आजचे स्त्री जीवन
आजच्या स्त्रीचे जीवन समजावून घेतांना निरनिराळया कालखंडातील स्ञियांचे जीवन समजून घ्यावे लागेल तसेच त्यांच्या पुढील समस्या, त्यावरील उपाययोजना व स्ञियांचा भविष्यकांल याचाही विचार करावा लागेल. भारतीय संदर्भापुरते बोलायचे झाले तर स्ञीयांना आपल्या समाजात फार आदराचे स्थान दिले गेलेले आहे. सर्वप्रथम मातृदेवो भव असच म्हणतात. आपल्या संस्कृतिमधील ही अत्यंत भावनात्मक बाब कायम डोळयापुढे ठेऊनच स्त्री जीवनाच्या इतिहासाचे विश्र्लेषण करावे लागेल, व आजच्या स्त्री बाबत कांही निश्चित निष्कर्ष काढता येतील. प्राचीनकाळापासून स्त्रीच्या सामाजिक इतिहासाचे दोन महत्वपूर्ण टप्पे पडतात. वैदिक काळातील स्ञी कशी होती ? तिचे सामाजिक स्थान काय होते ? भारतीय संस्कृतिमधे स्ञीचे जे आदराचे स्थान मूलभूत धरलेले आहे. त्या भावनेपोटी तिला आदर मिळत होता की कांही अन्य कारणाने ? यासाठी त्या काळी सम्मानित ठरलेल्या सरस्वती, उमा, लक्ष्मी, सती, गायञी इत्यादि स्ञियांचा विचार करावा लागेल. या सर्व स्वतः कतृत्वशालीनी स्ञिया होत्या. देवसेनेचे सेनापतित्व एकेकाळी दुर्गेकडे होते तर स्वसामर्थ्याने जगाचा दैनंदिन व्यवहार सुरू करणारी देवता म्हणून उषा या देवतेचा लौकिक होता. एकूण स्ञीला, तिच्या कर्तृत्वाला सम्मान देताना स्त्री पुरूष हा भेदभाव समाजात ठेवला जात नव्हता. स्त्रियांवर उपनयन इत्यादि संस्कार देखील केले जात असत अस वैदिक काळाचं चिञ दिसत.
महाभारत काळानंतर माञ आपल्याला 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' हे चिञ प्रभावीपणे दिसते. स्ञी ने कुमारिका असतांना पित्यावर, लग्न झाल्यावर पतिवर व वृद्धकाळी मुलावर संपूर्णपणे अवलंबून रहावे. तिच्या मुलांना जर कांही शिक्षण तिने दिले असेल तर फक्त त्यातूनच तिचे कर्तृत्व दिसावे. तिचे शिक्षणदेखील व्रतवैकल्याचे पालन करण्यापुरतेच व्हावे. कुठे वैदिक कालीन सरस्वतीचे चिञ व कुठे हे चिञ. भगवद्गीतेत असे मुद्दाम सांगावे लागले की योग्यता असल्यास स्ञीलादेखील मोक्षाचा अधिकार आहे. आणि हा अधिकारदेखील फक्त मोक्षापुरताच मर्यादित राहिला. तशी योग्यता निर्माण करणा-या शिक्षणाचा अधिकार व ऐहिक जीवनात इतर कुठलाच सामाजिक अधिकार नव्हता. स्त्री ने फक्त चूल व मूल या दोन गोष्टी सांभाळाव्या. फक्त स्वंयपाकधरातून माजघरात अगर अंग चोरून सोप्यात डोकावयाचे किंवा पुरूष मंडळी नसतील त्यावेळी दरवाजापर्यत यायचे. तिथे तिची हद्द संपली.
स्ञियांभोवती अशी एक पोलादी चौकट दिवसेदिवस जास्तच ढृढ होत होती. ब्रिटिश कालखंडाच्या सुरूवातीला ही बंधने पराकोटीला पोचलेली होती. ब्रिटिश समाजाच्या दृष्टीने अत्यंत आक्षेपार्ह व मानवी स्वातंत्र्यमूल्यांवर घाला घालणा-या प्रथा इथे रूढ होत्या. विशेषतः बालविवाह, सती प्रथा, विधवा स्त्रीयांचे केशवपन, पडदा व गोषा पध्दती अशा त्या प्रथा होत्या. त्यातून ब्रिटिश व भारतीय विचारवंतांना चालना मिळाली. राजा राममोहन रॉय, आगरकर, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे या सारख्या समाजसुधारकांनी स्त्री शिक्षण व स्ञी स्वातंत्र्याचा प्रसार तर केलाच पण त्याला पूरक असे योग्य ते कायदे देखील करवून धेतले.
या सर्वादा फायदा असा झाला कीं, स्ञी जीवन फक्त चूल व मुलात अडकलेले होते त्याऐवजी स्ञिया घराबाहेर येऊ लागल्या. याचे दोन फायदे झाले. एक म्हणजे असूर्यम्पश्या अशा स्ञियांना जग दिसले. त्यांची दृष्टि वाढली व दुसरे म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत ब-याच स्ञियांनी भाग घेतल्याने ही चळवळ घरादारापर्यत, खेडोपाडयापर्यत जाऊन पोचली यामुळे व महात्मा गांधीच्या पुढाकारामुळे स्वातंत्र्यानंतर एक फार मोठा राजकीय विजय स्ञियांच्या पदरांत पडला तो म्हणजे लोकशाही च्या प्रक्रियेत निवडून येण्याची व निवडून येण्याची संधी. जगातला इतिहास आपण वाचला तर असे दिसून येते कीं मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कित्येक देशांत स्त्रीयांनी लढे दिले आहेत तर कांही देशांत हे लढे चालू आहेत. अजून देखील कित्येक देशांत राजकीय अधिकारपदावर महिला येऊ शकत नाहीत पण भारतात स्त्रीयांना हा हक्क मिळालेला आहे.
ही झाली राजकीय स्थिती. पण सामाजिक स्थिती कांय आहे ? आजतरी अस वाटतं कीं भारतीय संस्कृतितील स्ञीचे जे आदराचे स्थान आहे ते फक्त भावनेच्या दृष्टिकोनातून मिळालेले आहे. कर्तृत्व करण्याची पुरेशी संधी त्यांना मिळत नाही किंवा त्या. कर्तृत्वाचा गौरव केला जात नाही केलाच तर हातच कांहीतरी राखून केला जातो. स्त्रीच्या शारिरीक दुर्बलतेमुळे तिचे मन व बुघ्दिदेखील दुर्बळच असेच असे गृहित धरण्यांत येते. त्यामुळे स्ञियांनी त्यांच्या नाजुकतेला साजेल अशील कामे करावी हा अट्टाहास एकीकडे धरला जातो. हा अट्टाहास फक्त पुरूषच धरतात असे नाही तर स्त्रीयादेखील धरतात याला गेल्या कित्येक हजार वर्षांच्या सवयीचा परिणाम म्हणावा लागेल दुसरे काय ?
पण स्त्रीचे बुघ्दिकौशल्य पणाला लागेल, तिच्या कर्तृत्वामुळेच तिला सामाजिक स्थान मिळेल अशी स्थिली निर्माण झाली आहे ती आजच्या आर्थिक परिस्थितीमुळे. दुस-या महायुध्दानंतर जगभर फार मोठया प्रमाणावर महागाई वाढली, औद्योगिकरण वाढले आणि स्ञियांना चरितार्थासाठी नोक-या करणे भाग पडले. त्यातून जास्त प्रमाणावर स्ञी शिक्षण, त्यातून स्ञियांच्या व्यक्तिमत्वाचा विकास आणि त्यातून त्यांच्या कर्तृत्वाला वाव असे घडू लागले. आज भारतात फक्त राजकीय पदावरच स्त्री पुढारी नाही तर डॉक्टर्स, इंजिनियर्स, आर्किटेक्ट, शास्ञज्ञ, गिर्यारोहण, चिञपट निर्मिती व दिग्दर्शन अशा सर्व क्षेञात स्ञी जाऊन पोचलेली आहे. प्रशासकीय क्षेञातदेखील स्ञियांच्या नोक-या फक्त र्क्लाक, टायपीस्ट, स्टेनो अशा न रहाता उच्च पदावरदेखील स्त्रीया दिसून येतात. मात्र ही प्रगती अजूनदेखील प्रारंभावस्थेत आहे असेच म्हणावे लागेल. देवदासीसारख्या प्रथा अजूनही रूढ आहेत, व आर्थिकदृष्टया विपन्न कुटुंबातील स्त्रीचे शोषण अजूनही पराकोटीचे आहे.
मात्र या अवस्थेत एका वेगकया दिशेने नव्या अडचणी येऊ लागल्या आहेत, ज्यांचे निराकरण केल्याशिवाय स्त्रीची सामाजिक प्रगति टिकून राहणार नांही. आजचे यांञिकी युग जीवनातल्या प्रत्येक क्षेञांना स्पर्श करून जात आहे. यामुळे स्त्रीचे जीवनदेखील यंञवत् होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्त्रीयांनी घराबाहेरील क्षेञांत कितीही मोठी जबाबदारी उचलायचे ठरविले तरी घरातली जबाबदारी फक्त तिचीच मानली जाते. त्यामुळे घरातले स्वयंपाकपाणी, मुलाचे पालन पोषण, या बरोबरच नाती गोती सांभाळणे, यापैकी कुठल्याही जबाबदारीतून स्त्री अजूनही मुक्त झालेली नाही. अजूनही अशा ब-याच रूढी व परंपरामुळे स्त्री जीवनांतील कर्तृत्वाच्या. दिशा विस्तीर्ण होण्यावर बंधन आहे.
वेळी - अवेळी ज्या स्त्रीयांना घराबाहेर थांबावे लागते त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे घराबाहेर न पडता देखील - मागासलेल्या आणि सुशिक्षित व उच्चभ्रू अशा दोन्ही स्तरातील स्त्रीया हुंडयासारख्या पुरूषप्रधान रूढींच्या बळी ठरत आहेत.
यावर उपाय एकच. स्त्रीयांनी आपले स्ञीपण, त्यात अंतर्भूत असलेली नाजूकता, प्रसंगी त्याचे भांडवल करण्याची प्रवृत्ती, किंवा हयाला दैवदुर्विलास मानून निराशात्मक भूमिका पत्करणे सोडून दिले पाहिजे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे "मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः" अर्थात् माणसाच्या बंधनाचे किंवा मुक्तीचे एकंमेव कारण हे त्याचे मनच असते या उक्तीचे सतत स्मरण ठेवले पाहिजे आणि मनाचा कणखरपणा सतत जपला पाहिजे. आपण स्त्री आहोत किंवा पुरूष आहोत आणि
आपल्या समोरील व्यक्ती स्त्री आहे किंवा पुरूष आहे यावर आपले सामाजिक संबंध आधारित न राहता एका मानवाचे दुस-या मानवाशी जे सामाजिक संबंध असतील, जशा पध्दतीचे असतील ते संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न सर्व समाजने व विशेषतः स्ञियांनी केला पाहिजे. आजच्या संक्रमणाच्या अवस्थेत सामाजिक कार्यकत्यांनी थोडी काळजी घेऊन याप्रकारचे वैचारिक वळण समाजाला दिले तर स्त्रीयांचा सामाजिक उन्नतीचा काळ निश्चित उज्वल असेल.
लीना मेहेंदळे,
मुख्य कार्यकारी अधिकारी
सांगली जिल्हा परिषद, सांगली
4 comments:
स्त्रीयांच्या एकूणच सामाजिक इतिहासाचा घेतलेला हा थोडक्यात पण उत्तम आढावा आहे..स्त्री आजची परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करते आहे..पण त्याला सर्वस्वी तिचीच बेडी कारणीभूत आहे..सामाजिक स्तरावर सारे सांगणे सोपे वाटते..वाचायलाही छान आहे..पण प्रत्यक्षात सारे चित्र वेगळे आहे..तिच्या मानसिकतेत बदल होताना तिच्या भोवतालची परिस्थितीत बदल होण्याची गरज आहे..
AAPAN LIHILELYA BLOG MADHE KUTHE HI DR. BABASAHEB AMBEDKARANCHA ULLEKH NAAHI.. BABASAHEBANI GHATANECHYA MADHYAMATUN STRIYANA EK NAVI OOLAKH DILI . TYAAMULE STRIYANCHE CHUL TE MUL PARYANTCH ASNAARE NAATE TUTALE VA STRIYA PURUSHSATTAK BHARTALA AAVAHAN DEU LAAGLYA... AANI HOO STRIYANCHYA MULBHUT HAKKSATHI ASLELE HINDU CODE BILL PASS ZAALE NAAHI MHANUN MANTRIPAD LAATHADNAARE EKMEV YUGPURUSH MHANJE DR. BABASAHEB AMBEDKAR
Nice 🙏🏽🙏🏽🙏🏽
Thanks 😘😘😘👚😘😘
Post a Comment