Friday, May 17, 2013

RO Water = पर्यावरण भकास पण म्हणे आर्थिक विकास

पर्यावरण भकास म्हणजेच आर्थिक विकास कां?

पर्यावरण भकास, पण म्हणे आर्थिक विकास


******लीना मेहेंदळे********



माझ्या सुदैवाने माझे वास्तव्य जिथे जिथे झाले, तिथे पिण्याच्या पाण्याचा – म्हणजे ते शुध्द नसण्याचा प्रश्न कधीच उद्भवला नाही. त्यामुळे टीव्हीवरील सिनेतारकांनी केलेल्या ‘अमुक तमुक कंपनीचे जल-शुध्दीकरण यंत्र किती चांगले आहे’ यासारख्या जाहिराती या माझ्या उपहासाचा व उपेक्षा करण्याचा विषय होता. पण सुमारे चार वर्षांपूर्वी मी बंगळुरूला आले. सरकारी घरांच्या ज्या कॉलनीत मला घर मिळाले, तिथे बंगळुरू नगरपालिकेकडून शुध्द पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे तशाच जाहिरातींपैकी एका कंपनीचा वॉटर प्युरिफायर तातडीने घ्यावा लागला आणि या धंद्यात आपल्या देशाचे किती मोठे नुकसान होत आहे, ते ध्यानात येऊन मी थक्कच झाले.
मशीन बसवून देण्यासाठी आलेल्या माणसाने मशीन भिंतीवर माऊंट केले. नगरपालिकेच्या नळातून मशीनला एक कनेक्शन दिले, पाणी भरले आणि दहा मिनिटे थांबून ”आता आमचे पाणी पिण्याच्या योग्यतेचे आहे” असे डिक्लेअर केले. मी मशीनच्या नळाची तोटी उघडून पेल्यात पाणी घेत असताना माझ्या लक्षात आले – मशीनमधून आणखी एक आउटलेट होते आणि त्यातून एक बारीक नळी पुन्हा वॉश-बेसीनमध्ये सोडली होती. इकडे मी तोटीतून पाणी घ्यायला सुरुवात केल्याबरोबर तिकडे त्या नळीतूनही पाणी वाहून जाऊ लागले. मी त्याला विचारले, ”हे काय?” तो म्हणाला, ”अशुध्द पाणी.” मग रुबाबात त्याने आपल्या खिशातून फूटपट्टीसारखे दिसणारे BOD मोजणारे यंत्र काढले आणि पेल्यातील पाण्यात बुडवले. यंत्राने BOD (Biological Oxygen Demand – जितके अशुध्द पाणी, तितकी BOD जास्त) दाखवले – 350 युनिट्स. मग त्याने ती पट्टी बारक्या नळीतून वाहणाऱ्या पाण्यात धरली आणि मला रीडिंग दाखवले – 800 BOD. मग माझ्या विचारण्यावरून नगरपालिकेच्या पाण्याचे डायरेक्ट रीडिंग दाखवले – ते होते 550 BOD. मी पेल्यातल्या पाण्याची चव बघितली – ते खरोखर चांगले होते. पण 550 BOD म्हणजे आरोग्यास अपायकारक.
त्यामुळे नगरपालिकेचे पाणी डायरेक्टली नळातून घेऊन वापरून चालणार नाही, हे उघड होते.
आणि असा माझ्या डोक्यात उजेड पडला की या यंत्रात नगरपालिकेतून आलेल्या पाण्याचे दोन भाग पाडले जातात. एका भागातील ‘अशुध्दता’ कमी करून ती दुसऱ्या भागातील पाण्यात जाईल, अशी व्यवस्था केली होती. रसायनशास्त्र शिकले असल्याने माझ्या लक्षात आले की रिव्हर्स ऑस्मॉसिस किंवा तत्सम आणखी काही प्रक्रिया करून असे करणे शक्य आहे. त्या यंत्रात बसवलेल्या उपकरणामुळे ही प्रक्रिया होत असते आणि प्रत्येक वेळी उपकरणाच्या तोटीतून आपल्याला चांगले पाणी दिले जाते, तेव्हा जवळजवळ तितकेच पाणी अधिक ‘अशुध्द’ झाल्याने बाहेर फेकून दिले जात असते. चांगल्या पाण्याचा BOD हा 350 युनिट तरी का? शून्य किंवा 50 किंवा 100 युनिट का नाही? याचेही कारण आहे. पाणी जेव्हा त्याच्या अतिशुध्द स्वरूपात असते, तेव्हा ते चवहीन असते. त्याच्यात नैसर्गिकरीत्या विरघळून असलेल्या काही ठरावीक क्षारांमुळे ते चवदार बनते. मात्र त्याच क्षारांची मात्रा एका ठरावीक मर्यादेपलीकडे गेली, तर पाणी खारे होते आणि ते पिववत नाही. पाण्यात इतरही दोन प्रकारची अशुध्दे असू शकतात – त्यात न विरघळणारा थोडा कचरा किंवा घाण असू शकते, ज्यामुळे पाणी गढूळ होऊन त्याचा रंग मातकट होतो. किंवा पाण्यात कचरा-घाण-माती नसेल – पाणी स्वच्छच दिसेल, पण त्यात डोळयांना न दिसणारे सूक्ष्म जीवाणू (बॅक्टेरिया अथवा व्हायरस) असू शकतात. गढूळ पाणी असेल तर ते गाळणे, हा उपाय लागू पडतो. बॅक्टेरिया असतील तरी BOD वाढतो – अशा वेळी BOD कमी करण्याबरोबरच त्या मशीन्समध्ये जीवाणूनाशकदेखील असतात. थोडक्यात, आपण घराघरांतून बसवत असलेली पाणी-शुध्दी मशीन्स काय करत असतात, तर ती पाण्यातील गढूळपणा, जीवाणू आणि अतिरिक्त प्रमाणातील क्षार काढून टाकतात आणि अशा प्रकारे स्वच्छ, शुध्द पाणी आपल्याला मिळत असतानाच, सुमारे तितकेच पाणी फुकट जात असते.
बंगळुरू शहरात ज्या लोकांना नगरपालिकेच्या नळ पाणीपुरवठा स्कीममधून पाणी मिळते, अशी लोकसंख्या किमान पन्नास लाख तरी आहे. दरडोई जेवणासाठी दहा लीटर पाणी असा जरी हिशोब केला, तरी पाच कोटी लीटर पिण्यालायक पाणी हवे. आमच्या कॉलनीमध्येच सुमारे चारशे घरे होती व नगरपालिकेचे चांगले पाणी मिळत नसल्याने प्रत्येक घरात पाणी शुध्दीकरण यंत्र आवश्यक होते. इतर भागांमध्ये कदाचित शुध्द पाण्याचा पुरवठा असेलही. पण श्रीमंती म्हणून, हौस म्हणून किंवा उगीचच रिस्क नको बाबा म्हणून घरात वॉटर प्युरिफायर बसवणारी शेकडो-हजारो कुटुंबे आहेत. अगदी पाच कोटी लीटर नाही, तरी किमान एक कोटी लीटर पाणी दररोज वॉटर प्युरिफायरमार्फत वापरले जात असावे. तसे असेल, तर सुमारे तितकेच पाणी सरळसरळ वाया जात आहे.
मात्र हे एवढे पाणी नगरपालिका रोज कुठून तरी उचलते, नळ योजनेद्वारा घरा-घरापर्यंत पोहोचवते. बंगळुरू शहर विस्तीर्ण पसरलेले शहर आहे. नगरपालिका पाणीपुरवठा केंद्रापासून पार वीस-पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरील घरांना नळ योजनेद्वारा पाणी पुरवले जाते. तसेच वाया जात असलेले पाणीदेखील ड्रेनेज सिस्टिमद्वारे वाहून नेले जाते आणि दूर कुठेतरी सांडपाणी केंद्रावर नेऊन सोडावे लागते.
अशा तऱ्हेने बंगळुरू शहरामध्ये दररोज लाखो लीटर पाणी पंपिंगद्वारे घराघरापर्यंत आणून मग वाया घालवले जाते. यामध्ये पंपिंगला लागणारी ऊर्जा व खुद्द पाणी हे दोन्ही वाया जात असतात.
पण फक्त बंगळुरू शहरामध्ये हे चित्र आहे, असे तुम्हाला वाटते का? जवळपास प्रत्येक महानगरपालिकेमध्ये हेच चित्र असेल. वीज आणि पाणी, दोन्ही दिवसेंदिवस महाग होत असताना आणि त्यांचा खर्च सबसिडाईज करण्यासाठी सरकार तुमच्या-माझ्या खिशातून टॅक्सरूपाने कोटयवधी रुपये काढून खर्च करत असताना अशा प्रकारची नासाडी योग्य वाटते का? या नासाडीबाबत आपण जागरूक नसलो किंवा बेदरकार असलो तर ही मनोवृत्ती आपल्या देशाला परवडणारी नाही. ती सुधारेल व लोक याबाबत चिंता व चिंतन करतील, अशी परिस्थिती येणे गरजेचे आहे.
प्रत्यक्षात मात्र वेगळीच मनोवृत्ती जोपासली जात आहे. आम्ही स्वच्छ पेय पाण्याचा पुरवठा करू शकतो, असे ठामपणे सांगणाऱ्या नगरपालिका हव्यात. त्याऐवजी आम्ही करू शकत नाही, लोकांनी आपापली काळजी घ्यावी, असे सांगितले जाते. मग वॉटर प्युरिफायर कंपन्यांची चलती होते. देशाचा GDP वाढतो, कारण त्यांची मशीन्स विकली जातात आणि GDP वाढणे केव्हाही आर्थिक प्रगतीचे द्योतक आहे, असे अनर्थकारी तत्त्वज्ञान सांगितले जाते. अनर्थकारी यासाठी, की वरील उदाहरणात ऊजर्ेची व पाण्याची नासाडी म्हणजेच मशीन्सच्या विक्रीतून वाढलेली GDP, असे समीकरण स्पष्ट दिसते. पर्यावरणाचा ऱ्हास करणारे, तसेच प्रशासनाची अकार्यक्षमता झाकणारे व लोकांची भोगवादी प्रवृत्ती वाढवणारे GDPचे असे गणित म्हणजेच आर्थिक विकास, हे समीकरण थांबवले पाहिजे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------

Shirish Paranjpe 



Namaskar,

With reference to above subject matter I would like to comment on your article.

1 The BOD has nothing to do with dissolved salts like CaCO3, CaHCO3, CaSO4. These salts disturb the taste of water,but does not increase the BOD of water
.
2 Bacteria and viruses do increase the BOD.But their contribution is very less.The main cause of 
the BOD is dissolved organic matter and suspended organic matter.

3 The water with BOD less than 10 ppm is available and with good taste.

4 The R.O. machines decrease the salts content to certain extent and also organic matter to certain extent.So long there is organic matter in water,then it will have high BOD values

5 Wikipedia says moderately polluted rivers have BOD around 8 ppm  
 
6 And lastly I appreciate your knowledge in the above subject matter and this letter should be taken as fact finding and not as fault finding.

Thanks.
Leena Mehendale 


to Shirish
Thanks a lot for corrections about the facts on what pollutes water and how. The emphasis is however on wasting so much water and energy just because corporations don't provide potable water and the luxurious people go for the wasteful option.





































Monday, May 6, 2013

सांगली --प्रोत्साहन कुणी, का, कुणाचे, कसे महसूल अधिवेशन

सांगली येथील भाषण दिनांक -- एप्रिल २०१३
--प्रोत्साहन कुणी, का, कुणाचे, कसे
-- महसूल कर्मचारी अधिवेशन