Friday, May 30, 2008

मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी - इनस्क्रिप्ट

मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी - इनस्क्रिप्ट
- लीना मेहेंदळे, भा.प्र.से.

सुमारे नव्वद ते नव्व्याण्णव टक्के मराठी किंवा कोणत्याच भारतीय भाषेतील लेखकांना हे माहीत नाही कि एका युक्ती मुळे मराठी व तत्सम भारतीय भाषांचे टायपिंग शिकायला फक्त अर्धा तास पुरतो. आणि आता ऑफिसेस मध्ये सर्वत्र संगणकांचा बोलबाला झाल्यावर खूप अधिका-यांनी गरजपुरते एका बोटाने करण्याइतपत इंग्रजी टायपिंग शिकून घेतले आहे. पण त्यांना देखील हे माहीत नाही की त्याच संगणकामध्ये अर्ध्या तासांत मराठी टायपिंग शिकण्याची युक्ती देखील आहे. या युक्तीचे नांव इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट. पुढे वाचा

----------------------------------------------------

2 comments:

.. said...

आपल्याला इन्द्रजाल सहज उपलब्ध असेल तर आपण आता थेट मराठीत लिखाण करू शकता. गुगलने ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे, त्याची लिंक मी खाली देत आहेच.
ही पद्धत अतिशय सोपी आहे कारण त्यांनी फोनेटिक्सचा वापर करून हा एडिटर बनवलेला आहे. त्यामुळे इंग्लिशमध्ये ज्याप्रमाणे त्या मराठी शब्दाचे स्पेलिंग होईल त्यानुसार जर टाईप केले तर आपोआप त्याचे मराठीत रूपांतर होते.
थोडयाफार सरावानंतर हे अतिशय सोपे होउन जाते व त्याच्याबरोबरच मराठीत टाईप करण्याची सवय देखील लागते.
http://www.google.com/transliterate/indic/#

प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही!

लीना मेहेंदळे said...

मला इंग्लिश न शिकताच माझी भाषा व त्याचे टायपिंग आधी शिकायचे असेल तर फोनेटिक्सचा वापर चालणार नाही. त्या ऐवजी इनस्क्रिप्ट ही पद्धत देखील अतिशय सोपी आहे.