Thursday, March 22, 2007

3/ नीती आणि दंड या माझ्याच विभूति आहेत -- Ch 10 of bhagvadgeeta

नीती आणि दंड या माझ्याच विभूति आहेत
दैनिक सकाळ दिनांक ११.२.९७

भगवद्गीतेत ज्या कित्येक संकल्पनांची मांडणी आणि विवेचन केले आहे त्यातली एक अतिशय सुंदर कल्पना म्हणजे विभूतियोग. केषु केषु च भावेषु चिन्त्योसि? तुला मी कोणकोणत्या रूपात पाहू? तूच तुझ्या रूपडायाचे वर्णन कर. असे अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो. देव अनाकलीनीय आहे. निर्गुण, निराकार आहे वगैरे सगळे सिद्धान्त बाजूला ठेवून भगवतांनी आपल्या ओळखीच्या खुणा सांगितल्या. आपण देवापर्यन्त पोचू शकत नाही, देवपण मिळवू शकत नाही ही कल्पना मोडीत काढून प्रत्येक माणूस देवपण मिळवू शकतो अस सांगणारा हा विभूतियोग आहे, उत्तुंगाचा ध्यास घेतलेल्या मनाला मोठे आव्हान देऊन जी देवपणाची प्राप्ती आपल्या सर्वाना सुणावत असते, पण अप्राप्य वाटत असते, ते सहज शक्य असून पुढे हो आणि ते प्राप्त करून ये असे सांगणारा हा विभूतियोग. भगवतांच्या अपस्थितीच्या खाणाखुणांची साध्या सोप्या मनमोहक उदाहरणामधून ओळख करून देतांना हा अध्याय सहजगत्या आपल्या कर्तृत्वाला कधी हात घालतो ते कळून पण येत नाही आणि त्याचे आमिष काय, तर साक्षात त्या भगवतांची समकक्षता मिळवणे! एक वेगळी ध्येयासक्ति आपल्या, मनांत निर्माण करून भगवंत (किंवा व्यास गुनी) अलगदेपणे विश्र्वरूप दर्शनाकडे वळले खरे, पण हा दहावा अध्याय आपल्याला पुनः पुन्हा मागे ओढून आणतो आणि गुंगवून टाकतो.

माझा अस्तित्व कुठून कस सुरू झाल ते माझ्या शिवाय कुणालाच माहीत नाही. सर्व ऋषि, मुनी, देव प्रजापती, मनु- थोडक्यांत ज्यांनी कुणी सुरवातीच्या छोटया अवस्थेपासून पुढे मोठया प्रमाणावर ही ऋष्टी
सांभाळली व लोकांच भरण-पोषण करून सृष्टीचा व्यापार वाढवला-त्या सर्वांची उत्पत्तीमात्र माझ्यापासून झाली. असे श्रीकृष्णाने म्हटल्यावर अर्जुनाने त्याला सांगून टाकल- सगळीकडे मी आहे, सर्वाचा आदि मी आहे, असल व्यापक पण निराकर वर्णन मला नको. तुझ्या उस्तित्वाच्या ठळक खुणा, उदाहरण, ज्यांव्याकडे पाहून मला तुझ्या असण्याची प्रचीती येईल, ज्यांच्यामधे तू प्रकर्षाने वास करीत आहेस, अस पटेल अशांची वर्णन मला सांग. म्हणजेच संपूर्णपणे निराकारता सोड, तुझ साकार रूपच मला सोईच आहे. तिथे तू असलास तर सांग! या प्रश्नावर श्रीकृष्णाने उत्तर दिले अर्जुना, माझ्या साकार रूपाच्या खुणा सांगायव्या झाल्या तरी त्यांची अगणित उदाहरणे देता येतील. पण माझ्या कांही ठळक खुण तुला सांगतो.

आणि अशा ठळक खुणा वाचतांना आपल्याला प्रत्यय येतो की सामर्थ्य, कर्तृत्व, सत्य आणि विजीगिपु वृत्ति इथे भगवंतानी स्वतःच अस्तित्व जास्त प्रकर्षाने असल्याच कबूल करून टाकल.

मी सर्वच भूतांचा आत्मा आहे, त्यांचा आदि, मध्य आणि अंत मीच आहे. तरी पण तुला माझा विचार करायचा असेल तेंव्हा तू सर्व आदित्यांपैकी विष्णूचा, सर्व प्रकाशमान वस्तूंपैकी सर्याचा, आकाशस्थ चांदण्यांपैकी चंद्राया, वा-यामधे अतिवेगावान मरीचीचा आयुधांमधे वजाचा, प्राण्यामधे सिंहाचा, पक्षांमधे मरूडाचा जलचरांमधे, मगरीचा, शस्त्रधारींमधे रामाचा, पांडवांमधे अर्जुनाचा, वृष्णींमधे स्वतः माझा, मुनींमधे व्यासमुनींचा, सापांमधे वासुकीचा, सेनापतीमधे स्कंदाचा विचार कर.

या शिवाय ऐरावत, हत्ती, उच्चेश्रवा नामक घोडा, कामधेनु नांवाची गाय, राक्षसराज प्रल्हाद, देवराज इंद्र, यक्षराज कुबेर, जलाधिपती वरूण, देवगुरू बृहस्पति, माणसांमधे राजा, अशा सामर्थ्यशाली व्यक्तीमध्ये माझेच प्रतीक बघ. अनेकांपैकी सर्वश्रेष्ठ कोणी एक अशा खुणांबरोबरच निसर्गातील भव्यता, आणि सौंदर्य दाखविणा-या खुणांचा देखील समावेश केला आहे. पर्वतामधे उच्चतम शिखर असलेला मेरू पर्वत, नद्यांमधे गंगा, स्थिर वस्तूंपैकी हिमालय, तेजस्वी वस्तूपैकी खुद्द अग्नि, सरोवरांमधे समुद्र, ऋतुमधे वसंत, सर्व महिन्यांमधे मार्गशीर्ष आणि सर्व वेदांमधे गेयेतेमुळे गोड झालेला सामवेद अशा सौंदर्याच्या खुणांकडे पण स्वतःचे प्रतीक म्हणून श्रीकृष्णाने बोट दाखवलेले आहे.

फक्त व्यक्तीमधेच नाही तर कलाकृतींमधे पण स्वतःच्या खाणाखुणा सांगतांना त्यांच्यातील दिव्यत्वाचे भान आपल्याला करून दिले आहे वेदांमधे सामवेद, कुठल्याही साहित्यिक रचनेत तिची सुरूवात, तिचा उत्कर्षबिंदू व शेवट, छंदामधे गायत्री छंद, यंज्ञापैकी इतर कोणत्याही अवडंबराची गरज नसलेला जपयज्ञ! ; याचबरोबर इंद्रियांपैकी इतर कोणत्याही अवडंबराची गरज नसलेला जपयज्ञ! याचबरोबर इंद्रियांपैकी मन, सर्व सजीव प्राण्यामधे सजीवपण म्हणजे चैतन्य, ज्ञानीजनांचे ज्ञान, गुप्तपणासाठी मौन, सत्वशील माणसाचे सत्व, चर्चा-संवादातील वादपटुता, व्यवसायामधे जय, तेजस्वी माणसाचे तेज आणि संयमशील व्यक्तीमधला यम! ही कृष्णाने आपली रूपे म्हणून सांगितली. यातील यम हा शब्द समजून घेण्यासारखा आहे. पातंजली योगसूत्रामधे सत्य, अहिंसा, अस्तेय (म्हणजे स्वकष्टार्जित वस्तूशिवाय इतर वस्तू न स्वीकारणे) ब्रम्हचर्य, आणि अपरिग्रह (म्हणजे गरज नसलेली वस्तू संग्रह करून न ठेवणे) असे पाच गुण म्हणजे यम अशी व्याख्या केली आहे. आणि आपल्या ग्रंथांनी यम धर्म यालाच मृत्यूची देवता पण मानले आहे तसेच नचिकेत यम संवादाचे सार असे आहे की ज्याने वरील पाच यम आत्मसात केले असतील त्याला मृत्यूची भिती नाही. अशा यमांच श्रेष्ठत्व सांगायला भगवान विसरले नाहीत, आणि स्वतःच्या प्रतीकांमधे त्यांचा समावेश केला आहे.

मी मृत्यू आहे, काल आहे, धाता आहे.  म्हणजे गतकाळात सृष्टी घडवणारा धाता मीच आहे तर भविष्यकाळातील होणे किंवा असणे ही क्रिया पण मीच आहे अशा शब्दात स्वतःचे प्रतीक सांगताना जीवन, मृत्यू, काळ, वेळ या सर्व विषयांना तात्विक चिंतनाच्या अंगाने स्पर्श केला आहे.

माणसाला हवेहवेसे पण फक्त कर्तृत्व आणि प्रयत्न यांच्यामुळेच साध्य होऊ शकणारे कीर्ती, श्री वाणीसामर्थ्य, स्मृति, मेधा, क्षमा आणि धृति हे संपादनयोग्य गुण पण स्वतःची ओळखे म्हणून सांगितले, याशिवाय अगदी सुरवातीलाच बुद्धि, ज्ञान, दान, भय-अभय, यश-अशय, सुख दुख, असणे व नसणे हे देखील
स्वतःचेच प्रकट होण्याचे भाव म्हणून सांगिले आहेत. यावरून स्वतःच्या विकासासाठी माणसात कोणते गुण असावेत त्यांची कल्पना येते.

असे प्रकारे उत्कर्षांची, प्रयत्नांची, यशस्वीतेची, परंपरा सांगणारा- तिथे तू मला निश्चितपणे जाण अस सांगणारा हा विभूतियोग! आळस व अकर्तृत्वाला झटकून टाकून भव्यता आणि दिव्यता संपादन कर - तस केल्यास तू माझ्या समकक्ष होशील कारण लोकांना माझी खूण पटावी म्हणून मी तुझ्याकडे बोट दाखवीन- तुझ्यावरून त्यांना माझे अस्तित्व जाणवेल, तुझ्याकडे पाहून तुझ्या मार्फत त्यांना माझे दर्शन घडेल व माझी अनुभूति मिळेल अस हा विभूतियोग सांगतो, अशा प्रकारे व्यक्तिच्या व समाजाच्या विकासाठी कर्तव्यपयायणतेची दिशा दाखवून देतो.

ही दिशा दाखवतांना समाजाचा उत्कर्ष जपणारी आणि व्यक्तिइतकेच समाजासाठी महत्वाचे असलेले दोन गुण सांगितले आहेत ते आहेत- शासन चालवणा-यामधे दंड करण्याची क्षमता आणि नीती! दंड करण्याची क्षमता आणि दंडुकेशाहीत फरक आहे, न्याय अन्यायाचा, सत्य असत्याचा सारासार विचार व विवेक करून प्रभावीपणे दंड देणे, त्या दंडामुळे इतर दुष्प्रवृत्त लोकांना आळा बसणे आणि सज्जनांच्या सत्प्रवृत्तींना विकासाचा मार्ग मोकळा रहाणे हा त्या दंडाच्या शक्तीमधला दैवी गुण, असा दंड देऊ शकणे  ही भगवंतांनी स्वतःची खूण म्हणून सांगितली आहे.

त्याचप्रमाणे नीतिरस्मि जिगीषिताम् हे सूत्र देखील एक परमोच्च आदर्श घालून देते.जिंकण्याची इच्छा असणाऱ्यांमधे नीतिनेच विजय मिळवण्याची  चाड असणे हा गुण भगवंतांनी स्वतःची खूण म्हणून सांगितला. नीतिनेच विजय मिळवून नीतिनेच राज्य चालवणे ही ईश्वराची विभूति आहे. आपल्यामधे शासनकर्ता हा विष्णूरूप समजला जातो. तो नीतिनेच राज्य करील, कुणाला लुबाडणार नाही, प्रसंगी युद्ध करावे लागले तरी युद्धांत अनीतिने वागणार नाही, आणि शासनांत तर नाहीच नाहीया भूमिकेने जो वागेल तो ईश्वराच्या  समकक्ष होईल.

जे कांही अस्तित्वात आहे, जीवनमय, आहे त्याचे बीज मीच आहे, जिथे जिथे तुला विभूति दिसेल, श्री, सत्व, उर्जा, किंवा तेज दिसेल ते ते माझ्याच अशातून प्रकट झालेले व माझाच ठावाठिकाणी दाखवून देणारे आहे, ही ओळख, ही खूणगांव अर्जुना, तू मनाशी बाळग अस सांगतांना व्यासांनी आपल्या सर्वासमोर एक जादुगरी पसरून ठेवली आहे - तस वागून, तसे गुणसंपादन करून देवत्व मिळवाव्याचे आव्हान देऊन ठेवले आहे. देव कुठेतरी लांब नसून आपल्या प्रयत्नांत, आपल्या सत्वात, आपल्या नजरेव्या टप्प्यांत आहे. फक्त आपण आपल्याला ओळखून घेतले पाहिजे!

-------------------------------------------------------------------

No comments: