्ब आले आणि रात्रीची अशी एक वेगळी संस्कृती तयार झाली. अशीच क्रान्ति रेडियो, टीव्ही, कम्प्यूटर व मोबाइल यांनी आणली आहे. टिशू कल्चर आणि क्लोनिंग मधून एक वेगळी क्रान्ति निर्माण होणार आहे. पण निव्वळ अशी क्रान्ति म्हणजे युगांतर नाही. जेंव्हा त्या नव्या आविष्काराने समाजाचे जीवन मूल्यच बदलते, समाज व्यवस्था बदलून जाते तेंव्हा युगान्तर घडतं.
थोडक्यांत कांही नवे आविष्कार व त्यांच्या सोबत एक नवी वैचारिक दिशा, नव्या मूल्यांचा आकृतिबंध आणि त्यांची पडताळणी असे सर्व कांही जुळून येतात तेंव्हा युगांतर घडते. यासाठी मूल्यांची चर्चा सतत होत राहिली पाहिजे. महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता संपवून एका नवीन मूल्याचं वळण लावल. एक युगान्तर घडवलं. राजा रायमोहन राय यांनी विधवा स्त्रीया सती जाण्याची प्रथा बंद पाडून तर कर्वे आणि सावित्री बाईनी स्त्रीशिक्षणाचा पाया रचून एक युगान्तर घडविले. अशा युगान्तराच्या वेळी वर्णव्यवस्था अर्थव्यवस्था कौशल्य प्रबंधन. राज्यव्यवस्था अशा सर्वांचीच कसोटी लागते. आणि तावून सुलाखून जे निघते ते टिकते. तसे कांहीच निघाले नाही तर एक अराजकाची परिस्थती तयार होते त्या अराजकाच्या परिस्थितीत कांही समाज, सभ्यता पार पुसून जातात तर कांही समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील गटांची कांस धरून टिकून रहातात, त्यांची डोळसपणे नोंद ठेवली तरी पुढच्या पिढींना मार्गदर्शक ठरते. आरडी-एचआरडी चे महत्व आहे ते यासाठीच.
---------------------------------------
published in weekly Lokprabha. Leap and MAngal files Kept on Chintaman_moraya_16
प्रस्तुतकर्ता लीना मेहेंदळे पर 1:06 PM 3 टिप्पणियाँ